Fact Check: चार वर्ष जुना व्हिडिओ आताचा सांगून दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह होत आहे व्हायरल
जानेवारी 2018 मध्ये महोली तहसील मध्ये ब्लॅंकेट वाटप कार्यक्रमाच्या वेळी गोंधळ झाला होता. व्हायरल व्हिडिओ तेव्हाचाच आहे जो आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल होत आहे.
- By: Sharad Prakash Asthana
- Published: Jan 29, 2022 at 04:20 PM
- Updated: Feb 15, 2024 at 12:14 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): यूपी निवडणूक 2022 संदर्भात अनेक जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत आणि दिशाभूल करणारे दाव्यासह शेअर करण्यात येत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. 1.28 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये ब्लँकेट वाटप कार्यक्रमाचे बॅनर दिसत आहे. यामध्ये अनेकजण आपापसात भांडत आहेत. खुर्च्याही फेकल्या जात आहेत. यावेळी पोलीस कर्मचारीही तेथे उपस्थित असल्याचे दिसत आहे. सीतापूरच्या महोली तहसीलमध्ये भाजप खासदार रेखा वर्मा यांनी आमदार शशांक त्रिवेदी यांना त्यांच्या मर्यादेत राहण्यास सांगितले, असा दावा केला जात आहे. ह्या दरम्यान काही लोकांनी शिवीगाळ केला तसेच जोडे चपला देखील फेकल्या.
विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हा व्हिडिओ जवळपास चार वर्ष जुना आहे. जानेवारी 2018 चा व्हिडिओ आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल होत आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Aman Yadav ने 24 जानेवारी 2022 रोजी हा व्हिडिओ पोस्ट करून लिहले: सीतापुर की महोली तहसील में भाजपा सांसद रेखा वर्मा ने विधायक शशांक त्रिवेदी को औकात में रहबे को कहा फिर जूता-चप्पल और गालियां शुरू हो गई। निश्चित तौर पर भाजपा में ब्राह्मणों को तो औकात में रहना ही है।
तपास:
व्हायरल दावा तपासण्यासाठी, आम्ही कीवर्डसह बातम्या शोधल्या. यामध्ये आम्हाला 14 जानेवारी 2018 रोजी अमर उजाला मध्ये प्रकाशित व्हिडिओ बातमी आढळली. यामध्ये व्हायरल व्हिडिओही दिसला. यानुसार सीतापूरमध्ये ब्लँकेट वाटपादरम्यान भाजप खासदार रेखा वर्मा आणि आमदार शशांक त्रिवेदी यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. या घटनेनंतर खासदार आणि आमदार यांच्यात समझोता झाला. कोणीही एफआयआर दाखल केलेला नाही.
पुढील तपासात, आम्हाला जागरणमध्ये प्रकाशित 13 जानेवारी 2018 च्या बातमीची लिंक मिळाली. त्यात असे लिहिले आहे की, ही बाब महोली तालुक्यात ब्लँकेट वाटपादरम्यानची आहे. कार्यक्रमात भाजप खासदार रेखा वर्मा आणि महोलीचे आमदार शशांक त्रिवेदी यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि गोंधळ झाला.
याबाबत सीतापूर येथील दैनिक जागरणचे वरिष्ठ वार्ताहर गोविंद मिश्रा सांगतात, सुमारे चार वर्षांपूर्वी महोली तहसीलमध्ये ब्लँकेट वाटपादरम्यान वाद झाला होता. व्हायरल झालेला व्हिडिओ जानेवारी 2018 चा आहे.
आम्ही फेसबुक यूजर अमन यादवचे प्रोफाईल स्कॅन केले, ज्याने सुमारे चार वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल केला आणि दिशाभूल करणारा दावा केला. तो एका राजकीय विचारसरणीने प्रेरित आहे.
निष्कर्ष: जानेवारी 2018 मध्ये महोली तहसील मध्ये ब्लॅंकेट वाटप कार्यक्रमाच्या वेळी गोंधळ झाला होता. व्हायरल व्हिडिओ तेव्हाचाच आहे जो आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल होत आहे.
- Claim Review : नुकतेच भाजप खासदार रेखा वर्मा आणि आमदार शशांक त्रिवेदी यांच्यात खडाजंगी झाली.
- Claimed By : Aman Yadav
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.