Fact Check: पेट्रोल च्या किमतींवर भाजप चे खासदार मनोज तिवारी यांनी नाही केले हे वक्तव्य, खोटी पोस्ट होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात समजले कि मनोज तिवारी यांनी वाढत्या पेट्रोल च्या किमतींबद्दल कुठलेच वक्तव्य केले नाही. शेअर करण्यात येणारी पोस्ट खोटी आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पेट्रोल आणि डिझेल च्या वाढत्या किमतींमध्ये, सोशल मीडिया वर भाजप चे खासदार मनोज तिवारी यांच्या नावावर एक वक्तव्य व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि तिवारी यांनी म्हंटले, मोदी सरकार नसती त आज संपूर्ण देशात पेट्रोल ची किंमत २०० रुपये असती. हे खोटे वक्तव्य खरे समजून लोकं याला फेसबुक वर व्हायरल करत आहे.

विश्वास न्यूज ने मनोज तिवारी यांच्या नावावर व्हायरल होत असलेल्या दाव्याचा तपास केला त्यात कळले कि त्यांनी कुठलेच वक्तव्य केले नाही. व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज, HK News ने एका ट्विट चे स्क्रिनशॉट शेअर केले, ज्यात मनोज तिवारी यांचे छायाचित्र आहे आणि सोबत लिहले आहे, “मोदी जी की सरकार नहीं होती तो पेट्रोल का दाम आज 200 रूपये होता: मनोज तिवारी, बीजेपी नेता”

पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
फेसबुक वर बरेच यूजर हाच खोटा दावा शेअर करत आहे.

तपास:
आपल्या तपासाच्या सुरुवातीला, विश्वास न्यूज ने या पोस्ट च्या मागच सत्य जाणून घेण्यासाठी, सगळ्यात आधी गूगल सर्च द्वारे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला कि खरंच मनोज तिवारी यांनी कुठले असे वक्तव्य केले का, आम्हाला अशी कुठलीच बातमी सापडली नाही, ज्यात तिवारी यांनी असे वक्तव्य केल्याचे स्पष्ट होईल.
जर का त्यांनी खरंच असे वक्तव्य केले असते तर हे बातम्यांमध्ये नक्की असते. पण आम्हला कुठलीच अशी बातमी मिळाली नाही.

तपासाच्या पुढच्या टप्यात आम्ही मनोज तिवारी यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल @ManojTiwariMP चा तपास केला. पण आम्हाला तिथे पण त्यांचा पेट्रोल च्या किमतींना घेऊन कुठले विवादित वक्तव्य दिसले नाही.

पोस्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही मनोज तिवारी यांच्या कार्यालयात संपर्क केला, एडमिनिस्ट्रेटर कृष्णा चौबे यांच्या सोबत आम्ही व्हायरल पोस्ट शेअर केली. त्यांनी सांगितले कि हे वक्तव्य मनोज तिवारी यांचे नाही. त्यांनी हे पण सांगितले कि मनोज तिवारी यांनी फ्यूल हाईक वर कुठलेच वक्तव्य केले नाही. त्यामुळे असे पण नाही म्हणू शकत कि त्यांच्या कुठल्या वक्तव्य ला एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे. व्हायरल पोस्ट पूर्णपणे निराधार आहे.

आम्ही खोटी पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक पेज, HK News चे सोशल स्कॅनिंग केले. त्यात आम्हाला असे कळले कि या पेज ला 73,862 लोकं फोल्लो करतात आणि या पेज वर राजकारणासंबंधित पोस्ट केल्या जातात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात समजले कि मनोज तिवारी यांनी वाढत्या पेट्रोल च्या किमतींबद्दल कुठलेच वक्तव्य केले नाही. शेअर करण्यात येणारी पोस्ट खोटी आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट