Fact Check: मलटीव्हीटॅमिन ने इम्म्युनिटी चांगली हू शकते, पण याने कोरोनाव्हायरस ठीक होतो हा दावा भ्रामक आहे

मल्टीविटामिन, विटामिन सी आणि झिंक हे इम्म्युनिटी वाढवण्याच्या कामात येतात, त्याने कोरोनाव्हायरस चा उपचार होत नाही. व्हायरल दावा खोटा आहे. WHO ने देखील या दाव्याला खारीज केले.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक दावा शेअर करण्यात येत आहे, ज्यात म्हंटले जात आहे कि एक आठवड्यापर्यंत मलटीव्हीटॅमिन, व्हिटॅमिन सी आणि झिंक हे घेतल्याने कोरोनाव्हायरस ठीक होतो. एक्स्पर्ट डॉक्टर चे म्हणणे आहे कि मलटीव्हीटॅमिन, व्हिटॅमिन सी आणि झिंक या गोष्टी घेतल्याने इम्म्युनिटी वाढते पण त्याने कोरोनाव्हायरस ठीक होत नाही. एक्स्पर्ट सांगतात कि, कोविड-19 सेल्फ मेडिकेशन न घेता डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.

काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला आपल्या फॅक्ट-चेकिंग वॉट्सऐप चॅट-बोट (+91 95992 99372) वर हा दावा फॅक्ट-चेक साठी आमच्या वाचकांनी पाठवला. आमच्या यूजर ने आमच्या सोबत ट्विटर ची एक लिंक शेअर केली. या ट्विट मध्ये लिहले होते कि “कोरोना की रोकथाम हेतु सभी को अभियान चलाकर एक सप्ताह तक हानिरहित दवाओं (मल्टीविटामिन, विटामिन सी और जिंक) की खुराक दी जानी चाहिए। जिसे कोरोना होगा वह ठीक हो जाएगा और जिसे नहीं है उसे होगी ही नहीं, मतलब संक्रमण रुक जाएगा।”
अर्थात: कोरोनाव्हायरस संक्रमण रोखण्यासाठी एक आठवड्यापर्यंत, मल्टीविटामिन, विटामिन सी आणि झिंक अशे औषध देण्यात यायला हवे, याने कोरोनाव्हायरस ठीक हुन जाईल आणि संक्रमण थांबेल.

हा ट्विट आणि त्याचे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी या दाव्याचा तपास इंटरनेट वर केला. आम्ही महत्वाचे कीवर्डस (multivitamin, vitamin c, zinc, coronavirus cure) हे इंटरनेट द्वारे शोधले. इंटरनेट वर सर्च करताना आम्हाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईझशन (WHO) चे संकेतस्थळ सापडले. WHO च्या वेबसाईट वर Coronavirus disease (COVID-19) advice for the public: Mythbusters म्हणजे कोरोनाव्हायरस सोबत संबंधित लोकांना सल्ला आणि त्याच्या सोबत जुडलेले मिथक यांच्याबद्दल सल्ला दिला आहे.

या सेक्शन मध्ये स्पष्ट लिहले आहे कि व्हिटॅमिन आणि मिनरल सप्लिमेंट्स कोविड-19 चा उपचार करू शकत नाही. इथे सांगितले आहे कि माइक्रोन्यूट्रिएंट्स जसे कि विटामिन डी, विटामिन सी आणि झिंक हे इम्म्युनिटी सिस्टिम ठीक करायचे काम करतात. पण या गोष्टी कोरोनाव्हायरस संक्रमणावर उपचार करू शकत नाही. या संक्रमणावर उपचाराचा शोध सध्या सुरु आहे. WHO च्या साईट वर हि संपूर्ण माहिती इथे वाचा.

विश्वास न्यूज ने या संबंधात राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस (RIMS), रांची चे कोरोना नोडल ऑफिसर डॉ. बृजेश मिश्रा यांच्या सोबत संपर्क केला. एक्स्पर्ट डॉक्टरांनी सांगितले कि मल्टीविटामिन, विटामिन सी आणि झिंक हे इम्म्युनिटी सिस्टिम ठीक करण्यास मदत करतात, पण याचा अर्थ हा नाही कि हे कोरोनाव्हायरस चा उपचार आहे. त्यांच्या प्रमाणे हे नाही सांगता येत कि हे औषध घेणाऱ्यांना कोरोनाव्हायरस हू शकत नाही. डॉ. बृजेश मिश्रा यांनी हे देखील सांगितले कि एक्स्पर्ट डॉक्टरांच्या देखरेखीतच कोरोनाव्हायरस संक्रमणाचा उपचार करायला हवा.

विश्वास न्यूज ने ट्विट करणाऱ्या यूजर चा ट्विटर प्रोफाइल स्कॅन केला. हा प्रोफाइल मे २०१४ मध्ये बनवण्यात आला होता आणि फॅक्ट-चेक पर्यंत त्यांना ३५ लोकं फॉलो करत होते.

Disclaimer: विश्वास न्यूजच्या कोरोनाव्हायरस (COVID-19) संबंधित फॅक्ट-चेक स्टोरी वाचताना किंवा शेअर करताना, आम्ही वापरलेला डेटा किंवा संशोधन डेटा बदलू शकतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाव्हायरस संबंधित डेटा (संक्रमित असलेले, बरे झालेले रुग्ण आणि मृत्युमुखी पडलेले रुग्ण यांची संख्या) सतत बदलत राहते. तसेच लस (व्हॅक्सिन) शोधण्याच्या दिशेने संशोधनाचे ठोस परिणाम यायचे आहेत आणि त्यामुळे, उपचार आणि प्रतिबंधासाठी उपलब्ध असलेला डेटा देखील बदलू शकतो. म्हणून जेव्हा तुम्ही फॅक्ट-चेक वाचाल तेव्हा त्याची तारीख पडताळणे आवश्यक आहे.

निष्कर्ष: मल्टीविटामिन, विटामिन सी आणि झिंक हे इम्म्युनिटी वाढवण्याच्या कामात येतात, त्याने कोरोनाव्हायरस चा उपचार होत नाही. व्हायरल दावा खोटा आहे. WHO ने देखील या दाव्याला खारीज केले.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट