X
X

Fact Check: पंख असलेल्या सापाचे चित्र ग्राफिक आहे, खरा साप नाही

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि पोस्ट दिशाभूल करणारी आहे. चित्रात दिसत असलेला साप एडिटिंग टूल्स चा वापर करून बनवण्यात आला आहे.

  • By: Pallavi Mishra
  • Published: Jul 2, 2022 at 02:58 PM
  • Updated: Jul 2, 2022 at 03:00 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंख असलेला साप दिसत आहे. हा खरा पंख असलेला साप आहे हे समजून लोक पोस्ट शेअर करत आहेत. विश्वास न्यूजने तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. चित्रात दिसणारा साप डिजिटल टूल्सच्या मदतीने बनवण्यात आला आहे.

काय होत आहे व्हायरल?
Priya Kumari नावाच्या फेसबुक यूजर (आर्काइव्ह लिंक) ने हि पोस्ट शेअर केली आणि लिहले: “नजरंदाज ना करें। 3 घंटों में भाग्य चमेगा।”

तपास:

हे चित्र तपासायची सुरुवात आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च ने केली. आम्हाला हे चित्र deviantart.com नावाच्या वेबसाइटवर सापडले. सोबतच्या डिस्क्रिप्शन प्रमाणे, ही संगणकीय ग्राफिक प्रकल्पासाठी तयार केलेली डिजिटल प्रतिमा आहे. येथे दिलेल्या माहितीनुसार, सापाचे छायाचित्र वेगळ्या वेबसाइटवरून घेतले आहे आणि पंखांचे छायाचित्र वेगळ्या वेबसाइटवरून घेतले आहे. या दोन्ही वेबसाइट्सच्या लिंक्सही येथे दिल्या आहेत.

वेबसाइटनुसार, हे चित्र ग्राफिक डिझायनर यवोन क्यू ने तयार केले आहे. आम्हाला यवोन क्यू ची वेबसाइट सापडली, ज्यामध्ये त्याने स्वतःला ग्राफिक डिझायनर म्हणून वर्णन केले. ती चिनी वंशाची कॅनेडियन आहे. आम्ही यवोन क्यू ह्यांच्यासोबाबत मेलद्वारे आणि Twitter वर संपर्क साधला. मेलला उत्तर देताना त्यांनी आम्हाला सांगितले की, “मी हे चित्र एका कॉम्प्युटर ग्राफिक प्रोजेक्टसाठी बनवले आहे. हे 2 फोटो एकत्र करून तयार केले होते. हा खरा साप नाही.

यासंदर्भात आम्ही दिल्ली विद्यापीठातील प्राणीशास्त्राच्या प्राध्यापिका उर्मिला गांगुली यांच्याशीही संपर्क साधला. पंख असलेल्या सापाबद्दल विचारले असता ते म्हणाले, “पंख असलेल्या सापासारखी कोणतीही प्रजाती नाही. तथापि, 2017 मध्ये, शास्त्रज्ञांना अमेरिकेतील टेनेसी येथे पंख असलेल्या सापाचे जीवाश्म सापडले. या विषयावर लिहिलेल्या शोधनिबंधानुसार हे अवशेष लाखो वर्षे जुने होते. पण या सापाची प्रजाती कोणत्याही सिद्ध संशोधनाशी जुळत नाही. हे चित्र स्पष्टपणे एडिट केले आहे.”

हा फोटो Priya Kumari नावाच्या फेसबुक यूजरने भ्रामक दावा करून शेअर केला आहे. प्रोफाइलनुसार, 917,259 लोक Priya Kumari ला फेसबुकवर फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि पोस्ट दिशाभूल करणारी आहे. चित्रात दिसत असलेला साप एडिटिंग टूल्स चा वापर करून बनवण्यात आला आहे.

  • Claim Review : पंख असलेला साप
  • Claimed By : Priya Kumari
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later