अमूलच्या 75व्या वर्षागाठ निमित्त व्हायरल होत असलेली लिंक खोटी आहे. हि पोस्ट एक स्कॅम आहे आणि लोकांनी ह्या लिंक वर क्लीक करू नये. सायबर सुरक्षा तज्ज्ञ देखी अश्या कुठल्या लिंक वर क्लीक न करण्याचा सल्ला देतात.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि अमूल आपल्या 75व्या वर्षागाठ निमित्त एक सर्वे करत आहे आणि लोकांना 6,000 रुपये जिंकण्याची संधी देत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात आम्हला कळले कि हि लिंक एका संदिग्ध वेबसाईट वर रिडाइरेक्ट होते आणि हा दावा खोटा आहे. हि पोस्ट एक स्कॅम आहे आणि लोकांनी लिंक वर क्लीक ना करणेच योग्य ठरेल.
काय होत आहे व्हायरल?
व्हाट्सअँप वर शेअर केलेल्या ह्या पोस्ट मध्ये लिहले आहे:
अमूल की 75वीं वर्षगांठ! सर्वेक्षण में भाग लेने के लिए प्रवेश करने के लिए क्लिक करें, 6000 रुपये जीतने का मौका है! लिंक: http://palacefault.top/amul/tb.php?_t=16339198711633920036488
तपास:
(आम्ही आमच्या वाचकांना कोणत्याही संदिग्ध लिंक वर क्लीक करण्याचा सल्ला देत नाही)
विश्वास न्यूज ने पोस्ट चा तपास दिलेल्या लिंक वर क्लीक करण्यापासून केला. लिंक ने आम्हाला एका दुसऱ्या वेबसाईट वर नेले: https://jollybeef.xyz/AfMjHKgh/amul/?_t=1634027595837#1634027599908
ह्या लिंक वर आम्हाला काही सर्वेक्षण प्रश्नांचे उत्तर देण्यास सांगितले गेले. उत्तरे दिल्यानंतर आम्हाला व्हाट्सअँप वरील आमच्या संपर्कांसोबत हि लिंक शेअर करण्यास सांगण्यात आले.
विश्वास न्यूज ने अमूल च्या कस्टमर केअर डिपार्टमेंट सोबत संपर्क केला. शिवम नावाच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले कि व्हायरल पोस्ट एक स्कॅम आहे आणि आम्ही आमच्या प्रॉडक्ट्स चा उपयोग करणाऱ्या आमच्या ग्राहकांना ह्यावर क्लीक न करण्यास सांगू.
सायबर सुरक्षा विशेषज्ञ इंटरनेशनल इंस्टीट्यूट ऑफ साइबर सिक्योरिटी (IICS) चे अतुल नरूला प्रमाणे, “वापरकर्त्यांनी व्हाट्सअँप फॉरवर्ड करण्यापूर्वी किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी संदेश काळजीपूर्वक तपासावेत. एखाद्याला हॅक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे फायदेशीर ऑफरसह दुर्भावनापूर्ण दुवे पाठवणे. हा सामाजिक अभियांत्रिकीचा एक प्रकार आहे जिथे वापरकर्ते पोस्ट वाचण्यासाठी आणि व्हायरस असलेल्या दुव्यांवर क्लिक करण्यासाठी आकर्षक ऑफरकडे आकर्षित होतात. लिंकवर क्लिक केल्यानंतर, वापरकर्त्याच्या मोबाइलमध्ये व्हायरस स्थापित होतो आणि ते त्यांचे व्हाट्सअँप खाते गमावू शकतात.
तज्ञांनी व्हायरल पोस्टमधील लीकचे पुनरावलोकन केले आणि असे आढळले की, व्हायरल पोस्टमधील दुव्यावर क्लिक केल्यानंतर, ते वापरकर्त्याला एका वेगळ्या वेबसाइटवर पुनर्निर्देशित करते जे वापरकर्त्यास 4 प्रश्नांची उत्तरे मागतात आणि यासह, वेबसाईट च्या खाली बनावट टिप्पण्या देखील आहेत. 4 प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर वापरकर्त्याला विविध व्हाट्सअँप ग्रुपमध्ये AMUL 25 वर्धापन दिन लिंक संदेश शेअर करण्याच्या अटीसह 6000 रुपये जिंकण्याचा संदेश दिला जातो.
स्वतःला वाचवण्यासाठी काय पावले उचलली पाहिजे?
सायबर सुरक्षा विशेषज्ञ अतुल नरूला प्रमाणे:
• कधी पण माहिती नसलेल्या लिंक वर क्लीक करायच्या आधी विचार करा
• आपल्या ब्राऊजर ला उपडेट ठेवा
• आकर्षक ऑफर वाल्या छोट्या लिंक वर कधीच क्लीक करू नका
• आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंट वर टू-वे ऑथेंटिकेशन इनेबल ठेवा
• अज्ञात लोकांकडून लिंक आली असल्यास त्यावर क्लीक करू नका
विश्वास न्यूज ने अमूल ची अधिकृत वेबसाईट देखील तपासली, व्हायरल लिंक आम्हाला तिथे सापडली नाही. अधिकृत वेबसाईट किंवा सर्वेक्षणाचा उल्लेख त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्स वर देखील नाही.
ह्या पोस्ट ला फेसबुक वर बासुदेव बेहर नावाच्या यूजर ने शेअर केले. प्रोफाइल प्रमाणे, यूजर ओडिशाच्या रहिवासी आहे.
डिस्क्लेमर: ह्या फॅक्ट चेक ला अतिरिक्त विवरण आणि विशेषज्ञानचे कोट वापरून उपडेट करण्यात आले आहे.
निष्कर्ष: अमूलच्या 75व्या वर्षागाठ निमित्त व्हायरल होत असलेली लिंक खोटी आहे. हि पोस्ट एक स्कॅम आहे आणि लोकांनी ह्या लिंक वर क्लीक करू नये. सायबर सुरक्षा तज्ज्ञ देखी अश्या कुठल्या लिंक वर क्लीक न करण्याचा सल्ला देतात.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923