विश्वास न्यूजच्या तपसणीत असे आढळले की बेतियामध्ये कोरोनाबाबतची व्हायरल पोस्ट खोटी आहे. तुरुंगात झालेल्या मॉकड्रिलचा व्हिडियो खोट्या दाव्यांसह व्हायरल केला जात आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). कोरोना व्हायरसचा उद्रेक होत असताना सोशल मिडिया वर खोट्या बातम्यांचा जणू प्रलय आला आहे. फेसबुक वर काही लोक एक व्हिडियो अपलोड करून असा दावा करत आहेत की बेतिया गावात एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना झाला आहे.
विश्वास न्यूजच्या तपासणीत ही पोस्ट खोटी असल्याचे आढळले. आम्हाला असे कळले की 9 एप्रिलला बिहारच्या बेतिया तुरुंगात कोरोना संबंधी एक मॉक ड्रिल आयोजित केली होती. त्याच्या व्हिडियोला काही लोक खरी घटना म्हणून व्हायरल करत आहेत.
काय होत आहे व्हायरल
फेसबुक युझर रोहित गुप्ताने 11 एप्रिलला एक व्हिडियो अपलोड केला आणि दावा केला की: “बेतियामध्ये कोरोना अटॅक”
तपासणी
विश्वास न्यूजने सगळ्यात पहिले व्हायरल होणारा व्हिडियो पूर्ण पाहिला. व्हिडियोच्या शेवटी आम्हाला इमारतीबाहेर ‘मंडल कारा बेतिया’ असे लिहिलेले दिसले.
यावरून हे नक्की झाले की व्हायरल व्हिडियो बेतिया गावातील आहे, पण आता आम्हाला व्हिडियोची सत्यता पडताळून पहायची होती.
आम्ही गूगल सर्चची मदत घेतली. गुगलमध्ये ‘मंडल कारा बेतिया कोरोना’ कीवर्ड टाइप केले आणि सर्च केले तर आम्हाला दैनिक जागरण दैनिकाच्या वेबसाइटवर एक बातमी सापडली.
बातमीत असे नमूद आहे, “कोरोना व्हायरस विरुद्ध लढा देण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी तुरुंगात झालेल्या एका मॉक ड्रिलचा व्हिडियो व्हायरल झाला. हा व्हिडियो अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला जाऊ लागला. शुक्रवारी व्हिडियो व्हायरल झाल्या-झाल्या गावात गोंधळ सुरु झाला. लोकांना भीती वाटू लागली की कोरोना व्हायरस बेतिया गावापर्यंत पोहचला. सत्य जाणून घेण्यासाठी मीडिया कर्मचाऱ्यांसह इतरांचे फोन वाजू लागले. शेवटी लोकांना कळले की तुरुंगात कोणत्याही शिपायाला कोरोना झालेला नाही, आणि व्हायरल व्हिडियोमधील घटना एक मॉक ड्रिल आहे तेव्हा लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.”
ही बातमी वेबसाइटवर 11 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता प्रकाशित झाली होती. पूर्ण बातमी आपण इथे वाचू शकता.
यानंतर आम्ही बातमीमध्ये वापरलेले चित्र आणि व्हायरल व्हिडियोमधील समानता शोधणे सुरु केले. बातमीत वापरलेले चित्र आणि व्हायरल व्हिडियोमध्ये आम्हाला साम्य दिसले. दोन्ही चित्रात तेच पोलीस दिसत होते. दोन्ही चित्रात पोलिसांनी रुमाल आणि मास्क वापरून आपले तोंड झाकले होते.
तपासणीच्या पुढच्या टप्प्यात आम्ही दैनिक जागरणच्या बेतिया आवृत्तीचा इ-पेपर तपासून पाहिला. 11 एप्रिलच्या आवृत्तीत आम्हाला प्रमुख बातमी दिसली. यात नमूद होते की मॉकड्रिलचा व्हिडियो व्हायरल झाल्यामुळे गोंधळ उडाला, आणि तपास सुरु आहे. बातमीत तुरुंगाधिकारी असे म्हणाले की आयजी साहेबांच्या निर्देशावरून गुरुवारी कोरोना व्हायरस विरुद्ध लढा देण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तुरुंगात एक मॉक ड्रिल आयोजित केली होती. अशा मॉकड्रिल बिहारमधील सर्व तुरुंगात झाल्या आहेत. तुरुंगात सर्व ठीक आहे. कैद्यांपासून तुरुंग कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व स्वस्थ आहेत.
व्हायरल व्हिडियोचे सत्य सांगताना तुरुंगाधिकारी रामाधार सिंह म्हणाले की कोणीतरी तुरुंगात सुरु असलेल्या मॉकड्रिलचा व्हिडियो काढून व्हायरल केला. याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. व्हिडियो काढणाऱ्या आणि व्हायरल करणाऱ्या व्यक्तींची तपासणी सुरु आहे.
शेवटी, बेतियामधील मॉकड्रिलचा व्हिडियो कोरोनाचा रुग्ण आहे असे समजून व्हायरल करणारे फेसबुक युझर रोहित गुप्ता यांची आम्ही सोशल स्कॅनिंग केली. आम्हाला असे कळले की ते बिहार राज्यात बोधगया इथे राहतात. निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपसणीत असे आढळले की बेतियामध्ये कोरोनाबाबतची व्हायरल पोस्ट खोटी आहे. तुरुंगात झालेल्या मॉकड्रिलचा व्हिडियो खोट्या दाव्यांसह व्हायरल केला जात आहे
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपसणीत असे आढळले की बेतियामध्ये कोरोनाबाबतची व्हायरल पोस्ट खोटी आहे. तुरुंगात झालेल्या मॉकड्रिलचा व्हिडियो खोट्या दाव्यांसह व्हायरल केला जात आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923