Fact Check: युपी च्या फुटपाथ वर बसलेल्या पेशंट्स चे चित्र दिल्ली चा सांगून होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. विश्वास न्यूज ला समजले कि हे चित्र दिल्ली चे नसून युपी च्या फिरोझाबाद चे आहे, जेव्हा एका डॉक्टर ने फूटपाथ वर सगळ्या रुग्णांचा तपास केला.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एक चित्र व्हायरल होत आहे, ज्यात काही आजारी लोकं फुटपाथ वर ग्लुकोस ची बॉटल घेऊन बसल्याचे दिसतात. चित्रात दावा करण्यात येत आहे कि हा हाल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ह्यांच्या दिल्ली चा आहे, जिथे डेंगू च्या रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड न मिळाल्याने त्यांचा उपचार फुटपाथ वर होत आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, त्यात कळले कि हा दिल्ली चा नसून युपी च्या फिरोझाबाद चा आहे. एका खासगी रुग्णालयानेफुटपाथ वर डेंगू च्या रुग्णांचा तपास केला, त्यात हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि रुग्णालयाला सील करण्यात आले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज ” Social media cell halqa talwandi sabo PYC” ने व्हायरल पोस्ट केली आणि लिहले: पंजाब आ कर स्वास्थ्य सुविधाओं की गारंटी देने वाले केजरीवाल की दिल्ली की हालत देख लो 👇🏻, डेंगू से पीड़ित मरीजों के लिए अस्पताल में जगह तक नहीं और अनेक फुटपाथों पर ये मरीज ग्लूकोज की बोतलें लटका के बैठे हैं ,इससे पहले केजरीवाल के मोहल्ला क्लीनिक में गधे घोड़े इलाज करवाते भी आपके साथ शेयर किये गए हैं। पंजाब वासियों ईस्ट इंडिया कंपनी की विचारधारा रखने वाले केजरीवाल से बच के रहो

सोशल मीडिया वर बऱ्याच यूजर्स ने अश्या आशयाचे पोस्ट शेअर केले आहे.

तपास:

विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी ह्या चित्राचा तपास, यांडेक्स टूल द्वारे केला. आम्हाला हे चित्र बऱ्याच वेबसाईट्स वर मिळाले. दैनिक जागरण वर 6 ऑक्टोबर, 2021 रोजी प्रकाशित एका बातमीत हे चित्र आम्हाला मिळाले. ह्या बातमीची हेडलाईन होती: फुटपाथ पर मरीजों का इलाज करने वाला डाक्टर बेनकाब. बातमी प्रमाणे, डेंगू, व्हायरल आणि अन्य रोगांच्या कहर मुळे एका डॉक्टर ने रेजिस्ट्रेशन नसलेला दवाखाना फुटपाथ वर चालवला. बीएएमएस डिग्री असून पण हा डॉक्टर रुग्णांचा तपास, ऍलोपॅथिक पद्धतीने करत होता. ह्या रुग्णांकडून तो पूर्ण फेस देखील घेत होता. ह्या व्हायरल व्हिडिओ नंतर, स्वास्थ्य विभागाने, रुग्णांना दुसऱ्या दवाखान्यात पाठवून हे दवाखाना सील केला.

patrika.com वेबसाईट वर 5 ऑक्टोबर, 2021 रोजी ची ह्याच घटनेची एक रिपोर्ट आम्हाला मिळाली. रिपोर्ट प्रमाणे, “फिरोझाबाद मध्ये बिना नावाचा एक दवाखाना, रुग्णांना डिव्हायडर वर बसवून चालत होता, स्वास्थ्य विभागाने त्याला सील केले”, हि पूर्ण बातमी इथे वाचा.

mediavigil.com ह्या वेबसाईट वर देखील आम्हाला ह्या संबंधी बातमी मिळाली. बातमी प्रमाणे, “डॉ अश्विनी गुप्ता कस्बा कठफोरी मध्ये नर्सिंग होम चालवतात. सोमवारी ह्या नर्सिंग होम चा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली. ह्या संबंधी डीएम चंद्र विजय सिंह ह्यांनी स्वास्थ्य विभाग च्या अधिकाऱ्यांना सांगितले आणि तपासाचे आदेश दिले. डीएम च्या निर्देशावर एसीएमओ डॉ. अशोक कुमार ह्यांच्या नेतृत्वात स्वास्थ्य विभागाची टीम तिथे पोहोचली. तपासानंतर ह्या रुग्णालयाला सील करण्यात आले.” हि पूर्ण बातमी इथे वाचा.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपासात सहयोगी दैनिक जागरण चे आगरा चे डिजिटल हेड प्रतीक गुप्ता ह्यांना संपर्क केला. त्यांनी आमच्यासोबत हा फोटो व्हाट्सअँप वर शेअर केला आणि सांगितले हा फोटो दिल्ली चा नाही, फिरोझाबाद चा आहे. त्यांनी म्हंटले कि आपल्या रुग्णांचा तपास करायला फूटपाथ वर ह्या डॉक्टर ने झोपवले आणि चित्र तेव्हाचे आहे. ह्या दवाखान्याला सील करण्यात आले होते. ह्याचा दिल्ली सोबत चा काही संबंध नाही.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने खोट्या दाव्यासह फेसबुक वर हा चित्र शेअरकरणाऱ्याचा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि यूजर ला, 624 लोकं फॉलो करतात आणि पेज 1 ऑगस्ट, 2020 रोजी बनवला गेला.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. विश्वास न्यूज ला समजले कि हे चित्र दिल्ली चे नसून युपी च्या फिरोझाबाद चे आहे, जेव्हा एका डॉक्टर ने फूटपाथ वर सगळ्या रुग्णांचा तपास केला.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट