Fact Check: तुर्कमेनिस्तान मध्ये मोफत पाणी, गॅस आणि वीज नाही मिळत आहे, व्हायरल दावा खोटा आहे
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा भ्रामक असल्याचे समोर आले. तुर्कमेनिस्तान मध्ये २०१८ नंतर पाणी, गॅस आणि वीज मोफत मिळत नाही. जनतेला याचे पैसे द्यावे लागतात.
- By: Pallavi Mishra
- Published: Jun 23, 2021 at 09:20 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक दावा व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि तुर्कमेनिस्तान जगातील एकमेव असा देश आहे जिथे पाणी, गॅस आणि वीज जनतेसाठी मोफत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा भ्रामक असल्याचे समजले. तुर्कमेनिस्तान मध्ये २०१८ साल पासून पाणी, गॅस आणि वीज मोफत नाही आहे. जनतेला याचे पैसे द्यावे लागतात.
काय होत आहे व्हायरल?
Factified नावाच्या पेज ने 20 जून रोजी एक छायाचित्र शेअर केले, ज्यावर लिहले होते: पूरी दुनिया में तुर्कमेनिस्तान एक मात्र ऐसा देश है, जहा लोगो को पानी, गैस और बिजली 1993 से लेकर आज तक मुफ्त में दी जाती हैं
या पोस्ट ला २२००० पेक्षा अधिक लोकांनी शेअर केले आहे.
हि पोस्ट आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल दाव्याचे तपास आम्ही कीवर्ड सर्च ने केली. आम्हाला बऱ्याच बातम्या मिळाल्या ज्याप्रमाणे २०१८ मध्ये आलेल्या नव्या नियमाप्रमाणे, तुर्कमेनिस्तानमध्ये पाणी, गॅस आणि वीज मोफत नाही आहे. या बिल प्रमाणे लोकांना याचे पैसे द्यावे लागतात.
rferl.org/ मध्ये २६ सप्टेंबर मध्ये प्रकाशित एका बातमी प्रमाणे, “तुर्कमेनिस्तान चे राष्ट्रपती गुरबांगुली बर्डीमुक्खमेदोव ने एका डिक्री वर हस्ताक्षर केले आहे, जे 1990 च्या दशकापासून तुर्कमेनिस्तान च्या रहिवाश्यांना मोफत पाणी, गॅस आणि वीज उपलब्ध करून देणारे कार्यक्रम संपवत आहे. २६ सप्टेंबर मध्ये मीडिया नि प्रकाशित केलेली हि डिक्री 2019 पासून सुरु होईल.” या बातमीचे फोल्लोअप इथे वाचा.
या विषयावर अधिक माहिती साठी आम्ही https://turkmen.news/ चे एडिटर Ruslan Myatiev यांना मेल द्वारे संपर्क केला. त्यांनी आम्हाला इंग्रजीत उत्तर दिले: You are right, there is nothing free in Turkmenistan any more. All utilities are paid, including gasoline.
अनुवाद: तुर्कमेनिस्तान मध्ये आता काहीच मोफत मिळत नाही. गैसोलीन सहित सगळ्यात गोष्टींसाठी पैसे द्यावे लागतात.
व्हायरल दावा शेअर करणाऱ्या Factified नामक पेज चा आम्ही तपास केला. या पेज ला 1,281,745 लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा भ्रामक असल्याचे समोर आले. तुर्कमेनिस्तान मध्ये २०१८ नंतर पाणी, गॅस आणि वीज मोफत मिळत नाही. जनतेला याचे पैसे द्यावे लागतात.
- Claim Review : तुर्कमेनिस्तान मध्ये मोफत पाणी, गॅस आणि वीज
- Claimed By : Factified
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.