Fact Check: निवृत्ती नंतर सेनेतील कुत्र्यांचा जीव घेण्यात येत नाही, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा ज्यात सांगण्यात येत होते कि लष्करातील कुत्र्यांना निवृत्ती नंतर मारून टाकतात तो दिशाभूल करणारा ठरला. निवृत्त झालेल्या कुत्र्यांना मेरठ ला पाठवण्यात येते.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक रील फेसबुक वर व्हायरल होताना दिसली, ह्या रील मध्ये दावा करण्यात येत होता कि सेने मधील कुत्र्यांना भारतीय सेना निवृत्ती नंतर मारून टाकते कारण त्यांना सेनेच्या सगळ्या जागा माहिती असतात. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Mom’s Ladla Parwej ने रील शेअर केली आणि लिहले: सेना के कुता को क्यू मार दी जाती है गोली। #viralreels #viralvideo #shorts #facts #FactsMatter #aloud

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात, किवर्ड सर्च ने केली.

आम्हाला yourstory.com वर एक बातमी सापडली, ज्यात लिहले होते, “माहितीच्या अधिकाराच्या प्रश्नाला दिलेल्या धक्कादायक प्रतिसादात, भारतीय लष्कराने उघड केले की ते आपल्या कुत्र्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा कोणत्याही क्षणी जेव्हा ते एका महिन्यापेक्षा जास्त सेवेसाठी अयोग्य ठरवले जातात तेव्हा त्यांना दया (दया मारते) देते. हे जून 2015 मध्ये द हफिंग्टन पोस्टने नोंदवले होते. एका वर्षापेक्षा कमी कालावधीनंतर, सेवानिवृत्त कुत्र्यांसाठी एक चांगली आणि जीवन वाचवणारी बातमी आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक घोषणापत्र सादर केले असून, सरकार निवृत्तीनंतर लष्करातील कुत्र्यांचे दयामरण थांबवण्याच्या धोरणावर काम करत आहे.”

हे आर्टिकल इथे वाचा.

आम्हाला इंडियन एक्सप्रेस च्या वेबसाईट वर देखील एक बातमी सापडली ज्यात लिहले होते, “लष्करी कुत्रे यापुढे सक्रिय सेवेत नसल्यानंतर त्यांना euthanizing (इच्छा मरणाची प्रक्रिया) करण्याची प्रथा होती. 2015 मध्ये एका RTI उत्तराने ही माहिती दिल्याने सार्वजनिक खळबळ उडाली आणि त्यानंतर धोरणात सुधारणा करण्यात आली.”

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही कर्नल आमोद कुलकर्णी (निवृत्त) ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि युथनेशिया म्हणजेच इच्छा मरण सेनेतील कुत्र्यांमध्ये आधी साहजिक होते. पण ते देखील तेव्हाच वापरण्यात यायचे जेव्हा त्या जनावराला खूप गंभीर दुखापत झाली असेल किंवा तो खूप आजारी असेल. विनाकारण कुठल्याच जनावराला मारण्यात नाही आले. पण आता ती प्रक्रिया देखील बंद हुन जवळपास सात वर्षे झाली आहेत. आता निवृत्त कुत्रयांना मेरठ मध्ये एका ओल्ड एज होम मध्ये पाठवण्यात येते किंवा त्यांना दत्तक दिले जाते. हि प्रक्रिया आधी घोड्यांमध्ये देखील व्हायची पण आता त्यांच्यात देखील बंद झाली आहे. त्यांना उत्तराखंड मधील हेमपूर इथे पाठवण्यात येते.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही व्हायरल दावा शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्याला फेसबुक वर ११ हजार लोकं फॉलो करतात. यूजर एक युट्युबर देखील आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा ज्यात सांगण्यात येत होते कि लष्करातील कुत्र्यांना निवृत्ती नंतर मारून टाकतात तो दिशाभूल करणारा ठरला. निवृत्त झालेल्या कुत्र्यांना मेरठ ला पाठवण्यात येते.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट