Fact Check: चित्तोडगड च्या शृंगार चौरी मंदिराचे चित्र मस्जिद चे सांगून व्हायरल
राजस्थानच्या चित्तोडगड किल्ला संकुलात असलेल्या शृंगार चौरी मंदिराचे छायाचित्र मशीद असल्याचा दावा करून व्हायरल होत आहे. या मंदिराचा वरचा भाग घुमटाच्या आकारात आहे, पण ती मशीद नाही.
- By: Abhishek Parashar
- Published: Jun 3, 2022 at 01:12 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ मध्ये मंदिरासारखी एक इमारत दिसते, ज्यावर जुंबाद सारखी एक आकृती दिसते. दावा केला जात आहे कि व्हिडिओ मध्ये दिसत असलेली इमारत वरून मंदिर तर खालून मस्जिद आहे.
विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा निघाला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसणारी रचना ही मंदिराचीच आहे. राजस्थानच्या चित्तोडगड किल्ल्यातील हे शृंगार चौरी मंदिर आहे. मंदिराचे वरचे टोक गोलाकार घुमटासारखे दिसते, परंतु हे मंदिर पाडून मशीद बांधण्याची घटना नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Sarita Kumari Mali’ ने व्हायरल व्हिडिओ (आर्काइव्ह) शेअर केली आणि लिहले: 👆👇नीचे से मंदिर ऊपर मस्जिद,
यही है गंगा जमुनी तहजीब.
इसीलिए मजहबी लोगों को मस्जिद के सर्वे पर तकलीफ़ हो रही है, ज़रा महसूस कीजिए मंदिरों के टूटने पर हिंदुओं को कितना दर्द हुआ होगा???”
सोशल मीडिया वर वेग-वेगळ्या प्लॅटफॉर्म वर अन्य यूजर देखील हा व्हिडिओ मिळत्या जुळत्या दाव्यासह शेअर करत आहे.
तपास:
गुगल रिव्हर्स इमेज सर्चमध्ये हे चित्र thinkparticle.com या वेबसाईटवर सापडले. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हे राजस्थानच्या चित्तोडगड किल्ल्याच्या आत असलेले शृंगार चौरी मंदिर आहे, जे 1448 मध्ये वेलाकाने बांधले होते.
या मंदिराचे मोठे चित्र commons.wikimedia.org वर मोठ्या आकारात पाहता येईल. alamy.com या फोटो एजन्सीच्या वेबसाईटवरही हा फोटो मोठ्या फ्रेममध्ये पाहता येईल. दिलेल्या माहितीनुसार, हे चित्र एका जुन्या हिंदू मंदिराचे आहे, ज्याचा वरचा भाग घुमटाच्या आकारात आहे आणि ते राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये आहे.
ignca.gov.in या वेबसाईटवर या मंदिराची इतर अनेक छायाचित्रे आणि त्यासोबत दिलेले वर्णनही पाहायला मिळाले. एका चित्रासह दिलेल्या माहितीनुसार, ‘मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाजा, स्तंभावरील शिलालेखानुसार कोला महाराणा हे कुंभाचे खजिनदार होते, असे सूचित करते. कोलाचा मुलगा वेलका याने 1449 मध्ये हे मंदिर बांधले आणि जिन सागर सूरीने या मंदिरात आपला जीव दिला. पुढे बनबीरने हे मंदिर मोठ्या भिंतीने बंद केले. आता हे मंदिर खुले झाले आहे.
व्हायरल चित्राबाबत, आमचे सहकारी, नई दुनियाचे उदयपूरचे प्रतिनिधी सुभाष शर्मा यांनी चित्तोड दुर्ग येथील सेंट्रल ऑर्कोलॉजीमधील तज्ज्ञ विवेक वैष्णव यांच्याशी संपर्क साधला. वैष्णव म्हणाले, ‘मुस्लीम राज्यकर्त्यांपासून मंदिरांचे रक्षण करण्यासाठी शिखरांना असे स्वरूप दिले गेले की ते सुरक्षित राहतील. चित्तोड किल्ल्याच्या मंदिरातही असेच केले गेले.
नंतर या संरचनेत कोणतेही बदल केले गेले नाहीत, त्यामुळे मंदिर पाडून मशीद बांधली गेली असा भ्रम निर्माण झाला आहे. सुभाष शर्मा यांनी देखील पुष्टी केली की चित्तौडगड किल्ला संकुलात कोणतीही मशीद अस्तित्वात नाही आणि व्हायरल होत असलेले चित्र मंदिराचे आहे, ज्याचा वरचा भाग घुमटाच्या आकारात आहे.
निष्कर्ष: राजस्थानच्या चित्तोडगड किल्ला संकुलात असलेल्या शृंगार चौरी मंदिराचे छायाचित्र मशीद असल्याचा दावा करून व्हायरल होत आहे. या मंदिराचा वरचा भाग घुमटाच्या आकारात आहे, पण ती मशीद नाही.
- Claim Review : नीचे मस्जिद ऊपर से मंदिर
- Claimed By : FB User-Sarita Kumari Mali
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.