Fact Check: झारखंडमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिसांच्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल
- By: Pragya Shukla
- Published: Apr 28, 2023 at 10:58 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियावर एका कार्यक्रमात नाचणाऱ्या पोलिसांचा एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. सामायिक केला जात असलेला हा व्हिडिओ, झारखंड पोलिसांचा असल्याचा दावा केला जात आहे.
विश्वास न्यूजला आपल्या तपासात हा व्हायरल व्हिडिओ झारखंडचा नसून महाराष्ट्राचा असल्याचे आढळून आले. वर्ष 2022मध्ये कोल्हापूरमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी नृत्य केले होते, ज्यास आता झारखंडशी चुकीच्या संदर्भात जोडून सामायिक केले जात आहेत.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वापरकर्ता ‘आरएस व्ह्लॉग 09′ने 2 एप्रिल रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वापरकर्त्याने लिहिले आहे की, “रामनवमीच्या निमित्ताने झारखंडच्या हजारीबागचे पोलिस नृत्य करत असताना.”
पोस्टच्या संग्रहित लिंकला येथे पाहिले जाऊ शकते.
तपास
व्हायरल व्हिडिओंबद्दल जाणून घेण्यासाठी, आम्ही संबंधित कीवर्डसह गुगलवर शोधण्यास सुरुवात केली. या दरम्यान, आम्ही व्हायरल व्हिडिओ, ‘वॉच मोर’ या युट्यूब चॅनेलवर मिळाला. 10 सप्टेंबर, 2022 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ कोल्हापूरच्या गणपती विसर्जनाच्या वेळी व्हायरल झाला होता.
इतर अनेक यूट्यूब चॅनेलने देखील हा व्हिडिओ सामायिक केला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, आम्ही इतर कीवर्डच्या मदतीने गुगलवर शोध सुरू केला. या दरम्यान, आम्ही दाव्याशी संबंधित नवभारतचा एक अहवाल प्राप्त झाला. हा अहवाल, 11 सप्टेंबर, 2022 रोजी प्रकाशित केला गेला आहे. अहवालानुसार, “कोल्हापूर, महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे गणपती विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी जोरदार नृत्य केले. हा व्हिडिओ त्याच दरम्यानचा आहे. या अहवालात, व्हायरल झालेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट देखील आहे.”
बातम्यांचे इतर अहवाल, येथे वाचता येतील.
इंडिया टुडेच्या एक अहवालानंतर, महाराष्ट्र पोलिसांनी कडक नियम लागू केले आहेत की, महाराष्ट्रात कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला वर्दीत नाचण्याची परवानगी नाही आणि नियम मोडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
अधिक माहितीसाठी आम्ही मुंबईतील पत्रकार वरुण सिंग यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल केलेला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ काही महिने जुना असून तो महाराष्ट्रातील कोल्हापूरचा आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी कोल्हापूरमध्ये पोलिसांनी नृत्य केले होते. हा त्याच महोत्सवाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये, पाठीमागे दुकानांवर बोर्ड लावले आहेत. ते मराठीत लिहिलेले आहेत. यावरून हा व्हिडिओ महाराष्ट्राचा आहे, हे देखील स्पष्ट आहे.
तपासाच्या शेवटी आम्ही, हा व्हिडिओ खोट्या दाव्यासह सामायिक करणाऱ्या ‘आरएस व्ह्लॉग 09’ वापरकर्त्याची सोशल स्कॅनिंग केले. आम्हाला, वापरकर्त्यास फेसबुकवर जास्त लोक फॉलो करताना आढळले नाहीत.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला आपल्या तपासात असे आढळले की, नृत्य करणाऱ्या पोलिसांचा व्हायरल व्हिडिओ झारखंडचा नाही तर महाराष्ट्राचा आहे. वर्ष 2022मध्ये कोल्हापूरमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी नृत्य केले होते, ज्यास आता झारखंडशी चुकीच्या संदर्भात जोडून सामायिक केले जात आहेत.
- Claim Review : झारखंडमध्ये रामनवमीच्या दिवशी पोलिसांनी नृत्य केले.
- Claimed By : आरएस व्ह्लॉग 09
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.