विश्वास न्यूज च्या तपासात ३० सप्टेंबर पर्यंत ट्रेन रद्द केल्याचा दावा चुकीचा ठरला. भारतीय रेल्वे नि ट्विट करून स्वतःच या बातमीचे खंडन केले.
नवी दिल्ली (विश्वास टीम): कोरोनाव्हायरस चे संक्रमण संपूर्ण देशात विळखा घालत असताना, भारतीय रेल्वे बद्दल एक दावा व्हायरल होताना दिसतोय. प्रामुख्याने ट्विटर वर एक दावा केला जातोय कि कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव बघता भारतीय रेल्वे ने, ३० सप्टेंबर पर्यंत सगळे पैसेंजर, एक्सप्रेस आणि दुसऱ्या ट्रेन बंद केल्या गेल्या आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा सिद्ध झाला. भारतीय रेल्वे ने पुष्टी केली आहे, कि असे कुठलेच नोटिफिकेशन त्यांनी काढले नाही.
काय होतंय व्हायरल?
काही ट्विटर यूजर दावा करत आहेत, कि ३० सप्टेंबर पर्यंत भारतीय रेल्वे नि सगळ्या ट्रेन्स बंद केल्या आहे. ट्विटर यूजर ‘द रिपोर्ट्स टुडे’ ने १० ऑगस्ट रोजी ट्विट केले, ‘#कोरोना महामारी के चलते 30 सितंबर तक सभी पैसेंजर/एक्सप्रेस/अन्य ट्रेन बन्द। Railway extends cancellation of all passenger/express/suburban trains till 30 September in the wake of #COVID pandemic.’
या ट्विट चे अर्काइव्ह लिंक इथे बघा.
तपास:
ट्विटर वर व्हायरल होत असलेल्या दाव्याचा विश्वास न्यूज ने तपास सुरु केला. सगळ्यात आधी आम्ही महत्वाचे कीओर्डस (30 सितंबर, भारतीय रेल) हे वापरून, गूगल सर्च केले, आम्हाला काही अधिकृत मीडिया संस्थांवर काही रिपोर्ट मिळाल्या. अशीच एक रिपोर्ट आम्हाला दैनिक जागरण मध्ये मिळाली. या बातमीत स्पष्ट म्हणले होते कि ३० सप्टेंबर पर्यंत रेल्वे बंद असल्याची बातमी खोटी आहे.
दैनिक जागरण च्या या बातमी ला तुम्ही हि लिंक क्लिक करून वाचू शकता.
अजून तपास केला असता आम्हाला भारतीय रेल्वे च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर एक ट्विट मिळाला. या ट्विट मध्ये स्पष्ट नमूद केले आहे, कि काही मीडिया रिपोर्ट मध्ये दावा केला जात आहे कि रेल्वे नि सगळ्या ट्रेन ३० सप्टेंबर पर्यंत रद्द केल्या आहेत. हा दावा चुकीचा आहे. रेल्वे मंत्रालय तर्फे अश्या कुठल्याही सूचना देण्यात आल्या नाहीत. स्पेशल मेल एक्सप्रेस ट्रेन चालू राहतील.
विश्वास न्यूज ने या संबंधित रेल्वे यात्री सुविधा समितीचे सदस्य अरुणेश मिश्रा यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी ३० सप्टेंबर पर्यंत ट्रेन्स कॅन्सल झाल्याची बातमी खोटी असल्याचे सांगितलेय. अरुणेश मिश्रा ने सांगितले कि रेल्वे च्या स्पेशल ट्रेन्स चालू राहतील आणि बाकी ट्रेन पहिले सारख्याच सस्पेंड राहतील.
रेल्वे मंत्रालय ने ११ ऑगस्ट रोजी जे विधान दिले, त्यात सांगितले गेले होते कि सगळ्या स्पेशल ट्रेन पहिल्या सारख्याच सुरु राहतील. रेल्वे नि स्पष्ट केले आहे कि अतिरिक्त नियमित पैसेंजर ट्रेन आणि सबअर्बन ट्रेन पहिल्या सारख्याच सस्पेंड राहतील. गरजेप्रमाणे स्पेशल ट्रेन वाढवल्या देखील जाऊ शकतात.
आम्ही ट्विट करण्याऱ्या ट्विटर यूजर प्रोफाइल @TheReportsToday चा पण तपास केला. हे ट्विटर प्रोफाइल ऑगस्ट २०१७ रोजी बनवला गेला आहे. त्या प्रोफाइल चे २५६१ फोल्लोवर्स आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात ३० सप्टेंबर पर्यंत ट्रेन रद्द केल्याचा दावा चुकीचा ठरला. भारतीय रेल्वे नि ट्विट करून स्वतःच या बातमीचे खंडन केले.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923