बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे जे सवर्ण मतदारांवर, ABP न्यूज चॅनेल च्या ब्रेकिंग न्यूज च्या प्लेटवर व्हायरल होत असलेले वक्तव्य आहे, ते खोटे आणि बनावटी आहे. बिहार मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य केले नाही.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. असे झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध अफवा पसरत आहेत. अश्याच व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट मध्ये, ABP न्यूज चॅनेल ची ब्रेकिंग न्यूज ची टेम्प्लेट दिसते, ज्यावर बिहार चे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे एक वक्तव्य व्हायरल होत असल्याचे दिसते. असा दावा केला जात आहे कि त्यांनी सवर्ण मतदारांच्या विरोधात एक विधान केले आहे, कारण ते त्यांचे मतदार नाहीत.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा आणि नितीश कुमार यांच्या विरोधातला एक दुष्प्रचार आढळला. त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले विधान खोटे आणि बनावटी आहे. तसेच, जी ब्रेकिंग न्यूज ची प्लेट वापरण्यात आली आहे ती देखील एडिट करून बनवण्यात आली आहे.
काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया यूजर, ‘Keshav Krishna’ यांनी हि व्हायरल पोस्ट शेअर करून आपल्या प्रोफाइल वर लिहले, “Lijye ab bhi Kuch ijjat bachi he to bachiye yahi value rah gai he“.
हीच पोस्ट याच दाव्यासह अनेक यूजर ने शेअर केली आहे.
या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.
तपास:
कोणत्यापण न्यूज चॅनेल ची ब्रेकिंग न्यूज ची प्लेट बनवणायची एक स्वतंत्र अशी शैली आणि पद्धत असते. त्यांची डिजाइन हि इतरांपेक्षा वेगळी असते. यात फॉन्ट एकसारखा असतो. पण व्हायरल होत असलेल्या प्लेट मध्ये विविध फॉन्ट बघितले जाऊ शकतात.
तसेच एखाद्या न्यूज चॅनेल च्या ब्रेकिंग न्यूज प्लेट मध्ये जी कोणती बातमी शेअर केली जाते, त्याचे व्याकरण शुद्ध असते आणि त्यात भाषेच्या चुका नसतात. पण व्हायरल होत असलेल्या प्लेट मध्ये बऱ्याच व्याकरण आणि भाषेच्या चुका झालेल्या दिसतात.
प्राथमिक निरीक्षणावरून असे म्हंटले जाऊ शकते कि ABP चॅनेल ची व्हायरल होत असेलेली प्लेट खोटी आणि एडिटेड आहे. याच्या पुष्टी करता आम्ही ABP च्या वेरिफाइड ट्विटर हॅन्डल वर असलेल्या ABP च्या ब्रेकिंग न्यूज च्या प्लेट ची तुलना व्हायरल होत असलेल्या प्लेट सोबत केली, ज्यात आम्हाला हे स्पष्ट दिसले कि व्हायरल होत असलेली ब्रेकिंग न्यूज ची प्लेट एडिटेड आहे.
तपासात आम्हाला असे देखील कळले कि ABP च्या खऱ्या प्लेट मध्ये फॉन्ट एकसारखे होते तसेच व्हायरल प्लेट मध्ये ते अगदी वेगळे होते.
एबीपी च्या संपादकीय विभागात कार्यरत एका पत्रकाराने आम्हाला सांगितले, “हि व्हायरल होत असलेली प्लेट स्पष्टपणे एडिटेड आहे. यात विविध फॉन्ट्स चा वापर केला गेला आहे, आणि भाषेच्या आणि व्याकरणाच्या चुका यात दिसतात.” म्हणजेच ABP ची प्लेट खोटी आणि एडिटेड निघाली.
बिहार मधील निवडणूक तीन टप्प्यात होणार असून २४३ जागांसाठी , २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी निवडणूक होतील आणि निकाल हे १० नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.
नंतर आम्ही न्युज सर्च मध्ये कुठली बातमी मिळते का ते बघितले. काही बातम्यांप्रमाणे नितीश कुमार ने राज्य सवर्ण आयोग चे गठन करण्याचे आश्वासन दिले होते आणि आयोगाची रिपोर्ट आल्यानंतर त्याला लागू देखील केले. ‘प्रभात खबर’ च्या संकेतस्थळावर २४ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित एक बातमी आम्हाला मिळाली त्यात दिल्याप्रमाणे, देशात सवर्ण आयोग बनवणारे आणि त्याच्यावर अमल करणारे बिहार हे एकमेव राज्य आहे.
यातून हे स्पष्ट होतं कि नितीश कुमार यांनी सवर्ण मतदारांवरून व्हायरल वक्तव्य नाही केले, ज्याचा दावा पोस्ट मध्ये केला आहे.
व्हायरल पोस्ट शेअर करणारे यूजर ने आपल्या प्रोफाइल मध्ये म्हंटल्याप्रमाणे ते पटना, बिहार चे रहिवासी आहेत. त्यांच्या प्रोफाइल ला १०० पेक्षा जास्ती लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे जे सवर्ण मतदारांवर, ABP न्यूज चॅनेल च्या ब्रेकिंग न्यूज च्या प्लेटवर व्हायरल होत असलेले वक्तव्य आहे, ते खोटे आणि बनावटी आहे. बिहार मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य केले नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923