मुकेश अंबानी यांनी नेट पॅक ची वैधता वाढवण्यावरून लोकांचे मत नाही मागितले. त्यांच्या नावावर खोटे ट्विटर हॅन्डल बनवून खोट्या सूचना देण्यात येत आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्युज): सोशल मीडिया वर मुकेश अंबानी आणि जियो मोबाईल नेटवर्क ला घेऊन बरेच पोस्ट्स व्हायरल होताना आपल्याला दिसतात. असाच एक दावा नुकताच एका ट्विटर अकाउंट वरून देखील व्हायरल होतोय. मुकेश अंबानी यांच्या नावानी एक ट्विट व्हायरल होत आहे, ज्यात असा दावा करण्यात येत आहे कि जियो च्या नेट पॅक ची व्हॅलिडिटी वाढवायचे मत मुकेश अंबानी लोकांकडून घेत असल्याचे दिसते. विश्वास न्यूज च्या तपासात हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर वर एक ट्विट मुकेश अंबानी यांच्या खोट्या ट्विटर अकाउंट वरून व्हायरल होत असल्याचे दिसून आले. त्या व्हायरल ट्विट मध्ये लिहले होते, “आप सभी भारतवासियों की मांग को देखते हुए। मैं Jio सिम के नेट पैक को 28 दिन के बजाय 30 दिन करने की सोच रहा हूँ। आपकी क्या राय है। री ट्विट के साथ बताईये।“
अर्थात: “तुम्हा सगळ्या भारतीयांची मागणी बघता, मी जियो सिम च्या नेट पॅक ची वैधता २८ दिवसांची न ठेवता ३० दिवसांची करण्याच्या विचारात आहे. यावर तुमचे मत काय, हे रिट्विट करून सांगा.”
या व्हायरल ट्विट ची अर्काइव्ह लिंक इथे बघा. हाच मजकूर विविध ट्विटर हॅन्डल वर देखील शेअर करण्यात आला आहे. फॅक्ट चेक होत पर्यंत या ट्विट ला ५२०० पेक्षा अधिक रिट्विट मिळाले होते आणि २३ हजार पेक्षा जास्ती लाईक होते. या ट्विट ची अर्काइव्ह लिंक इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी काही कीवर्डस (मुकेश अंबानी, जियो नेट पैक, जियो वैलिडिटी 30 दिवस इत्यादी) असे कीवर्डस वापरून गूगल सर्च केले. यात आम्हाला कोणतीच रिपोर्ट आढळली नाही, जी मुकेश अंबानी यांच्या नावावर केलेली ट्विट चे पुष्टीकरण करेल. मुकेश अंबानी यांनी असे कुठलेच विधान मीडिया मध्ये केले नाही.
यानंतर आम्ही ट्विट करणाऱ्या हॅन्डल चे तपास केले. त्यात आम्हाला स्पेल्लिंग चुकीचे असल्याचे आढळले (Ambanimukeshi). हे हॅन्डल मुकेश अंबानी यांचे अधिकृत ट्विटर हॅन्डल नाही. त्यात आपल्या वेरिफाइड चे ब्लू टिक दिसत नाही. कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या नावापुढे वेरिफाइड चे ब्लु टिक असणे साहजिक आहे.
यानंतर ट्विट मागचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही रिलायन्स चे प्रवक्ता यांच्या सोबत संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट केले कि मुकेश अंबानी यांच्या नावानी बनवलेले ट्विटर अकॉउंट खोटे आहे. मुकेश अंबानी यांनी असे कुठलेच वक्तव्य केले नाही. मुकेश अंबानी हे कुठल्याच सोशल नेटवर्किंग वेबसाईट्स वर नाही. यावरून हे स्पष्ट झाले कि मुकेश अंबानी यांचे खोटे ट्विटर अकॉउंट बनवून त्यावरून खोटे ट्विट शेअर केले जात आहेत.
मुकेश अंबानी यांच्या नावावरून जुने २०२० मध्ये खोटे ट्विटर अकाउंट बनवण्यात आहे. फॅक्ट चेक होत पर्यंत त्यांचे, १६४४ फोल्लोवर्स होते.
निष्कर्ष: मुकेश अंबानी यांनी नेट पॅक ची वैधता वाढवण्यावरून लोकांचे मत नाही मागितले. त्यांच्या नावावर खोटे ट्विटर हॅन्डल बनवून खोट्या सूचना देण्यात येत आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923