विश्वास न्यूज च्या तपासात मध्य प्रदेश मध्ये लॉकडाउन लागणार हि बातमी खोटी असल्याचे आढळले.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर मध्य प्रदेश मध्ये परत लॉकडाउन लागणार असा एक मेसेज व्हायरल होताना दिसतोय. मध्य प्रदेश मध्ये परत एकदा ३१ जुलै पर्यंत लॉकडाउन असा दावा केला जातोय.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला असता हि पोस्ट खोटी असल्याचे आढळले, स्वतः शिवराज सिंह चौहान ने या गोष्टीचे खंडन केले आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज ‘एम पी संदेश न्यूज़ 24 सच से समझौता नही’ यांनी १५ ऑगस्ट रोजी एक पोस्ट लिहले, “#बिग_ब्रेकिंग्…मध्य प्रदेश में पूर्ण लॉक डॉउन पर मुख्यमंत्री ने बुलाई बैठक। मुख्य सचिव और गृह सचिव सहित कई विभागों के अफसरो के साथ की बैठक। सभी जिलों को पूर्ण लॉक डॉउन के लिये दिए गये निर्देश। एम पी संदेश न्यूज़ 24 सच से समझौता नही, सूत्रों की माने यो 16 से 31 तक राज्य में लागू रहेगा पूर्ण लॉक डॉउन। आज जारी हो सकता है अधिसूचना। गृह विभाग जारी होगा अधिसूचना।“
अर्थात: मध्य प्रदेश मध्ये पूर्ण लॉकडाउन वर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली. मुख्य सचिव आणि गृह सचिव यांच्यासह बऱ्याच लोकांसह हि बैठक घेण्यात आली. सगळ्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण लॉकडाउन चे निर्देश देण्यात आले आहेत. एम पी संदेश न्यूज़ 24 सच से समझौता नही च्या सूत्रांप्रमाणे १६-३१ पर्यंत राज्यात पूर्ण लॉकडाउन राहील. आज पुढील सूचना देण्यात येऊ शकतात. गृह विभाग सूचना देतील.
या मेसेज ला दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील व्हायरल केले गेले.
व्हायरल पोस्ट चा फेसबुक आणि आकाईव वर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने खर काय हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात आधी गूगल सर्च वापरले. आम्ही संबंधित कीवर्ड टाकून मध्य प्रदेशात लॉकडाउन बाबतीत काही कुठली बातमी मिळते का याचा तपास घेतला. आम्हाला पहिलीच बातमी सहयोगी वृत्तपत्र, नईदुनिया याच्या वेबसाईटवर मिळाले. त्यात दिल्याप्रमाणे मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका ट्विट मध्ये सांगितले कि मध्य प्रदेश मध्ये लॉकडाउन ची बातमी केवळ एक अफ़वाह आहे. यात काहीही तथ्य नाही. हि बातमी १६ जुलै रोजी सकाळी ६ च्या दरम्यान प्रकाशित करण्यात आली.
तपासात आम्ही पुढे मुख्यमंत्री शिवराज यांचे सोशल मीडिया अकाउंट तपासले. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस च्या ट्विटर हॅन्डल वर १५ जुलै रोजी एक ट्विट करून सांगण्यात आले कि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर बातम्या पसरवण्यात येत आहे कि मध्य प्रदेशात गुरुवार पासून लॉकडाउन लावण्यात येणार आहे. हि बातमी पूर्णपणे खोटी आहे. हि बातमी पूर्णपणे निरर्थक आहे. मध्य प्रदेश शासनाने असा कुठलाही निर्णय अजून घेतलेला नाही.
अजून माहितीसाठी आम्ही नईदुनिया चे डिजिटल एडिटर सुधीर गोरे यांना संपर्क केला. त्यांनी विश्वास न्यूज ला सांगितले कि मध्य प्रदेश मध्ये लॉकडाउन लागणार आहे अशी कुठली बातमी नाही. हि अफ़वाह कोणीतरी पसरवली आहे, स्वतः शिवराज सिंह यांनी या बातमीचे खंडन केले आहे.
शेवटी आम्ही त्या खोट्या मेसेज ला व्हायरल करणाऱ्या फेसबुक पेज चा तपास केला. त्यात आम्हाला असे कळले कि ‘एम पी संदेश न्यूज़ 24’ या पेज ला २९ हजार लोक फोल्लो करतात. याला १९ मे २०१९ रोजी बनवण्यात आले होते.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात मध्य प्रदेश मध्ये लॉकडाउन लागणार हि बातमी खोटी असल्याचे आढळले.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923