Fact Check : नीता अंबानी यांच्या नावावर परत एकदा खोटा ट्विट व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात नीता अंबानी च्या नावावर व्हायरल झालेला ट्विट खोटा आढळला. त्यांचा सोशल मीडिया वर कुठलाच अकाउंट नाही आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Sep 10, 2020 at 01:46 PM
- Updated: Sep 10, 2020 at 07:37 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर नीता अंबानी च्या नावानी एक फेक (खोटा) ट्विट व्हायरल होत आहे. यात दावा केला जात आहे कि नीता अंबानी यांनी मुसलमानांवर एक ट्विट केला आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट ची तपासणी केली आणि त्यात हा दावा आणि ट्विट खोटा ठरला. नीता अंबानी या कोणत्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर नाहीत.
काय होत आहे व्हायरल?
प्रभा शर्मा नावाच्या एका यूजर ने ‘AajTak Live’ या फेसबुक पेज वर नीता अंबानी चा एक खोटा ट्विट अपलोड केला आहे. ट्विट मध्ये नमूद केल्याप्रमाणे, @NitaMambani या ट्विटर अकाउंट द्वारे लिहल्या गेले आहे: “पेट से तो बच्चा हिंदू निकलता है बाहर उसकी मुसलमानी की जाती है..अल्लाह में ताकत है तो खतना हुआ बच्चा पैदा करके दिखाये…“
फेसबुक पोस्ट चा अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी त्या ट्विट चा शोध घेण्यास सुरु केला, जो नीता अंबानींच्या नावावर व्हायरल झाला आहे. या साठी आम्ही @NitaMambani या ट्विटर अकाउंट चा शुद्ध घेण्यास सुरुवात केली. त्यात आम्हाला कळले कि या नावाचा ट्विटर अकॉउंट होता, पण त्याला सस्पेंड करण्यात आले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे कि हा एक खोटा ट्विटर हॅन्डल आहे.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही रिलायन्स इंदूस्ट्रीज च्या जनसंपर्क अधिकाऱ्याला संपर्क केला. त्यांनी व्हायरल ट्विट चे खंडन केले आणि विश्वास न्यूज ला सांगितले कि अंबानी परिवारातील कुठलाच व्यक्ती ट्विटर वापरात नाही.
विश्वास न्यूज ने खोटा पोस्ट पसरणाऱ्या यूजर प्रभा शर्मा च्या अकॉउंट चा तपास करायचा प्रयत्न केला, पण त्यांचा अकाउंट आम्हाला लॉक असल्याचे जाणवले.
अंबानी परिवाराबद्दल काही फॅक्ट-चेक्स तुम्ही इथे वाचा.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात नीता अंबानी च्या नावावर व्हायरल झालेला ट्विट खोटा आढळला. त्यांचा सोशल मीडिया वर कुठलाच अकाउंट नाही आहे.
- Claim Review : नीता अंबानी यांच्या नावावर खोटा ट्विट व्हायरल
- Claimed By : फेसबुक यूजर प्रभा शर्मा
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.