Fact Check: मिठा सोबत कांदा खाल्ल्याने १५ मिनटात कोरोना ठीक होण्याचा दावा खोटा आहे

कांदा आणि मीठ खाल्ल्याने १५ मिनटात कोरोनाव्हायरस च्या संक्रमणापासून ठीक होऊ शकत नाही, व्हायरल दावा खोटा आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): भारतात वाढत्या कोरोना संक्रमणाच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या देखील व्हायरल होत आहे. अशीच एक पोस्ट सोशल मीडिया वर शेअर करण्यात येत आहे, ज्यात दावा केला जात आहे कि मिठा सोबत कांदा खाल्ल्याने १५ मिनटात कोरोना संक्रमित रुग्ण पॉसिटीव्ह वरून निगेटिव्ह होतो. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर हकिम पुजारा ने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात लिहले आहे: ‘सेंधा नमक के साथ कच्ची प्याज (लाल डार्क वाली) छीलकर खाने से 15 मिनिट बाद लोग पॉजिटिव से निगेटिव हो रहे हैं ये एकदम सत्य है आप खुद करके देखे… कोरोना हो या ना हो कच्ची प्याज सेंधा नमक लगा कर रोज खाते रहें वायरस गले में ही मर जायेगा… आपको लाभ हो तो सबको शेयर जरूर करें।’
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने दाव्याच्या तपासाची सुरुवात आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ची वेबसाईट तपासण्यापासून केली. आम्हाला कांदा आणि मिठा बद्दल कुठे माहिती सापडते का ते बघायचे होते, पण आम्हाला त्या संकेत स्थळावर काहीच सापडले नाही.

विश्वास न्यूज ने या संबंधी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल चे पलमोनोलिजिस्ट डॉ निखिल मोदी यांना संपर्क केला. त्यांनी या दाव्याला संपूर्णपणे खारीज केले.
अमेरिकेच्या नेशनल ओनियन एसोसिएशन प्रमाणे या दाव्याचे कुठलेच वैज्ञानिक प्रमाण नाही. कापलेला कांदा हा किटांणूची विषाक्तता संपवण्यास मदत करतो. १५०० शताब्दी मध्ये मानले जायचे कि कापलेला कांदा ठेवल्यास बुबोनिक प्लेग पासून वाचू शकतो. काही लोकं मानायचे कि हा रोग संक्रमणानी पसरायचा. ओनियन एसोसिएशन ची हि माहिती तुम्ही इथे बघू शकता.

health-desk.org प्रमाणे, कांदा आणि लसूण एकाच परिवार चे सदस्य आहेत. लसूण प्रमाणे कांद्यामध्ये पण एंटी-इंफ्लेमेट्री गुण असतात. पण या बाबतीत जास्ती अभ्यास झालेला नाही. अजूनपर्यंत असा कुठला अभ्यास आमच्या समोर आला नाही. आणि असे वैज्ञानिक पुरावे पण नाही जे याची पुष्टी करतील.

कोरोना पासून बचाव करण्यासाठी सगळ्यात असरदार मार्ग म्हणजे हातांची स्वछता, मास्क घालणे आणि सोशल डिस्टंसिन्ग चे पालन करणे.
कोविड-19 मध्ये भारताने जानेवारी २०२१ मध्ये मोठ्या प्रमाणावर व्हॅक्सिनेशन ड्राइव्ह सुरु केली आहे. सेंट्रल ड्रग्स स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशन (CDSCO) ने आपत्कालीन वापराकरिता भारताला दोन वॅक्सीन Covishield® (सिरम इन्स्टिट्यूट द्वारा निर्मित) आणि Covaxin® (भारत बायोटेक द्वारा निर्मित) ला परवानगी दिली आहे.

विश्वास न्यूज ने हि पोस्ट शेअर करणारे फेसबुक यूजर हकीम पुजारा यांचे प्रोफाइल तपासले. त्यांच्या प्रोफाइल ला १३०० पेक्षा जास्ती फॉलोवर्स आहेत.

निष्कर्ष: कांदा आणि मीठ खाल्ल्याने १५ मिनटात कोरोनाव्हायरस च्या संक्रमणापासून ठीक होऊ शकत नाही, व्हायरल दावा खोटा आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट