Fact Check: आसाम मध्ये नाही केली गेली लोकडाऊन ची घोषणा, हि पोस्ट दिशाभूल करणारी आहे

आसाम मध्ये लोकडाऊन ची घोषणा केली गेली नाही. हि पोस्ट फोटो एडिटिंग टूल च्या साहाय्याने बनवण्यात आली आहे. हि पोस्ट भ्रामक आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): नुकतेच एक छायाचित्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले, ज्यात म्हंटले गेले आहे कि सरकार ने या वर्षी ३० एप्रिल, २०२१ पासून जून पर्यंत लोकडाऊन ची घोषणा केली आहे. इंग्रजी साप्ताहिक वृत्तपत्र, GPlus चा उपयोग करून दावा केला जात आहे कि आसाम च्या सरकार ने कोरोनाव्हायरस ला लक्षात घेऊन हि घोषणा केली आहे.

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात लक्षात आले कि व्हायरल पोस्ट सोबत करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. विश्वास न्यूज ने GPlus चे वरिष्ठ पत्रकार वर्ष दास यांच्यासोबत संपर्क केला त्यांनी देखील सांगितले कि हा दावा चुकीचा आहे. विश्वास न्यूज सोबत बोलताना त्यांनी सांगितले, २३ मार्च २०२० रोजी प्रकाशित एका बातमी च्या स्क्रिनशॉट ला एडिट करून चुकीच्या दाव्याने व्हायरल केले जात आहे.

काय होत आहे व्हायरल?
व्हाट्सअँप वर व्हायरल होत असलेल्या पोस्ट मध्ये दावा केला जात आहे कि आसाम सरकार ने ३० एप्रिल पासून जून २०२१ पर्यंत आसाम मध्ये परत लोकडाऊन ची घोषणा केली आहे.

तपास:
२३ मार्च, २०२० रोजी आसाम मध्ये पहिल्यांदा लोकडाऊन ची घोषणा केली गेली होती. गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा उपयोग केल्यानंतर आम्हाला GPlus च्या फेसबुक पेज वर एक पोस्ट मिळाली, जी २३ मार्च २०२० रोजी प्रकाशित झाली होती. हा ग्राफिक व्हायरल होत असलेल्या पोस्ट सारखाच होता. या पोस्ट ला तुम्ही इथे क्लीक करून बघू शकता.

जेव्हा आम्ही व्हायरल पोस्ट ची GPlus च्या पोस्ट सोबत तुलना केली तेव्हा कळले कि व्हायरल पोस्ट हि त्याच पोस्ट ला एडिट करून बनवली गेली आहे. दोघांमधल्या समानता खाली बघू शकता.

पुढे आम्ही सरकार च्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल्स ला देखील तपासऊन बघितले, पण तिथे देखील आम्हाला व्हायरल दाव्याची ची पुष्टी करणारी कुठलीच पोस्ट मिळाली नाही.

आम्ही राज्याच्या वित्त, परिवर्तन आणि विकास, स्वास्थ्य और परिवार कल्याण, पीडब्ल्यूडी, शिक्षा (उच्च, माध्यमिक और प्राथमिक) मंत्री डॉ हिमंत बिस्वा शर्मा यांच्या सोबत संपर्क केला, त्यांनी आम्हाला सध्या राज्यात कुठल्याच प्रकारचा लोकडाऊन घोषित न झाल्याचे सांगितले.

विश्वास न्यूज ने साप्ताहिक वृत्तपत्र, GPlus चे वरिष्ठ पत्रकार, वर्ष दास यांच्या सोबत संपर्क केला त्यांनी देखील व्हायरल पोस्ट, वृत्तपत्राने २३ मार्च, २०२० रोजी प्रकाशित आवृत्तीचे एडिटेड व्हर्जन असल्याचे सांगितले.

निष्कर्ष: आसाम मध्ये लोकडाऊन ची घोषणा केली गेली नाही. हि पोस्ट फोटो एडिटिंग टूल च्या साहाय्याने बनवण्यात आली आहे. हि पोस्ट भ्रामक आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट