महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात एका व्यक्तीने तिचे बोट कापून टाकल्याचा व्हिडिओला दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केले जात आहे. पीडिते व्यक्तीने आपला भाऊ आणि वहिनीच्या कथित आत्महत्येसंदर्भात पोलिसांनी कारवाई केली नाही असा आरोप करत आपले बोट कापले होते आणि यावेळी त्यांनी असेही सांगितले होते की, मी या बोटाने भाजपला मतदान केले होते आणि आता मी हे बोट पोलिसांकडे देणार आहे. भाजपला मतदान केल्यामुळे त्यांनी आपले बोट कापले, असे म्हणणे दिशाभूल करणारे आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). एका व्यक्तीने तिचे बोट कापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने त्यांची बोटे कापली कारण त्यांनी भारतीय जनता पक्षा (भाजप)ला मतदान केले होते आणि आपल्या निर्णयाचा पश्चाताप होऊन त्यांनी तसे केले. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे.
विश्वास न्यूजला आपल्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा आणि राजकीय वाईट प्रचार असल्याचे आढळले. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती महाराष्ट्रातील धनंजय ननावरे आहे आणि आपला भाऊ आणि वहिनीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी कथितपणे केलेल्या कारवाईमुळे निराश होऊन त्यांनी हे कृत्य केले होते. माझ्या भावाच्या मृत्यूच्या प्रकरणात राज्य सरकारने कारवाई केली नाही तर मी दर आठवड्याला शरीराचा एक भाग कापत राहीन, असे त्यांनी बोट कापताना सांगितले होते. त्यांचा हाच व्हिडिओ भ्रामक संदर्भात राजकीय रंग देऊन शेअर केला जात आहे.
*या फॅक्ट चेकमध्ये ज्या व्हायरल व्हिडिओविषयी तपास केला गेला आहे, त्यामध्ये हिंसाचाराची अशी दृश्ये आहेत जी वाचकांना विचलित करू शकतात.
सोशल मीडिया वापरकर्ते ‘Vishal Yadav’ने व्हायरल व्हिडीओ (संग्रहित लिंक) शेअर करत लिहिले आहे की, “त्यांनी भाजपला मत दिले होते म्हणून भाई साहेबांनी स्वतःचे बोटच कापून टाकले.”
काही अन्य वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ अशाच आणि मिळत्याजुळत्या दाव्यांसह शेअर केला आहे.
न्यूज सर्चमध्ये आम्हाला या घटनेच्या अनेक बातम्या सापडल्या. 19 ऑगस्ट 2023 रोजी पीटीआय या वृत्तसंस्थेने इंडिया टुडेच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, “आपला भाऊ आणि वहिनीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात एका 43 वर्षीय व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर आपले एक बोट कापून टाकले.” राज्य सरकारने कारवाई केली नाही तर, ते दर आठवड्याला आपल्या शरीराचा एक भाग कापून टाकतील, असे पीडित धनंजय नानावरे यांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना फलटण शहरात घडली आहे.
या माहितीनुसार, “नंदकुमार नानावरे आणि त्यांची पत्नी उज्ज्वल नानावरे यांनी कथितपणे गेल्या महिन्यात उल्हासनगरमध्ये आत्महत्या केली होती.” या व्हिडिओत धनंजय यांनी आरोप केला आहे की, या प्रकरणात एका “मंत्र्याचा” सहभाग होता आणि त्यांच्या भावाने मृत्यूपूर्वी त्या मंत्र्याचे नावही घेतले होते, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. ते म्हणाले की, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते दर आठवड्याला आपल्या शरीराचा एक भाग कापून राज्य सरकारकडे पाठवत राहतील.
या घटनेचा उल्लेख इतर अनेक बातम्यांमध्येही करण्यात आला आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या बातमीनुसार, “संबंधित प्रकरणात संग्राम निकाळजे व अज्ञात व्यक्तींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 306 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु घटनेला 18 दिवस उलटूनही या प्रकरणात कोणतीही प्रगती झालेली नाही.”
न्यूज सर्चमध्ये 19 ऑगस्टच्या हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालानुसार मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. बातमीनुसार, “साताऱ्याचे पालकमंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून धनंजय यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी या प्रकरणाबाबत उल्हासनगरच्या आयुक्तांसह सातारा जिल्याचे जिल्हाधिकारी आणि एसपी यांच्याशी चर्चा केली.”
अन्य बातम्यांनुसार, “व्हिडिओत दिसत असल्या प्रमाणे खंजीराने बोट कापण्यापूर्वी धनंजय म्हणत आहेत की, आत्महत्येच्या त्या घटनेला आज वीस दिवसांहून अधिक दिवस झाले आहेत, परंतु अद्याप कोणालाही अटक झालेली नाही … आज आत्महत्येच्या त्या घटनेला वीस दिवसांहून अधिक दिवस झाले आहेत, परंतु अद्याप कोणतीही अटक झालेली नाही … या प्रकरणात, माझ्या भावाने मृत्यूपूर्वी अनेक आरोपींची नावे सांगितली आहेत, परंतु अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही … जर राज्य सरकारने कारवाई केली नाही तर मी दर आठवड्याला शरीराचा एक भाग कापून टाकेल.” बातमीनुसार, त्यांनी व्हिडिओमध्ये असेही म्हटले आहे की, ज्या बोटाने त्यांनी भाजप सरकारला मतदान केले आहे, आता तेच बोट कापून सरकारला पाठवणार आहे.”
न्यूज 24च्या बातमीतही याचा उल्लेख करण्यात आला आहे.
विश्वास न्यूजने या व्हायरल व्हिडिओबाबत सातारा जिल्ह्यातील फलटण पोलिसांशी संपर्क साधला, जिथे आम्हाला माहिती मिळाली की, ही घटना फलटण ग्रामीणमध्ये घडली आहे.
आम्ही फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी सुनील महारिक यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, ही घटना त्यांच्या भागातील आहे आणि ज्यांनी असे केले आहे ते त्याचा भाऊ आणि वहिनीच्या आत्महत्येच्या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर खूश नव्हते आणि हेच त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
उल्हासनगरमध्ये पीडितेचा भाऊ आणि वाहिनीने कथितपणे आत्महत्या केली असून तिथले पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर योग्य उपचाराची व्यवस्था केली.”
आमच्या तपासणीतून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल व्हिडिओ क्लिपला अर्धवट संदर्भात शेअर केले जात आहे. चुकीच्या दाव्यासह व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्यास फेसबुकवर सुमारे पाच हजार लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात एका व्यक्तीने तिचे बोट कापून टाकल्याचा व्हिडिओला दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केले जात आहे. पीडिते व्यक्तीने आपला भाऊ आणि वहिनीच्या कथित आत्महत्येसंदर्भात पोलिसांनी कारवाई केली नाही असा आरोप करत आपले बोट कापले होते आणि यावेळी त्यांनी असेही सांगितले होते की, मी या बोटाने भाजपला मतदान केले होते आणि आता मी हे बोट पोलिसांकडे देणार आहे. भाजपला मतदान केल्यामुळे त्यांनी आपले बोट कापले, असे म्हणणे दिशाभूल करणारे आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923