X
X

Fact Check: पाकिस्तानी एयरफोर्स च्या F-16 मध्ये पायलट ने लघुशंका केल्याचा दावा खोटा, एडिट करून छायाचित्र बनवले गेले

पाकिस्तानी पायलट के F-16 फाइटर जेट में पेशाब करने का दावा करने दावा फर्जी है। इस स्क्रीनशॉट को एडिट करके तैयार किया गया है।

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. सांगण्यात येत आहे कि हा पाकिस्तान चा न्यूजपेपर ‘डॉन’ चा स्क्रिनशॉट आहे. ह्याच्या हेडलाईन प्रमाणे, पाकिस्तान चा फाईटर पायलट जेट F-16 मध्ये लघुशंका करताना पकडला गेला. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल छायाचित्राला एडिट केले गेले आहे.

काय होत आहे व्हायरल?


पाकिस्तान चे वृत्तपत्र, ‘डॉन’ चा आर्टिकल सांगून शेअर केला गेलेला स्क्रीनशॉट मध्ये इंग्रजी हेडलाईन मध्ये लिहले आहे, ‘PAF F-16 च्या कॉकपीट मध्ये लघुशंका करणाऱ्या पायलट नि सांगितले कि त्याच्या स्वप्नात येऊन अल्लाह नि सांगितले कि असे केल्यास जेट ची क्षमता वाढेल.’ या स्क्रीनशॉट मध्ये दिलेल्या गोष्टी ला जसे च्या तसे इथे सादर केले आहे. या स्क्रीनशॉट ला फेसबुक वर देखील शेअर केले गेले आहे, त्याचा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे क्लीक करून बघू शकता.

तपास:


विश्वास न्यूज ला ऑनलाईन तपासात कळले कि असा कुठलाच दावा DAWN मध्ये आर्टिकल स्वरूपात प्रकाशित झालेला नाही.

या शिवाय आर्टिकल मध्ये बऱ्याच व्याकरणाच्या चुका आढळल्या. हेडलाईन मध्ये efficiency च्या जागी efficiancy लिहले गेले आहे आणि शेवटी पूर्ण विराम दिला गेला आहे. हेडलाईन मध्ये पूर्णविराम कधीच वापरल्या जात नाही. यातून स्पष्ट होते कि स्क्रीनशॉट ला एडिट करून तयार केले गेले आहे.

स्क्रीनशॉट मध्ये आर्टिकल १० जून २०२० हि प्रकाशनाची तारीख दिली गेली आहे. आम्ही गूगल वर टाइम फिल्टर लावले पण आम्हाला अशी कुठलीच बातमी मिळाली नाही.
आम्ही DAWN च्या खऱ्या आर्टिकल सोबत व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉट ची तुलना केली. डॉन च्या खऱ्या आर्टिकल मध्ये लेखकाची बाईलाईन दिली गेली आहे, पण व्हायरल स्क्रीनशॉट मध्ये ती दिली गेलेली नाही. यातला फरक खाली स्पष्ट दिसतो.  

विश्वास न्यूज ने या संबंधी डॉन न्यूज, पाकिस्तान चे सिनियर असाइन्मेंट एडिटर अदील जाफरी यांना संपर्क केला. त्यांनी हि पोस्ट खोटी असल्याचे सांगितले.

आम्ही हि पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर चे प्रोफाइल स्कॅन केले. फॅक्ट चेक होत पर्यंत फेसबुक यूजर Rajesh K Srivastava यांचे ४०० फॉलोवर्स होते.

निष्कर्ष: पाकिस्तानी पायलट ने F-16 फाइटर जेट मध्ये लघुशंका केल्याचा दावा खोटा असल्याचे कळले. या स्क्रीनशॉट ला एडिट करून तयार केले आहे. 

निष्कर्ष: पाकिस्तानी पायलट के F-16 फाइटर जेट में पेशाब करने का दावा करने दावा फर्जी है। इस स्क्रीनशॉट को एडिट करके तैयार किया गया है।

  • Claim Review : Rajesh K Srivastava
  • Claimed By : पाकिस्तान का पायलट फाइटर जेट F-16 में पेशाब करता पकड़ा गया है।
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later