फॅक्ट चेक: मुंबईतील अतिक्रमण हटवण्याचा व्हिडिओ यूपी (UP)चा सांगून पसरवला जात आहे भ्रम
- By: Pragya Shukla
- Published: Apr 11, 2023 at 09:36 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). एका मुस्लिम व्यक्तीद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम थांबवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील एक व्यक्तीद्वारे तिच्याकडे न्यायालयाचा आदेश असूनही, अधिकारी बुलडोझर चालवण्यावर ठाम असल्याच्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये आता अधिकाऱ्यांनी बुलडोझर चालवण्याची मनमानी सुरू केली आहे.
विश्वास न्यूजला तिच्या तपासात हा व्हायरल व्हिडिओचा उत्तर प्रदेशशी संबंधित नसल्याचे आढळून आले आहे. व्हायरल व्हिडिओ मुंबईचा आहे, ज्याला आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल केले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचे नाव हाजी रफत हुसेन आहे.
काय व्हायरल होत आहे?
फेसबुक वापरकर्ता, सिराज ए हिंद जौनपूरने, 30 मार्च, 2023 रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताना वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “उत्तर प्रदेशातील अधिकारी फॅन्सी ड्रेस घालून कोर्टाच्या आदेशाचे पालन करत नाहीत. व्हिडिओमध्ये जो माणूस दिसतोय तो म्हणतोय की, माझ्याकडे न्यायालयाचा आदेश आहे, पण हा सजलेला धजलेला अधिकारी म्हणतोय की, मी न्यायालयाचा आदेश मानत नाही, बुलडोझरचा कारभार सुरू आहे, यूपी (UP)मध्ये नियमांची पायमल्ली केली जात आहे.
पोस्टच्या संग्रहित दुव्याला येथे पाहिले जाऊ शकते.
तपास
व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही आधी तो व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. बुलडोझरवर बृहन्मुंबई महानगरपालिका असे लिहिलेले आढळले. या आधारावर, आम्ही संबंधित कीवर्डसह गुगल (Google)वर शोधण्यास सुरुवात केली. यादरम्यान, आम्हाला सियासत न्यूजच्या वेबसाइटवर व्हायरल व्हिडिओशी संबंधित एक अहवाल सापडला. हा अहवाल 29 मार्च, 2023 रोजी प्रसिद्ध झाला आहे.
या वृत्तानुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ हा, मुंबईतील सांताक्रूझ भागातील एका घटनेचा आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे वृद्ध, हाजी रफत हुसेन आहेत.
तपासादरम्यान, आम्हाला सामाजिक कार्यकर्ते, शुजा यांच्या ट्विटर अकाऊंटवर 28 मार्च रोजी अपलोड केलेला व्हायरल व्हिडिओ आढळला. या ट्विटला उत्तर देताना मुंबई बीएमसी (BMC)ने लिहिले आहे की, 20 मार्च, 2023 रोजी बीएमसी (BMC)ला सांताक्रूझ स्टेशनजवळ लोखंडी टिनपासून बनवलेले 6 बेकायदेशीर स्टॉल सापडले. 21 मार्च रोजी पोलिसांसह बीएमसी (BMC)चे अधिकारी या 6 अवैध स्टॉलवर कारवाई करण्यासाठी पोहोचले होते. या 6 स्टॉल्सबाबत मा.न्यायालयाकडून कोणताही आदेश देण्यात आलेला नाही.
अधिक माहितीसाठी आम्ही मुंबईस्थित पत्रकार श्री. ब्रिजेश पाठक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की, हा व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ मुंबईतील सांताक्रूझ भागातील आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचे नाव हाजी रफत हुसेन आहे.
आमच्या तपासाअंती, आम्ही सिराज ए हिंद जौनपूर वापरकर्त्याचे खाते स्कॅन केले, ज्याने हा व्हायरल व्हिडिओ भ्रामक दाव्यासह शेअर केला होता. स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळले की, वापरकर्त्याचे 2,262 मित्र आणि 32 फॉलोअर्स आहेत. प्रोफाइलवरील माहितीनुसार, वापरकर्ता हा यूपी (UP)चा आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला आपल्या तपासात असे आढळून आले की, व्हायरल व्हिडिओचा उत्तर प्रदेशशी कोणताही संबंध नाही. व्हायरल व्हिडिओ हा मुंबईचा आहे, ज्याला आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचे नाव हाजी रफत हुसेन आहे.
- Claim Review : उत्तर प्रदेशात बुलडोझर चालवला जात असल्याचा व्हिडिओ.
- Claimed By : फेसबुक वापरकर्ता सिराज ए हिंद जौनपूर
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.