Fact Check: एकनाथ शिंदे ह्यांनी भाजप बद्दल हे व्हायरल वक्तव्य केले नाही, व्हायरल दावा खोटा आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपकडून दिल्या जाणाऱ्या निकृष्ट वागणुकीबाबत व्हायरल विधान केलेले नाही. व्हायरल दावा खोटा आहे.
- By: Ankita Deshkar
- Published: Aug 6, 2022 at 01:53 PM
- Updated: Aug 7, 2022 at 12:15 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेली दिसली, ह्या पोस्ट मध्ये एकनाथ शिंदे ने भाजप बद्दल वक्तव्य केले असा दावा करण्यात येत आहे. असे म्हणण्यात येत आहे कि एकनाथ शिंदे ह्यांनी म्हंटले, भाजपने माझा व माझ्या सहकाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, भाजप श्रेष्ठींकडून भिकाऱ्या सारखी वागणूक मिळते. पण विश्वास न्यूज च्या तपासात असे समोर आले कि एकनाथ शिंदे ह्यांनी असे काही वक्तव्य केले नाही.
काय होत आहे व्हायरल?
Yogesh Barkule Patil ह्यांनी फेसबुक ग्रुप “एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक” वर व्हायरल पोस्ट शेअर केले आणि लिहले: कळालं का 😂😂😂
ग्राफिक मध्ये लिहले होते: भाजपने माझा व माझ्या सहकाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, भाजप श्रेष्ठींकडून भिकाऱ्या सारखी वागणूक मिळते
- एकनाथ शिंदे
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूजने साध्या गुगल कीवर्ड सर्चसह तपास सुरू केला.
आम्हाला व्हायरल कन्टेन्ट असलेल्या बातम्यांचे रिपोर्ट्स सापडले नाहीत.
एकनाथ शिंदे अलीकडेच त्यांच्या युतीबद्दल किंवा भाजपबद्दल बोलले का ते आम्ही तपासले.
आम्हाला टाइम्स ऑफ इंडिया वर जुलै 31, 2022 एक रिपोर्ट सापडली: Issue of sharing Maharashtra CM’s post with BJP could have been resolved through talks in 2019: Eknath Shinde.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर आम्ही ग्राफिक कोठून निवडले असावे ते तपासले.
आम्ही ग्रफिक मधे वापरलेले चित्र शोधण्यास गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला. आम्हाला डेक्कन हेराल्ड मध्ये एक फोटो सापडला जो IANS चा होता बातमी होती: ‘Never demanded Chief Minister’s post’, says Eknath Shinde
आम्ही किवर्डस सह फेसबुक वर देखील शोधले. आम्हाला खरे ग्राफिक, Sarkarnama ह्या अधिकृत पेज वर मिळाले, ज्याला 5.9 लाख लोकं फॉलो करतात.
ग्राफिक मध्ये लिहले होते: राज्यपाल हे मोठं पद आहे. ते एक संविधानिक पद असून कुणाचाही अवमान होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही – एकनाथ शिंदे
हे नुकत्याच झालेल्या वादाच्या संदर्भात होते, जेथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की ‘जर राजस्थानी आणि गुजराती समुदायांना मुंबईबाहेर काढले गेले तर ते देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही’.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मीडिया कोऑर्डिनटोर विराज मुळे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी व्हायरल पोस्ट व्हाट्सअँप वर शेअर केली. एकनाथ शिंदे यांनी हे व्हायरल वक्तव्य दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. व्हायरल दावे खोटे आहेत असे देखील ते म्हणाले.
त्यानंतर आम्ही भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याशी फोनवर चर्चा केली. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी असे विधान केलेले नाही. हे नक्कीच खोटे आहे.”
पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूजने एएनआयचे प्रतिनिधी सौरभ जोशी यांच्याशी चर्चा केली, जे महाराष्ट्राचे राजकारण कव्हर करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी हे व्हायरल वक्तव्य दिलेले नाही, व्हायरल पोस्ट खोटी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शेवटच्या टप्प्यात आम्ही व्हायरल पोस्ट शेअर केलेल्या यूजर चे सोशल बॅकग्राउंड चेक केले. Yogesh Barkule Patil हे राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेलचे असून ते परतूर येथे राहतात. “एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक” या ग्रुपमध्ये ३.८ लाख सदस्य आहेत.
निष्कर्ष: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपकडून दिल्या जाणाऱ्या निकृष्ट वागणुकीबाबत व्हायरल विधान केलेले नाही. व्हायरल दावा खोटा आहे.
- Claim Review : भाजपने माझा व माझ्या सहकाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, भाजप श्रेष्ठींकडून भिकाऱ्या सारखी वागणूक मिळते - एकनाथ शिंदे
- Claimed By : Yogesh Barkule Patil
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.