विश्वास न्यूज च्या तपासात पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नावाने व्हायरल होत असलेला ट्विट खोटा असल्याचे समजले. ते सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह नाही.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नावावर एक खोटी ट्विट व्हायरल होत आहे. यात दावा करण्यात येत आहे कि त्यांनी ट्विट केले आणि लिहले कि जास्ती मुलं झाल्यास सरकारी सुविधा मिळणार नाहीत. हि घोषणा स्वतः आपल्या आईबाबांची सातवी संतान करत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि हा ट्विट मनमोहन सिंह यांच्या नावाने बनलेल्या एका पेरोडी अकाउंट वरून व्हायरल होत आहे. लोकं या ट्विट ला खरे समजून व्हायरल करत आहे. पूर्व पंतप्रधान यांचे सोशल मीडिया वर कुठलेच अकाउंट नाही आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर प्रदीप कुमार यांनी 26 जून रोजी एक ट्विट चा स्कीनशॉट शेअर केला आणि लिहले: फेंकू का बोल के मार रहा है।
ट्विट मध्ये मनमोहन सिंह यांच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे. सोबत लिहले आहे: 2 से अधिक संतान हुए तो नही मिलेगी सरकारी सुविधाएं, यह ऐलान खुद अपने माता-पिता की 7वीं संतान कर रही है
या ट्विट चा कन्टेन्ट जसा च्या तास इथे लिहला गेला आहे. फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी @Dr_manmohan_1 नावाच्या ट्विटर हॅन्डल ला सर्च करण्यास सुरुवात केली. आम्हाला या नावाचा ट्विटर हॅन्डल मिळाला.
यात स्पष्ट लिहले आहे कि हा एक पेरोडी अकाउंट आहे. याला तुम्ही इथे बघू शकता. आम्हाला कळले कि यूजर्स या ट्विट ला मनमोहन सिंह यांचे समजून व्हायरल करत आहे.
व्हायरल पोस्ट संदर्भात विश्वास न्यूज ना काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव (मीडिया) प्रणव झा यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह ये सोशल मीडिया वर नाही.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने फेसबुक यूजर प्रदीप कुमार यांच्या प्रोफाइल चा तपास सुरु केला. त्यात कळले कि यूजर चे चार हजार पेक्षा जास्ती मित्र आहेत. यूजर हैदराबाद चे रहिवासी आहेत. हा अकाउंट ऑगस्ट २०१७ मध्ये बनवला गेला होता.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नावाने व्हायरल होत असलेला ट्विट खोटा असल्याचे समजले. ते सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923