Fact Check: दत्तात्रय होसबळे आणि नीता अंबानी यांचे व्हायरल चित्र मॉर्फ्ड आहे

विश्वास न्यूज च्या तपासात आरएसएस चे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि नीता अंबानी यांचे चित्र मॉर्फ्ड असल्याचे सिद्ध झाले.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): राष्ट्रीय स्वयं सेवक संघ (RSS) चे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि रिलायन्स फाउंडेशन च्या फाउंडर नीता अंबानी यांचे एक खोटे चित्र व्हायरल होत आहे. यात दोघं राम मंदिर चे एक चित्र पकडून दिसतात. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. आम्हाला कळले कि दत्तात्रय होसबळे आणि नीता अंबानी यांचे वेग वेगळ्या इव्हेंट्स चे जुने छायाचित्र एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे. आमच्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर हॅन्डल अमान आनंद (@AmanAanandINC) ने 5 ऑगस्ट रोजी एक एडिटेड चित्र अपलोड केले आणि दावा केला: ‘अंबानी + आर एस एस = भाजपा. कृपया क्रोनोलॉजी को समझें। अंबानी का परिवार हम पर राज करता है।’

फॅक्ट चेक च्या उद्देश्याने हा कन्टेन्ट असाच पोस्ट केला आहे. पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे क्लीक करून बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल छायाचित्र च्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी पहिले गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला. सुरुवातीला आम्ही चित्र च्या त्या भागाचा तपास केला ज्यात नीता अंबानी दिसतात. रिव्हर्स इमेज सर्च च्या वेळी आम्हाला अंबानी यांचे चित्र बऱ्याच वेबसाईट वर मिळाले. यात अंबानी यांनी तोच लाल सूट घातलेला आहे, जो व्हायरल चित्रात दिसत आहे.

टाइम्स ऑफ इंडिया च्या वेबसाईट वर आम्हाला हे चित्र मिळाले, ज्यात नीता अंबानी यांनी पैंटिंग पकडली आहे. हि बातमी 22 डिसेंबर 2016 रोजी प्रकाशित झाली. हे चित्र इथे बघा.

टाइम्स ऑफ इंडिया च्या वेबसाईट वर आम्हाला 1 सप्टेंबर 2016 रोजी देखील हे चित्र मिळाले. ह्यात सांगितले गेले होते कि कापडावर कृष्णा देव चे चित्र बनवले गेले आहे. बातमीत हे देखील सांगितले गेले होते कि नाथद्वार च्या कलाकारांना सपोर्ट करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन बरीच मदत करत आहे.

तपासाच्या वेळी आम्हाला चांगल्या क्वालिटी चे चित्र द आर्टिस्‍ट ऑफ नाथद्वारा डॉट ओआरजी ह्या वेबसाईट वर देखील मिळाले. ह्याला क्लीक करून इथे बघा.

आता आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या चित्राच्या मागचे सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला. रिव्हर्स इमेज सर्च च्या मदतीने आम्हाला हे चित्र बऱ्याच वेबसाईट वर मिळाले. ह्याला मायटाइम्‍स टुडे आणि न्‍यूजट्रैक डॉट कॉम सारख्या वेबसाईट वर देखील बघितले जाऊ शकते. चित्रात होसबळे यांना इंडियन इंस्टीट्यूट ऑफ़ मास कम्युनिकेशन च्या निदेशक प्रो.संजय द्विवेदी यांच्यासोबत बघितले जाऊ शकते. ह्यात द्विवेदी हे सरकार्यवाह यांना पुष्पगुच्छ देताना दिसतात. हे इथे क्लीक करून बघा .

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने रिलायन्स सोबत संपर्क केला. आम्हाला रिलायन्स चे प्रवक्ता फ्रॅन्को विलियम्स यांनी सांगितले कि नीता अंबानी यांचे व्हायरल चित्र फेक आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात आरएसएस चे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि नीता अंबानी यांचे चित्र मॉर्फ्ड असल्याचे सिद्ध झाले.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट