Fact Check: काश्मीरचा शहीद औरंगजेबला भाऊ म्हणतानाचा उद्धव ठाकरे यांचा अपूर्ण व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल
- By: Ashish Maharishi
- Published: Mar 15, 2024 at 07:44 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल करून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
खोटा दावा करून हा व्हिडिओ यापूर्वीही एकदा व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे काश्मीरमध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिक औरंगजेबचा उल्लेख करताना त्यांना आपला भाऊ म्हणताना ऐकू येत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुघल शासक औरंगजेबला आपला भाऊ म्हटले आहे असा दावा करून सोशल मीडियावर अनेक वापरकर्ते हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
विश्वास न्यूजने तपास केला असता व्हायरल झालेली पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाले. खरे तर उद्धव ठाकरे काश्मीरचे शहीद सैनिक औरंगजेबाबद्दल बोलत होते.
त्यांचा अपूर्ण व्हिडिओ चुकीच्या संदर्भासह व्हायरल केला गेला आहे.
काय होत आहे व्हायरल
कट्टर सनातनी नावाच्या एका फेसबुक वापरकर्त्याने 29 फेब्रुवारी रोजी 30 सेकंदाचा एक व्हिडिओ अपलोड करताना लिहिले, “ हिंदूंनो, ऐका: औरंगजेब हा आमचा भाऊ होता ज्याने भारत मातेसाठी बलिदान दिले होते, राजकीय भिकाऱ्याचे घाणेरडे शब्द!
सत्तेच्या लालसेपोटी परकीय स्त्रीचे तळवे चाटताना बाळासाहेब ठाकरेंचा हा सुपुत्र एवढा वेडा झाला आहे की तो हिंदूंचा खुनी आणि शिवाजींच्या शत्रू विषयी नवा इतिहास शिकवतोय! अशा पक्षाला मराठा मतदार कसा मतदान करतो? यास सर्व मराठा मतदारांपर्यंत पोहोचवा.”
फेसबुक पोस्टचा मजकूर येथे जशाचा तसा लिहिला आहे. तो खरा असल्याचे मानून इतर वापरकर्तेही त्यास व्हायरल करत आहेत. पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहिली जाऊ शकते.
तपास
विश्वास न्यूजने इन्व्हिड या ऑनलाइन टूलद्वारे तपास सुरू केला. याच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओचे ग्रॅब्स काढण्यात आले. त्यानंतर गुगल लेन्स टूलद्वारे त्यांचा शोध घेतला असता आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक पेजवर मूळ व्हिडिओ आढळून आला. 19 फेब्रुवारी 2023 रोजी एका कार्यक्रमादरम्यान फेसबुकवरून त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. व्हायरल झालेला व्हिडिओ हा, त्याच थेट प्रक्षेपणाचा अपूर्ण आणि संपादित केलेला भाग आहे.
विश्वास न्यूजने संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकला. 32 मिनिटांनंतर उद्धव ठाकरेंना या व्हिडिओमध्ये असे बोलताना ऐकले जाऊ शकते की, “एक आपला सैनिक होता, काश्मीरमध्ये. कुटुंबीयांना भेटण्यासाठी सुटी घेऊन तो घरी जात होता. सुटी घेऊन तो एकटाच जात असल्याचे जेव्हा दहशतवाद्यांना समजले तेव्हा त्यांनी हलालसाठी त्याच दरम्यान त्याचे अपहरण केले. काही दिवसांनी त्याचा विकृत मृतदेह कुठेतरी सापडला. त्याने देशासाठी बलिदान दिले आहे. आता मी म्हणतो की तो माझा भाऊ होता. तुम्ही म्हणाल की तुम्हाला नाव माहित आहे काय? त्याचे नाव औरंगजेब होते. तो धर्माने मुस्लिम असेल, तो नक्कीच होता. पण त्याने देशासाठी बलिदान दिले. जिला भारत माता म्हणतात तिच्यासाठी त्याने आपले प्राणही दिले. तो माझा भाऊ नव्हता का? तो माझाच भाऊ होता.”
पूर्ण व्हिडिओ येथे बघितला जाऊ शकतो. प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव ठाकरे मुंबईतील अंधेरी येथे उत्तर भारतीय समाजातील लोकांशी चर्चा करत होते.
संबंधित कार्यक्रमाची बातमी एबीपी लाइव्ह वेबसाईटवरही वाचली जाऊ शकते.
विश्वास न्यूजने या व्हिडिओबाबत राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांच्याशीही संपर्क साधला होता. काही लोकांनी हा व्हिडीओ संपादित करून खोटा दावा करून व्हायरल केल्याचेही त्यांनी सांगितले.
विश्वास न्यूजने नवभारत टाइम्स, मुंबईचे राजकीय संपादक अभिमन्यू शितोळे यांच्याशीही चर्चा केली. व्हायरल झालेली पोस्ट खोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आपल्या भाषणात उद्धव, काश्मीरमध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिक औरंगजेबबद्दल बोलत होते.
विश्वास न्यूजने या व्हिडिओचा एकदा चौकाशी केली आहे. त्यावेळचा तपास इथे सविस्तर वाचता येईल.
आता खोटा दावा करणाऱ्या वापरकर्त्याची चौकशी करण्याची पाळी होती. फेसबुक वापरकर्ता कट्टर सनातनीच्या सोशल स्कॅनिंगमध्ये हे अकाऊंट पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले आहे. यामध्ये कोणतीही विशेष माहिती देण्यात आलेली नाही. आम्ही या खात्यावर अनेक जातीय आणि बनावट पोस्ट पाहिल्या.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात उघड झाले आहे की, संपादित केलेला व्हिडिओ उद्धव ठाकरेंच्या विरोधात अपप्रचार करण्याच्या उद्देशाने व्हायरल करण्यात आला होता. मूळ व्हिडिओमध्ये ते काश्मीरमध्ये शहीद झालेल्या सैनिक औरंगजेबचा संदर्भ देत होते, परंतु काही लोकांनी तो व्हिडिओ संपादित करत त्यास खोटा दावा करून व्हायरल केले होते.
- Claim Review: उद्धव ठाकरे यांनी मुघल शासक औरंगजेबला म्हटले आपला भाऊ
- Claimed By: फेसबुक वापरकर्ता कट्टर सनातनी
- Fact Check: दिशाभूल करणारा
- Claim Review : उद्धव ठाकरे यांनी मुघल शासक औरंगजेबला म्हटले आपला भाऊ
- Claimed By : फेसबुक वापरकर्ता कट्टर सनातनी
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.