नवी दिल्ली (विश्वास न्यूज). उत्तर प्रदेश नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होण्यापूर्वी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे नाव सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दावा केला जात आहे की, अखिलेश यादव यांनी पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्वांचलमध्ये 2,000 नवीन मशिदी बांधण्याचे, अयोध्याचे नाव बदलण्याचे, दलित आणि मागासवर्गीयांना आरक्षण कमी करण्याचे, मुस्लिमांना आरक्षण देण्याचे आणि लव्ह जिहाद कायदा रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे.
विश्वास न्यूजला तपासात अखिलेश यादव यांच्या नावाने खोटा दावा व्हायरल केला जात असल्याचे आढळले आहे. सपा अध्यक्षांच्या नावाने शेअर केले जात असलेले हे पोस्टर बनावट आहे. पक्षाकडून अशी कोणतीही पोस्ट करण्यात आलेली नाही.
फेसबुक वापरकर्ता ‘मधुसूदन कुमार सिन्हा‘ (संग्रहित लिंक)ने 24 एप्रिल रोजी हे पोस्टर शेअर केले आहे. त्यात लिहिलेले आहे की,
“पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्वांचलमध्ये 2000 नवीन मशिदी बांधण्यात येणार आहेत, अयोध्येतील बाबरी मशिदीसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, अयोध्येचे नाव बदलण्यात येणार आहे, दलित आणि मागासवर्गीयांचे आरक्षण 30 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार आहे, जिहाद कायदा रद्द केला जाईल, मुस्लिमांसाठी हे वचन आहे, अखिलेश यादव”
आम्हाला विश्वास न्यूजच्या टिपलाइन नंबर +91 95992 99372वर व्हायरल पोस्टर देखील तपासायला मिळाले.
अखिलेश यादव यांच्या नावावरील व्हायरल पोस्टरची चौकशी करण्यासाठी आम्ही प्रथम कीवर्डसह गुगलवर ओपन सर्च केला, परंतु आम्हाला या दाव्याची पुष्टी करणारी कोणतीही बातमी सापडली नाही. जर सपाने असे कोणतेही आश्वासन दिले असते किंवा घोषणा केली असती, तर प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आल्या असत्या. खासकरून उत्तर प्रदेशच्या मिडियाने निश्चितच याची बातमी दिली असती.
यानंतर आम्ही सपा चे अधिकृत ट्विटर खाते तपासले, परंतु आम्हाला असे कोणतेही पोस्टर किंवा स्टेटमेंट सापडले नाही.
या संबंधात फेसबुकवर कीवर्ड सर्च केल्यानंतर आम्हाला कळले की, ही पोस्ट जानेवारी 2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच व्हायरल झाली आहे. त्यावेळी काहींनी तिला शेअर केले होते.
अधिक माहितीसाठी, आम्ही समाजवादी फॅक्ट चेक खात्यावर देखील याबद्दल शोध घेतला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 2022च्या आधी त्याच्या नावाने व्हायरल झालेल्या पोस्टबद्दल सांगण्यासाठी हे खाते तयार करण्यात आले होते. 11 जानेवारी 2022 रोजी व्हायरल झालेल्या पोस्टरबद्दल हे ट्विट करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, हा स्क्रीनशॉट खोटा आहे.
याबाबत अधिक पुष्टीकरणासाठी आम्ही सपा चे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. आशुतोष वर्मा यांच्याशी बोललो. त्यांचे म्हणणे आहे की, “2022च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही या प्रकारची बनावट पोस्ट व्हायरल झाली आहे. पक्षाकडून एक ट्विटही करण्यात आले आहे. हे सर्व विरोधी पक्षांच्या आयटी सेलचे काम आहे.”
यापूर्वी जानेवारी 2022 मध्ये जेव्हा हे पोस्टर व्हायरल झाले होते, तेव्हा विश्वास न्यूजने याचा तपास केला होता. त्यावेळी आम्ही दैनिक जागरणचे रिपोर्टर शोभित श्रीवास्तव यांच्याशी बोललो होतो. त्यांनी देखील याला बनावट म्हटले होते.
तपासाच्या शेवटी, आम्ही बनावट पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्ता ‘मधुसूदन कुमार सिन्हा‘चे प्रोफाइल स्कॅन केले ज्याने. त्यानुसार, तो एक विचारसरणीद्वारे प्रभावित असल्याचे आढळून आले. वापरकर्त्याने प्रोफाइलमध्ये कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
निष्कर्षः समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नावावर सोशल मीडियावर करण्यात आलेला दावा खोटा आहे. व्हायरल पोस्टर फेक आहे आणि सपा कडून असे कोणतेही पोस्टर जारी करण्यात आलेले नाही. पार्टीने याला बनावट म्हटले आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923