X
X

Fact-Check: दिल्ली कमिशनरच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे

व्हायरल होत असलेला मेसेज ज्यात व्हाट्सअँप वर DP ठेऊ नका असे सांगितले जात आहे, तो खोटा आहे. दिल्ली पोलिसांनी तो प्रसारित केला नाही.

  • By: Ankita Deshkar
  • Published: Jul 4, 2020 at 04:13 PM
  • Updated: Jul 4, 2020 at 04:29 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज),
भारत-चीन तणाव सुरु झाला तेव्हा पासून विविध पोस्ट व्हाट्सअँप आणि इतर सोशल मीडिया वेबसाईट्स वर पसरवले जात आहेत. अशीच एक पोस्ट दिल्ली पोलिसांच्या नावावर व्हायरल होत आहे. विश्वास न्युज च्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे स्पष्ट झाले.

काय होत आहे व्हायरल?

सोनल अमोल धनवटे, यांनी नुकतेच आपल्या फेसबुक प्रोफाइल वर खालील मजकूर शेअर केला आणि त्यात २१ अजून लोकांना टॅग देखील केले:

Hii,

जर कोणाच्या आई किंवा बहिणीने स्वतःचा photo whatsapp वर DP ठेवला असेल तर लगेच तो बदलायला सांगा
कारण whatsapp वर ISIS व चीन चे hackers आहेत ज्यांच्याजवळ आपला whatsapp no आणि माहिती आहे.

ते लोक आपल्या profile photo चा गैरवापर करून आपले अश्लील photo बनवतात..
Whatsapp च्या CEO नी request केली आहे की काही दिवस स्वतःचा profile photo ठेवू नये.

Whatsapp चे engineers आपल्या safety साठी नेहमी आपल्याला co-operate करतील..

हा msg लवकरात लवकर forward करा..
विशेषकरुन तरुण मुलींसाठी….
_____________
Thank You.
_____________
A.K. Mittal (IPS)
9849436632
Commissioner Delhi.
.
Please forward to all your friend ones too..

तपास:

भारत-चीन तणावादरम्यान बरेच संदेश व्हायरल होत असल्याचे दिसून येतात.
व्हायरल होत असलेल्या संदेशात असे म्हंटले आहे, “Whatsapp च्या CEO नी request केली आहे की काही दिवस स्वतःचा profile photo ठेवू नये.”
आम्ही गूगल सर्च मध्ये कुठे व्हाट्सअँप च्या CEO संबंधित कुठली बातमी दिसते का याचा तपास केला, असे कुठेही आढळले नाही. कुठल्याही प्लॅटफॉर्म वर अशी बातमी नाही.

नंतर आम्ही त्या संदेशात दिल्या प्रमाणे, दिल्ली च्या कमिशनर नि असे काही वक्तव्य केले का या साठी परत गूगल सर्च चा वापर केला. ते केले असता असे कळले कि, कि दिल्ली चे कमिशनर AK Mittal नसून, SN Shrivastava आहेत.

तसेच, पूर्वीही कुठल्याच दिल्ली कमिशनर चे नाव, AK Mittal असे नव्हते.

अधिक माहिती गोळा करण्यासाठी आणि संदेशामध्ये केलेल्या दाव्याची पुष्टी करण्यासाठी आम्ही दिल्ली पोलीस चे पब्लिक रेलेशन्स ऑफिसर, अनिल मित्तल यांना संपर्क केला, त्यांनी विश्वास न्युज ला सांगितले, “व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे. दिल्ली पोलिसांच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी असे वक्तव्य केले नाही, तसेच दिल्ली पोलीस कमिशनर यांचे नाव AK Mittal नाही.”

आम्ही त्यानंतर, ज्या प्रोफाइल वरून हा मजकूर शेअर करण्यात आला त्याचे सोशल चेक केले, त्यात असे कळले कि Sonal Amol Dhanawate या चाकण, महाराष्ट्राच्या राहणाऱ्या असून त्यांनी सप्टेंबर २०१६ रोजी आपली फेसबुक प्रोफाइल तयार केली.

निष्कर्ष: व्हायरल होत असलेला मेसेज ज्यात व्हाट्सअँप वर DP ठेऊ नका असे सांगितले जात आहे, तो खोटा आहे. दिल्ली पोलिसांनी तो प्रसारित केला नाही.

  • Claim Review : Hii, जर कोणाच्या आई किंवा बहिणीने स्वतःचा photo whatsapp वर DP ठेवला असेल तर लगेच तो बदलायला सांगा कारण whatsapp वर ISIS व चीन चे hackers आहेत ज्यांच्याजवळ आपला whatsapp no आणि माहिती आहे. ते लोक आपल्या profile photo चा गैरवापर करून आपले अश्लील photo बनवतात.. Whatsapp च्या CEO नी request केली आहे की काही दिवस स्वतःचा profile photo ठेवू नये. Whatsapp चे engineers आपल्या safety साठी नेहमी आपल्याला co-operate करतील.. हा msg लवकरात लवकर forward करा.. विशेषकरुन तरुण मुलींसाठी.... _____________ Thank You. _____________ A.K. Mittal (IPS) 9849436632 Commissioner Delhi. . Please forward to all your friend ones too..
  • Claimed By : Sonal Amol Dhanawate
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later