X
X

Fact Check: नितीन गडकरी चा एडिटेड व्हिडिओ खोट्या संदर्भात व्हायरल

विश्वास न्यूजच्या तपासात असे आढळून आले की नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ सध्याचा असल्याचे सांगून चुकीच्या संदर्भात संपादित करून व्हायरल केला जात आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ गडकरींनी २०१३ मध्ये दिलेल्या भाषणाचा भाग आहे, ज्यात ते काँग्रेस सरकारवर टीका करत आहेत. यामध्ये पीएम मोदींचे नाव एडिटिंगद्वारे जोडण्यात आले आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीमधून हटवण्यात आल्यापासून ते चर्चेत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओचे अलीकडेच वर्णन करताना, वापरकर्ते दावा करत आहेत की नितीन गडकरींनी देशातील समस्यांसाठी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरले आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हायरल दावा खोटा निघाला. चुकीच्या संदर्भात व्हिडिओ संपादित करून शेअर केला जात आहे. मूळ व्हिडिओमध्ये नितीन गडकरी यांनी २०१३ मध्ये महाराष्ट्रातील ‘महागर्जना’ रॅलीदरम्यान केलेल्या भाषणात काँग्रेस पक्षाविषयी या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. व्हिडिओमध्ये एडिट करून पीएम मोदींचे नाव जोडण्यात आले आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर ‘समीर गुज्जर’ ने 23 सप्टेंबर रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि लिहले,’क्या #गडकरी जी को यही सच बोलने के कारण पार्टी से साइड लाइन किया गया है? हवा बदल रही है।

व्हिडिओ मध्ये नितीन गडकरी म्हणतात, “किसानों की आत्महत्या हो , बेरोजगार युवाओं की संख्या बढ़ती हो, उद्योग हमारे बंद पड़े हैं। गांव, गरीब, किसान सब दुखी है। इन सब समस्याओं का एक ही कारण है, उस नेता का नाम है नरेंद्र मोदी। दुनिया में सबसे ज्यादा महंगाई अगर कहीं है, इन्फ्लेशन का रेट सबसे ज्यादा कहीं है, देश का नाम भारत है। देश में लूट मची है। ”

दुसरे लोकं हा व्हिडिओ खरा समजून शेअर करत आहेत. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूजने व्हायरल दाव्याची चौकशी सुरू करत, प्रथम संबंधित कीवर्डसह Google शोधले. नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेले असे विधान आम्हाला कुठेही आढळले नाही. नितीन गडकरींनी असे काही विधान केले असते तर ते चर्चेत आले असते.

तपास पुढे नेत, आम्ही व्हिडिओचे अनेक ग्रॅब्स काढले आणि गुगल रिव्हर्स इमेजद्वारे शोधले. या दरम्यान आम्हाला भाजप लाइव्हच्या अधिकृत ट्विटर हँडलवर 23 डिसेंबर 2013 रोजी व्हायरल व्हिडिओशी संबंधित एक ट्विट आढळले. ट्विटमध्ये व्हिडिओचा स्क्रीनशॉट वापरण्यात आला आहे.

शोध दरम्यान, आम्हाला 23 डिसेंबर 2013 रोजी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर अपलोड केलेला मूळ व्हिडिओ सापडला. कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ मुंबईत आयोजित ‘महागर्जना रॅली’मधील आहे. मूळ व्हिडिओमध्ये नितीन गडकरी पीएम मोदींबद्दल बोलत नसून काँग्रेसबद्दल बोलत आहेत. व्हिडिओमध्ये, त्यांच्या भाषणाचा संपूर्ण भाग 8 मिनिटे 04 सेकंद ते 9 मिनिटे 45 सेकंदांपर्यंत ऐकला जाऊ शकतो. बेरोजगारी आणि महागाईसाठी त्यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारला जबाबदार धरले.

व्हायरल पोस्टच्या कमेंटमध्ये अनेक युजर्सनी या पोस्टचे एडिट केलेले वर्णन केले आहे.अधिक माहितीसाठी आम्ही भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते विजय सोनकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ संपादित केला आहे. खोटा दावा करून व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

तपासाअंती, आम्ही चुकीच्या संदर्भात हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याची तपासणी केली. तपासात हा युजर जयपूरचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. फेसबुकवर युजरला 490 लोक फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात असे आढळून आले की नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ सध्याचा असल्याचे सांगून चुकीच्या संदर्भात संपादित करून व्हायरल केला जात आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ गडकरींनी २०१३ मध्ये दिलेल्या भाषणाचा भाग आहे, ज्यात ते काँग्रेस सरकारवर टीका करत आहेत. यामध्ये पीएम मोदींचे नाव एडिटिंगद्वारे जोडण्यात आले आहे.

  • Claim Review : नितीन गडकराई ह्यांचे वक्तव्य
  • Claimed By : समीर गुज्जर
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later