X
X

Fact Check: RBI गव्हर्नर च्या नावावर व्हायरल होत असलेला इमेल खोटा आहे, वैयत्तिक माहिती शेअर केल्यास फसवले जाऊ शकता

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यानावावर व्हायरल होत असलेले मेसेज खोटे आहे, ज्यात लोकांना पाच कोटी पौंड बक्षीस देण्याच्या नावावर त्यांची वैयत्तिक माहिती शेअर करण्यास सांगितले जात आहे.

  • By: Abhishek Parashar
  • Published: Mar 22, 2021 at 09:20 PM
  • Updated: Jul 10, 2023 at 05:56 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नावाने सोशल मीडिया वर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि आरबीआय कडून पाच कोटी पौंड इतकी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे, दिलेल्या इमेल वर यूजर्स कडून वैयत्तिक माहिती मागवण्यात आली आहे.

विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले, ज्याला सोशल मीडिया वर लोकांना ठगण्याच्या दृष्टीने पसरवले जात आहे. विश्वास न्यूज तर्फे अश्या कुठल्यापण मेसेज पासून सावध राहण्याची नेहमीच अपील केली जाते. अश्या मेसेज वर देण्यात आलेल्या इमेल वर माहिती शेअर केल्यास, ते धोकादायक असू शकते, लोकं फसवले जाऊ शकतात.

काय होत आहे व्हायरल?
व्हीआरल होत असलेल्या मेसेज मध्ये लिहले आहे, “तुमच्या इमेल ला भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) कडून क्षतिपूर्ति साठी पाच कोटी पौंड चा पुरस्कार देण्यात आला आहे. कृपया आपली संपूर्ण माहिती rbinetbanking20@gmail.com या मेल वर शेअर करा. हा मेल, आरबीआय चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नावावर व्हायरल होत आहे.

Fake message going viral in the name of RBI Governor

बऱ्याच यूजर्स ने आमच्यासोबत हा दावा आमच्या व्हाट्सअँप चॅट-बोट वर देखील शेअर केला, आणि आम्हाला यामागचे सत्य जाणून घेण्यास अनुरोध केला.

Message shared with Vishvas News on its chat-bot

तपास:
आम्हाला पहिल्यांदा हा मेल बघताच समजले कि हा मेसेज खोटा आहे आणि याला लोकांना फसवण्याचा उद्देश्याने बनवण्यात आले आहे. भारतीय रिजर्व बैंक सोबत संपर्क करण्यास दिलेला इमेल आयडी हा जीमेल चा असू शकत नाही आणि दुसरे व्हायरल होत असलेल्या मेसेज वर आरबीआई गवर्नर शक्तिकांत दास यांचे नाव आणि त्यांचे कथित मोबाईल नंबर देखील वापरले गेले आहे.
व्हायरल मेसेज वर दिलेल्या नंबर वर कॉल केल्यास आम्हाला कळले कि या नंबर ची इनकमिंग कॉल ची सेवा उपलब्ध नाही.

या मेसेज वरून आम्ही आरबीआय सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. भारतीय रिजर्व बैंक च्या प्रवक्ता ने आम्हाला सांगितले कि, “सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेला मेसेज हा संपूर्णतः खोटा आहे. आरबीआय या प्रकारचा कुठलाच मेसेज पाठवत नाही. आणि आरबीआय तर्फे संपर्क करण्यासाठी आम्ही कधीच जीमेल चा वापर करत नाही.” त्यांनी सांगितले कि “आरबीआय गव्हर्नर च्या नावाचा चुकीचा वापर केला जात आहे. आम्ही लोकांना सांगू इच्छितो कि अश्या मेसेजस वर विश्वास ठेऊ नये आणि सतर्क राहावे.”

या आधी पण आरबीआय च्या नावाने खोटे मेसेजस व्हायरल झाले आहे. ज्याचे फॅक्ट चेक तुम्ही आमच्या वेबसाईटवर वाचू शकता.

निष्कर्ष: आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यानावावर व्हायरल होत असलेले मेसेज खोटे आहे, ज्यात लोकांना पाच कोटी पौंड बक्षीस देण्याच्या नावावर त्यांची वैयत्तिक माहिती शेअर करण्यास सांगितले जात आहे.

  • Claim Review : आरबीआय लोकांना देत आहे पाच कोटी पौंड
  • Claimed By : WhatsApp user
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later