Fact Check: मोदी सरकार ने सोनू सूद वर खटला दाखल केला नाही, व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी आहे
व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात येणार दावा दिशाभूल करणारा आहे. सोनू सूद वर मोदी सरकारने कुठलाच न्यायालयीन खटला दाखल केला नाही आहे. तथापि, अलीकडेच मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला रेमडेसिविर ड्रग च्या कथित अवैध वितरण प्रकरणी आमदार झीशान सिद्दीकी आणि अभिनेता सोनू सूद यांच्या भूमिकेची गंभीरपणे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
- By: Amanpreet Kaur
- Published: Jun 28, 2021 at 09:39 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात अभिनेता सोनू सूदच्या मास्क घालून ट्रेनच्या बाहेरचा फोटो असून त्याद्वारे अभिनेता सोनू सूद याच्यावर मोदी सरकारने न्यायालयीन खटला दाखल केल्याचा दावा केला जात आहे. असा दावा करण्यात येत आहे कि मोदी सरकार्ने सोनू सूद ला प्रश्न विचारले आहे कि इतक्या कोरोनाव्हायरस लसी सूद यांच्याकडे कुठून आल्या. विश्वास न्यूज च्या तपासात या पोस्ट सोबत करण्यात येणार दावा दिशाभूल करणारा आहे.
वास्तविक बघता मोदी सरकार ने सोनू यांच्यावर न्यायालयीन खटला नोंदवला नाही आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रेमडेशिव्हर इंजेक्शन खरेदी आणि वितरणासंदर्भात एका प्रकरणात सोनूच्या भूमिकेबाबत चौकशी सुरू आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज आओ मिलकर देश बचाये ने हि पोस्ट शेअर केली आहे, ज्यात लिहले आहे: मोदी सरकार ने किया सोनू सूद पर मुकदमा कहा इतने वेक्सीन तुम्हारे पास कहां से आए। अब देश के अच्छे काम करने वालो को कीमत चुकानी पड़ती है।
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूजने प्रथम व्हायरल पोस्टची तपासणी करण्यासाठी कीवर्डच्या मदतीने इंटरनेटवर शोध घेतला. आम्हाला अशी कोणतीही मीडिया रिपोर्ट सापडला नाही, ज्यामध्ये मोदी सरकारने सोनू सूद यांच्यावर खटला चालविला, असे म्हटले आहे.
मात्र आम्हाला, 17 जून रोजी प्रकाशित काही मीडिया रिपोर्ट्स मिळाल्या, ज्याप्रमाणे, मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला गंभीरपणे महत्वपूर्ण एंटी-वायरल ड्रग रेमडिसिविरच्या कथित अवैध वितरणप्रकरणी आमदार झीशान सिद्दीकी आणि अभिनेता सोनू सूद यांच्या भूमिकेची गंभीरपणे दखल घेण्याचे आदेश दिले आहे.
अधिक माहिती साठी आम्ही सोनू सूद यांच्या पीआर टीम ला संपर्क केला. पीआर टीम च्या सदस्याने हे स्पष्ट केले कि मोदी सरकार ने सौ वर कुठलाच खटला नाही चालवला आहे आणि व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे.
व्हायरल पोस्ट सोबत दिलेले छायाचित्र आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोधले, आम्हाला हे छायाचित्र बऱ्याच न्यूज आर्टिकल मध्ये वापरल्याचे दिसले. हे छायाचित्र मागील वर्षी जून मधले आहे, जेव्हा सोनू यांनी उत्तर प्रदेश आणि बिहार च्या १००० पेक्षा जास्ती प्रवासी मजदूर यांना घरी परतण्यास मदत केली होती. या आर्टिकल मध्ये तेव्हाचे अजून छायाचित्र देखील बघण्यास मिळतात.
आता आम्ही फेसबुक वर हि पोस्ट शेअर करणाऱ्या पेज आओ मिलकर देश बचाये चे प्रोफाइल स्कॅन केले. प्रोफाइल स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि या पेज चे 51118 फॉलोवर्स आहेत.
निष्कर्ष: व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात येणार दावा दिशाभूल करणारा आहे. सोनू सूद वर मोदी सरकारने कुठलाच न्यायालयीन खटला दाखल केला नाही आहे. तथापि, अलीकडेच मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला रेमडेसिविर ड्रग च्या कथित अवैध वितरण प्रकरणी आमदार झीशान सिद्दीकी आणि अभिनेता सोनू सूद यांच्या भूमिकेची गंभीरपणे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
- Claim Review : मोदी सरकार ने सोनू सूद वर खटला दाखल केला
- Claimed By : आओ मिलकर देश बचाये
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.