Fact Check: ‘पठाण’ चित्रपटावरून शाहरुख च्या नावाने खोटे वक्तव्य व्हायरल

विश्वास न्यूजने तपासात शाहरुख खानला दिलेले व्हायरल विधान खोटे असल्याचे आढळून आले. शाहरुखने असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी या चित्रपटाबाबत सुरु असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. या चित्रपटाला रस्त्यावरून सोशल मीडियापर्यंत विरोध होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जात आहे ज्यामध्ये शाहरुख खानने पठाण हा चित्रपट मुसलमानांनी पाहिला नाही तरी पठाणला हिट होण्यापासून रोखू शकत नाही, असे विधान केले आहे.

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात आढळले कि हि पोस्ट खोट्या डाव्या सह व्हायरल करण्यात येत आहे. शाहरुख खान ने असे कुठलेही वक्तव्य केले नाही. व्हायरल दावा खोटा आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर राजेश नरसरिया ने 26 जानेवारी 2023 रोजी व्हायरल पोस्ट शेअर केले आणि लिहले, “शाहरुख का बड़ा बयान…मुसलमान पठान फिल्म नही देखेंगे भी तो पठान को हिट होने से नही रोक सकते।”

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल दाव्याची सत्यता तपासण्यासाठी, विश्वास न्यूजने प्रथम इंटरनेटवर त्याच्याशी संबंधित मीडिया रिपोर्ट्स शोधले, परंतु दाव्याला पुष्टी देणारा कोणताही अहवाल त्यांना सापडला नाही. शाहरुख खान हे चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे, जर त्याने अशी मुलाखत दिली असती किंवा असे काही बोलले असते तर त्याची मीडियात चर्चा नक्कीच झाली असती.

तपास पुढे नेत, शाहरुख खानचे ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट देखील शोधले गेले, परंतु व्हायरल पोस्टमध्ये दावा केल्यानुसार आम्हाला अशी कोणतीही माहिती सापडली नाही.

अधिक माहितीसाठी विश्वास न्यूजने शाहरुख खानच्या पीआर टीमशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले, व्हायरल दावा खोटा आहे. शाहरुख खानने असे कोणतेही विधान केलेले नाही.

विश्वास न्यूजने दैनिक जागरण, मुंबई येथील ज्येष्ठ मनोरंजन रिपोर्टर स्मिता श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यासोबत व्हायरल पोस्टची लिंकही शेअर केली. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. शाहरुख खानने असे कोणतेही विधान केलेले नाही.

तपासाअंती, आम्ही ही पोस्ट शेअर करणाऱ्या राजेश नरसारियाचे सोशल स्कॅनिंग केले. स्कॅनिंगमध्ये असे दिसून आले की युजरचे फेसबुकवर 716 मित्र आहेत. प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, युजर कोलकाता येथील रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने तपासात शाहरुख खानला दिलेले व्हायरल विधान खोटे असल्याचे आढळून आले. शाहरुखने असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट