Fact check: जातीय तणाव वाढवणारी न्यूजपेपर क्लिपिंग एडिटेड आहे, व्हायरल दावा खोटा
व्हायरल चित्र ज्यात सांगितले आहे कि एका मौलाना ने म्हंटले बुद्ध लोकांवर भरोसा करू नका, खोटे आहे.
- By: Ankita Deshkar
- Published: Jul 16, 2021 at 03:10 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूजला एक न्यूजपेपर क्लिपिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर व्हायरल होताना दिसली, असा दावा केला जात आहे कि एक मौलाना जाफर शेख यांनी वक्तव्य केले आज कि बुद्ध आणि SC ST लोकं सोबत काम करू नये, त्यांच्यावर भरोसा ठेवला जाऊ शकत नाही. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात समजले कि व्हायरल न्यूजपेपर क्लिपिंग हि डिजिटल रित्या बनवण्यात आली आहे. व्हायरल दावा खोटा आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Rohan नाशिककर @ROHANM1508 ने व्हायरल न्यूजपेपर कटिंग आपल्या ट्विटर हॅन्डल वर July 11, 2021 रोजी शेअर केले आणि मराठीत लिहले:
बौद्ध SC मधील लोकांना कामावर ठेऊ नये – मौलाना जाफर शेख
नागपूर मधील गोष्ट आहे
त्यात अस लिहिलंय की एकवेळ इतर धर्मियांना जास्त पगार ध्या परंतु ह्यांच्या वर भरोसा ठेऊ नका हे लोक खूप नीच असतात जिथे जातात तिथे चोरी धोका देतात
याना कामावर ठेऊ नका असे आदेश देण्यात आले आहेत
हि पोस्ट आणि याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात सध्या इंटरनेट सर्च पासून केली. आम्ही हे शोधले कि खरंच कुठल्या धार्मिक नेत्याने असे वक्तव्य केले आहे का. व्हायरल दाव्यात असे देखील म्हंटले आहे कि हि घटना नागपूर ची आहे, म्हणून आम्ही आमचा शोध नागपूर हा कीवर्ड वापरून देखील केला. पण आम्हाला कुठलीच अशी बातमी मिळाली नाही.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही त्या न्यूजपेपर क्लिपिंग चा तपास केला. आम्ही अश्याच दिसणाऱ्या एका व्हायरल न्यूजपेपर क्लिपिंग चा आधी देखील तपास केला होता. आणि त्यामुळे बघताच आम्हाला लक्षात आले कि हि क्लिपिंग डिजिटल रित्या तयार केली गेली होती.
हि न्यूजपेपर कटिंग एका वेबसाईट चा वापर करून बनवण्यात आली होती.
वेबसाईट वरचे उद्धरण काही असे दिसते:
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने एएनआई चे नागपूर करस्पॉण्डेण्ट, सौरभ जोशी यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि इतक्यात तरी असा नागपुरात कुठलाच कार्यक्रम झाला नाही जिथे कुठल्या धार्मिक गुरूंचे व्याख्यान झाले. तसेच त्यांनी हे देखील सांगितले कि व्हायरल न्यूजपेपर कटिंग हि नागपुरातल्या कुठल्याच नवृत्तपत्रासारखी दिसत नाही. व्हायरल पोस्ट खोटी आहे.
शेवटी आम्ही त्या यूजर चे प्रोफाइल तपासले ज्याने हि व्हायरल इमेज शेअर केली. Rohan नाशिककर हे मुंबई चे रहिवासी आहेत आणि त्यांना 186 लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: व्हायरल चित्र ज्यात सांगितले आहे कि एका मौलाना ने म्हंटले बुद्ध लोकांवर भरोसा करू नका, खोटे आहे.
- Claim Review : बौद्ध SC मधील लोकांना कामावर ठेऊ नये - मौलाना जाफर शेख
- Claimed By : Rohan नाशिककर
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.