अफगाणिस्तान मध्ये महिला पायलट साफिया फिरोजी ह्यांच्या हत्येच्या दाव्यासोबत व्हायरल होत असलेले हिटर आणि व्हिडिओ हे काबुल मध्ये 2015 मध्ये ईशनिंदा च्या अफवा वरून झालेल्या एका मोबा लिंचिंग च्या घटनेचे आह ज्यात 27 वर्षीय मुस्लिम युवती फरखुंदा मलिकजादा हिला गर्दीने ने ठार मारले.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): अफगाणिस्तान वर आता तालिबान चे र्राज्य आहे अश्यातच सतत अफघानिस्तान संबंधी चित्र आणि बातम्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. अश्यातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात सांगितले जात आहे कि अफगाणिस्तान मध्ये महिला पायलट साफिया फिरोजी हिची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली. दावा करण्यात येत आहे कि तालिबान ने महिला असल्या कारणाने सार्वजनिक ह्या महिलेची हत्या केली.
विश्वास न्यूज च्या तपासात हा आव खोटा असल्याचे सिद्ध झाले. हा व्हिडिओ अफगाणिस्तान च्या काबुल मध्ये झालेल्या एका जुन्या मोबा लिंचिंग च्या घटनेचा आहे. जेव्हा जमलेल्या गर्दीने 19 मार्च 2015 ईशनिंदा च्या अफवा वर एका 27 वर्षीय मुस्लिम महिला फरखुंदा मलिकजादा हिची हत्या केली.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Verma Kultej’ ह्यांनी व्हायरल पोस्ट शेअर केली (आर्काइव्ह लिंक) आणि लिहले: “O god if you are there, where r u? How can such an atrocity happen in your world. Shame on whole world; shame on whole humanity; shame on ourselves.”
असेच एक चित्र देखील व्हायरल होत आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर बरेच यूजर (आर्काइव्ह लिंक) देखील अश्याच दाव्यासह हे चित्र पोस्ट करत आहेत. ट्विटर वर देखील यूजर्स (आर्काइव्ह लिंक) शेअर करत आहे.
तपास:
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मधल्या चित्रावर आम्ही गूगल इमेज सर्च चा वापर केला आम्हाला तो ‘Murder of Farkhunda Malikzada’ च्या नावाने असलेल्या विकिपीडिया पेज वर मिळाला, ज्यात तेच चित्र लावले होते.
दिलेल्या माहिती प्रमाणे, हे चित्र फरखुंदा मलिकजादा चे आहे, ज्यांची काबुल मध्ये जमा झालेल्या गर्दी ने ईशनिंदा के अफवाह मुले हत्या केली. ह्या कीवर्डस ला सर्च केल्यावर आम्हाला काही रिपोर्ट्स मिळाल्या ज्यात ह्या हत्याकांड ची माहिती दिली होती. आम्हाला न्यूयॉर्क टाइम्स च्या वेबसाईट वर 26 डिसेंबर 2015 रोजी ‘The Killing of Farkhunda’ हि रिपोर्ट सापडली ज्यात ह्या घटनेची माहिती दिली आहे.
सहा मिनिट सत्तावीस सेकंड च्या ह्या व्हिडिओ मध्ये तीच फ्रेम दिसते जी सोशल मीडिया वर साफिया फिरोजी नावाच्या महिलेची हत्या सांगून व्हायरल करण्यात येत आहे. आम्ही वाचकांना सांगू इच्चीतो कि ह्या व्हिडिओ मध्ये विचलित करणारे दृश्य आहे. पण आम्ही बातमीच्या निमिताने काही दृश्य इथे दित ब्लर स्वरूपात प्रदर्शित करत आहे.
सर्च मध्ये आम्हाला cnn.com च्या वेबसाईट वर 23 मार्च 2015 रोजी प्रकाशित बातमी सापडली. ह्यात सांगितले गेले होते कि २६ आरोपींना ह्या हत्याप्रकरणी पकडण्यात आले आहे. ह्या रिपोर्ट मध्ये देखील हा व्हिडिओ होता.
news.com.au च्या वेबसाइट पर 25 मार्च 2015 रोजी प्रकाशित रिपोर्ट मध्ये देखील ह्या घटनेची माहिती दिली आहे. रिपोर्ट मध्ये वापरलेल्या चित्रातमहिला विरोध प्रदर्शन करताना दिसतात.
आमच्या तपासा हे सिद्ध झाले कि व्हायरल व्हिडिओ मध्ये महिला पायलट साफिया फिरोज नसून २०१५ मध्ये हत्या करण्यात आलेली युवती फरखुंदा मलिकजादा आहे.
इंडिया टाइम्स डॉट कॉम च्या रिपोर्ट प्रमाणे, साफिया फिरोजी चा परिवार १९९० मध्ये काबुल सोडून पाकिस्तान मध्ये गेला आणि तालिबान चे राज्य संपल्यावर परत अफगाणिस्तान मध्ये आले. फिरोजी ह्या अफगाणिस्तान च्या दोन महिला पायलट पैकी एक आहेत.
”साफिया फिरोजी (Safia Firozi)” कीवर्ड सर्च केल्यावर आम्हाला व्हायरल दाव्यांमधील कुठलीच रिपोर्ट मिळाली नाही.
फक्त deathmilitia.com वेबसाइट वर 19 ऑगस्ट 2021 रोजी प्रकाशित बातमीत त्यांच्या हत्येची बातमी दिली गेली आहे. विश्वास न्यूज ला अजून कुठेच हि बातमी सापडली नाही. ह्या रिपोर्ट नंतर त्यांच्या हत्येची अफवा व्हायरल झाली असावि
विश्वास न्यूज साफिया फिरोजी ह्यांच्या जिवंत असल्याची पुष्टी करत नाही, पण त्यांच्या हत्येच्या दाव्यासोबत व्हायरल होत असलेले चित्र आणि व्हिडिओ हे काबुल मधील जुन्या मोबा लिंचिंग च्या घटनेचे आहे.
निष्कर्ष: अफगाणिस्तान मध्ये महिला पायलट साफिया फिरोजी ह्यांच्या हत्येच्या दाव्यासोबत व्हायरल होत असलेले हिटर आणि व्हिडिओ हे काबुल मध्ये 2015 मध्ये ईशनिंदा च्या अफवा वरून झालेल्या एका मोबा लिंचिंग च्या घटनेचे आह ज्यात 27 वर्षीय मुस्लिम युवती फरखुंदा मलिकजादा हिला गर्दीने ने ठार मारले.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923