Fact Check: एमपी च्या शिवपुरी मध्ये दिसलेल्या मगरी चा व्हिडिओ बंगलोर चा सांगून व्हायरल
विश्वास न्यूजच्या तपासात मगरीच्या व्हिडिओबाबतचा व्हायरल दावा दिशाभूल करणारा निघाला. व्हायरल झालेला व्हिडिओ बेंगळुरूचा नसून मध्य प्रदेशातील आहे.
- By: Pragya Shukla
- Published: Sep 10, 2022 at 11:30 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): मुसळधार पावसामुळे बेंगळुरूमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर मगरीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे मगर रस्त्यावर आल्याचा दावा व्हिडिओ शेअर करून केला जात आहे.
विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा निघाला. व्हायरल झालेला व्हिडिओ बेंगळुरूचा नसून मध्य प्रदेशातील आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर कबीर ने व्हायरल व्हिडिओ शेअर करून इंग्रजी मध्ये लिहले, “बंगळुरूमध्ये मुसळधार पावसात मगर रस्त्यावर आली.”
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल पोस्टचे सत्य जाणून घेण्यासाठी, आम्ही संबंधित कीवर्डसह गूगल वर शोधण्यास सुरुवात केली. या दरम्यान, आम्हाला 17 ऑगस्ट 2022 रोजी टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या दाव्याशी संबंधित एक अहवाल मिळाला. रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील शिवपुरी शहरातील घटनेचा आहे. इतर बातम्यांचे अहवाल येथे वाचता येतील.
तपासादरम्यान, आम्हाला ETV इंडियाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हायरल दाव्याचा व्हिडिओ अहवाल सापडला. हा व्हिडिओ 16 ऑगस्ट 2022 रोजी शेअर करण्यात आला होता. वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील जुन्या बसस्थानकाजवळील निवासी भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. त्यामुळे आठ फूट लांबीची मगर तेथे घुसली होती. त्यानंतर त्याची माहिती वनविभागाला देण्यात आली आणि वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून मगरीला पकडले.
सखोल पुष्टीकरणासाठी आम्ही शिवपुरी ब्युरो चीफ अभिषेक शर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले, “व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील शिवपुरी भागात १४ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेतील आहे. वनविभागाने तातडीने कारवाई करत मगरीला पकडले.
आम्ही फेसबुक वापरकर्त्या कबीरचे प्रोफाइल स्कॅन केले ज्याने खोटा दावा शेअर केला आहे. प्रोफाइलवर दिलेल्या वापरकर्त्याला 54 लोक फॉलो करतात. फेसबुकवर युजरचे ५९० मित्र आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात मगरीच्या व्हिडिओबाबतचा व्हायरल दावा दिशाभूल करणारा निघाला. व्हायरल झालेला व्हिडिओ बेंगळुरूचा नसून मध्य प्रदेशातील आहे.
- Claim Review : बंगळुरूमध्ये मुसळधार पावसात मगर रस्त्यावर आली
- Claimed By : Kabir
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.