X
X

Fact Check: कंगना रणौत भाजप चा प्रचार करत असल्याचा दावा करणारी खोटी ग्राफिक्स प्लेट होत आहे व्हायरल

एबीपी न्यूजच्या नावावर बनावट ग्राफिक प्लेट्स कंगनाशी कनेक्ट झाल्यानंतर व्हायरल होत आहेत. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीतही कंगनाच्या प्रचाराचा भाजपाने खंडन केला आहे. व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे.

  • By: ameesh rai
  • Published: Sep 24, 2020 at 03:28 PM
  • Updated: Sep 24, 2020 at 03:41 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात दावा केला जात आहे कि अभिनेत्री कंगना रणौत बिहार मतदानात भाजप चा प्रचार करत आहे. या पोस्ट मध्ये एबीपी न्यूज़ चा एक ग्राफिक प्लेट शेअर केला जात आहे. विश्वास न्यूज ला वॉट्सऐप चैटबॉट (+91 95992 99372) वर पण हा दावा फॅक्ट-चेविश्वास न्यूजने बिहारमध्ये कंगना रनौत भाजपसाठी प्रचार करणार असल्याच्या दाव्याची चौकशी केलीक करता मिळाला. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. एबीपी न्यूज़ ची खोटी ग्राफिक प्लेट व्हायरल होत आहे.

काय होत आहे व्हायरल?
अभिनेत्री कंगना रणौत ला घेऊन सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यूजर याला फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सऐप वर शेअर करत आहे. अशीच एक पोस्ट विश्वास न्यूज़ च्या वॉट्सऐप चैटबॉट वर फॅक्ट-चेक साठी पण मिळाला, जो कुठल्या फेसबुक यूजर च्या पोस्ट चा स्क्रीनशॉट आहे. या पोस्ट ला नेशनल न्यूज़ चैनल एबीपी न्यूज़ च्या ग्राफिक प्लेट चा वापर करून शेअर करण्यात येत आहे. या ग्राफिक प्लेट वर लिहले आहे, “बिहार चुनाव में भाजपा का प्रचार करेगी ;- कंगना रनौत।” हीच पोस्ट आम्हाला ट्विटर वर पण मिळाली, ज्याला ‘टीम हक की आवाज’ या ट्विटर हॅन्डल वर शेअर केले गेले आहे. या पोस्ट च्या कॅप्शन मध्ये लिहले होते, “झाँसी की रानी अब झाँसे की रानी बन चुकी है.!😂
या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी काही कीवर्डस च्या मदतीने इंटरनेट वर सर्च केले आम्ही हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला कि आम्हाला एबीपी न्यूज़ वर हि बातमी प्रकाशित केलेली सापडते का. आम्हाला एबीपी च्या वेबसाईट वर पण अशी कुठलीच बातमी नाही सापडली. इंटरनेट सर्च मध्ये आम्हाला कुठलीच विश्वास ठेवण्यालायक रिपोर्ट मिळाली नाही. बिहार निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी एका बातमीत कंगना रणौत चा बिहार निवडणुकींसोबत असलेल्या संबंधाचे खंडन केले. लाईव्ह हिंदुस्थान ची एक रिपोर्ट तुम्ही इथे बघू शकता.

आता पर्यंत आम्हाला अशी कुठलीच मीडिया रिपोर्ट मिळाली नाही ज्यात कंगना रणौत ने अशी कुठली माहिती दिली असेल, ना त्यांनी कधी म्हंटले कि त्या भाजप चा प्रचार करतील.

विश्वास न्यूज ने एबीपी न्यूज़ च्या नावावर व्हायरल होत असलेली ग्राफिक प्लेट ला निरखून बघितले. त्या प्लेट मध्ये व्याकरण शुद्ध नसल्याचे स्पष्ट दिसून येत होते. यात चुकीच्या जागे वर सेमी कॉलन (अर्ध विराम चिन्हाचा उपयोग केला आहे) या सोबतच वापरला गेलेला फॉन्ट हा एबीपी न्यूज मध्ये वापरला जाणारा फॉन्ट नाही. तो फॉन्ट वेगळा आहे. खाली शेअर केल्या गेलेल्या छायाचित्रात हा फरक स्पष्ट दिसून येतो. या छायाचित्रात एबीपी च्या अधिकृत यूट्यूब चैनल वर असलेल्या व्हिडिओ मध्ये वापरल्या गेलेल्या ग्राफिक प्लेट बघितली जाऊ शकते. व्हायरल होत असलेली ग्राफिक प्लेट आणि खरी ग्राफिक प्लेट यातला अंतर स्पष्ट दिसतो. फॉन्ट चा अंतर तुम्ही देखील बघू शकता.

तपासाच्या पुढील टप्प्यात, विश्वास न्यूज ने एबीपी न्यूज़ च्या एडिटोरियल डिपार्टमेंट सोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हि खोटी ग्राफिक प्लेट आहे. या ग्राफिक प्लेट चे आणि व्हायरल होत असलेल्या बातमी चे, एबीपी न्यूज़ सोबत काहीच संबंध नाही.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चे ‘टीम हक की आवाज‘ च्या हॅन्डल चे स्कॅनिंग केले. हे हॅन्डल २०२० रोजी बनवले गेले होते. फॅक्ट चेक केले जात पर्यंत त्याचे ११६ फॉलोवर्स होते.

निष्कर्ष: एबीपी न्यूजच्या नावावर बनावट ग्राफिक प्लेट्स कंगनाशी कनेक्ट झाल्यानंतर व्हायरल होत आहेत. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीतही कंगनाच्या प्रचाराचा भाजपाने खंडन केला आहे. व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे.

  • Claim Review : झाँसी की रानी अब झाँसे की रानी बन चुकी है.!
  • Claimed By : टीम हक की आवाज
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later