विश्वास न्यूजच्या तपासात पीएम मोदींच्या नावावरील पत्राबाबतचा व्हायरल दावा खोटा ठरला. व्हायरल झालेल्या पत्राचे छायाचित्र बनावट असून ते 2016 पासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असे कोणतेही पत्र पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिलेले नाही.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज) : सोशल मीडियावर पीएम मोदींच्या नावाचे एका पत्राचे छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जे शेअर करून दावा केला जात आहे की, पंतप्रधान मोदींनी एक पत्र जारी करून सर्व देशवासियांना या दिवाळीत फक्त भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.
विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हायरल दावा खोटा निघाला. व्हायरल झालेल्या पत्राचे छायाचित्र बनावट असून ते 2016 पासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असे कोणतेही पत्र पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिलेले नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Sarvottam Nayak ने व्हायरल चित्र शेअर करून लिहले, “हमारे प्रिय प्रधानमंत्री की तरफ से संदेशा।”
पोस्ट ला खरे समजून इतर लोकं देखील शेअर करत आहे. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी, आम्ही संबंधित कीवर्डसह Google वर शोध सुरू केला. या दरम्यान, आम्हाला 2016 मध्ये बिझनेस स्टँडर्ड वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या दाव्याशी संबंधित एक अहवाल सापडला. रिपोर्टनुसार, पीएम मोदींनी दिवाळीत फक्त भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केलेले नाही. व्हायरल झालेले पत्र बनावट असून ते संगणकाच्या मदतीने तयार करण्यात आले आहे.
फायनान्शिअल एक्स्प्रेससह इतर अनेक वेबसाइटने ही बातमी प्रसिद्ध केली होती.
तपास पुढे नेत आम्ही पीएमओचे अधिकृत सोशल मीडिया खाते स्कॅन करण्यास सुरुवात केली. या दरम्यान, आम्हाला 31 ऑगस्ट 2016 रोजी दाव्याशी संबंधित एक ट्विट प्राप्त झाले. ट्विटमध्ये अस्पष्ट प्रतिमा वापरण्यात आली आहे, जी व्हायरल पत्राशी जुळते. हा फोटो शेअर करताना त्याला फेक म्हटले आहे.
माजी आयपीएस किरण बेदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर आम्हाला याशी संबंधित एक ट्विट देखील आढळले. 27 सप्टेंबर 2016 रोजी किरण बेदी यांनी हे पत्र सत्य असल्याचे समजून शेअर केले. त्यानंतर काही वेळातच दुस-या एका ट्विटमध्ये त्यांनी खंत व्यक्त करत हे पत्र बनावट असल्याचे म्हटले होते.
अधिक माहितीसाठी आम्ही दैनिक जागरणचे राष्ट्रीय ब्युरो हेड आशुतोष झा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले, “व्हायरल दावा खोटा आहे. असे कोणतेही पत्र पंतप्रधान मोदींनी जारी केलेले नाही.
फेक पोस्ट शेअर करणाऱ्या Sarvottam Nayak च्या सोशल स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळले की युजरचे ६६७ मित्र आहेत. प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, युजर हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात पीएम मोदींच्या नावावरील पत्राबाबतचा व्हायरल दावा खोटा ठरला. व्हायरल झालेल्या पत्राचे छायाचित्र बनावट असून ते 2016 पासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असे कोणतेही पत्र पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिलेले नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923