X
X

Fact Check: भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांचा 11 वर्ष जुना व्हिडिओ ओडिशा रेल्वे अपघाताशी जोडून केला जात आहे व्हायरल

विश्वास न्यूज (नई दिल्ली). ओडिशातील बालासोर येथील भीषण रेल्वे अपघाताशी जोडून भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्तार अब्बास नकवी यांचा एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करत वापरकर्ते दावा करत आहेत की, मुख्तार अब्बास नकवी यांनी आपल्या पक्षाच्या विरोधात जाऊन ओडिशा रेल्वे दुर्घटनेसाठी भाजपला जबाबदार धरले आहे.

विश्वास न्यूजला आपल्या तपासात व्हायरल झालेला व्हिडिओ खोट्या दाव्यासह शेअर केला जात असल्याचे आढळले आहे. मुख्तार अब्बास नकवी यांचा हा व्हिडिओ 2012 सालचा आहे. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. व्हिडिओमध्ये ते भाजपबद्दल नाही, तर काँग्रेस सरकारबद्दल बोलत आहेत. ते ओडिशातील नव्हे तर आंध्र प्रदेशातील रेल्वे अपघाताबद्दल बोलत आहेत.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर वापरकर्ता ‘चयन’ने 3 जून 2023 रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “चला, भाजपच्याच एका नेत्याने आपल्याच सरकारला प्रश्न करण्याचे धाडस तरी दाखवले.”

पोस्टची संग्रहित लिंक येथे पहा.

तपास  

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात आले की, या व्हिडिओवर कमळाचा लोगो आहे. त्याआधारे आम्ही भाजपच्या अधिकृत युट्यूब चॅनेलचे स्कॅनिंग सुरू केले. 23 मे 2012 रोजी अपलोड केलेला मूळ व्हिडिओ आम्हाला सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्तार अब्बास नकवी हे आंध्र प्रदेशातील रेल्वे दुर्घटनेसाठी काँग्रेस सरकारला जबाबदार धरत होते. 

तपास पुढे नेत आम्ही गुगलवर या रेल्वे अपघाताशी संबंधित अहवाल शोधण्यास सुरुवात केली. 22 मे 2012 रोजी टाइम्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला एक अहवाल आम्हाला सापडला. या अहवालानुसार, हुबळी-बेंगळुरू हंपी एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिली होती. या दुर्घटनेत सुमारे 25 जणांचा मृत्यू झाला होता.

इतर बातम्या इथे पाहता येतील. 

रेल्वे आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय रेल्वेमंत्री होते आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. 

अधिक माहितीसाठी आम्ही भाजपचे प्रवक्ते विजय सोनकर शास्त्री यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी व्हायरल झालेला दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. 

याआधी, सोशल मीडियावर रेल्वे अपघाताचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ ओडिशा रेल्वे अपघाताशी जोडून शेअर करण्यात आला होता. विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टची सत्यता तपासली. हा दावा दिशाभूल करणारा निघाला. वास्तविक, हा व्हिडिओ 11 नोव्हेंबर 2019 रोजी हैदराबादमधील काचीगुडा रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघाताबाबत होता. विश्वास न्यूजने केलेला हा फॅक्ट चेक येथे वाचता येईल.

बालासोर रेल्वे अपघातासंबंधीचे एक छायाचित्र व्हायरल झाले होते, ज्याबाबत अपघाताच्या ठिकाणी मशीद उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला होता. विश्वास न्यूजला तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. या दाव्यासह व्हायरल चित्रात दिसणारी इमारत ही एक मशीद नसून इस्कॉन मंदिर होते.

विश्वास न्यूजने केलेला हा फॅक्ट चेक येथे वाचता येईल. बालासोर रेल्वे अपघाताशी संबंधित इतर बातम्या येथे वाचा.

शेवटी, आम्ही बनावट दाव्यासह व्हिडिओ शेअर केलेल्या वापरकर्त्याचे पेज स्कॅन केले. आम्हाला आढळले की वापरकर्ता जानेवारी 2014 पासून ट्विटर वर सक्रिय आहे. 5,265 लोक वापरकर्त्याला फॉलो करतात. प्रोफाइलवर वापरकर्त्याने स्वतःला दिल्लीचा रहिवासी असल्याचे सांगितले आहे. 

निष्कर्ष: विश्वास न्यूजला तपासात आढळून आले की, मुख्तार अब्बास नकवी यांचा हा व्हिडीओ 2012 सालचा आहे. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. व्हिडिओमध्ये ते भाजपच्या नव्हे तर काँग्रेस सरकारबद्दल बोलत आहेत. ते ओडिशाच्या नव्हे तर आंध्र प्रदेशातील रेल्वे अपघाताबद्दल बोलत आहेत.

  • Claim Review : भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी ओडिशा रेल्वे अपघातासाठी भाजप सरकारला जबाबदार धरले.
  • Claimed By : ट्विटर वापरकर्ता 'चयन'
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later