नवी दिल्ली (विश्वास न्यूज)। देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू असताना धबधब्याचा एक व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. काही सोशल मीडियाचे काही वापरकर्ते हा व्हिडिओ गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील असल्याचा दावा करत व्हायरल करत आहेत.
विश्वास न्यूजने या व्हायरल पोस्टची चौकशी केली. व्हायरल झालेला व्हिडिओ गुजरातमधील नसून गोव्यातील दूधसागर धबधब्याचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
फेसबुक वापरकर्ता मुन्ना सोलंकीने 22 जुलै रोजी धबधब्याचा व्हिडिओ शेअर केला आणि गुजराती भाषेत कॅप्शन लिहिले, “जुनागड गिरनार पर्वत मुसळधार पाऊस.” या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “गिरनार हिल्स, जुनागड.”
व्हायरल पोस्टची फेसबुकवरील आणि संग्रहित आवृत्ती पहा.
व्हायरल व्हिडिओचा तपास करण्यासाठी आम्ही गुगल इमेजच्या माध्यमातून व्हिडिओच्या स्क्रीनशॉटचा शोध घेतला. चंदू नावाच्या यूट्यूब चॅनेलवर 27 जुलै 2019 रोजी अपलोड केलेला व्हायरल व्हिडिओ आम्हाला सापडला. सोबत लिहिलेल्या वर्णनात त्यास दुधसागरचा धबधबा असल्याचे सांगितले गेले होते.
इथून काही सुगावे घेऊन इंटरनेटवर शोध घेतला असता गोव्यातील दूधसागर धबधब्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सापडले, जे व्हायरल व्हिडिओशी मिळते-जुळते होते.
आता ही बाब तर स्पष्ट झाली होती की, हा व्हिडिओ गोव्यातील दूधसागर येथील आहे. पण जुनागडच्या गिरनार हिल्समध्ये असाच एखादा धबधबा आहे किंवा नाही, याचा आम्हाला शोध घ्यायचा होता.
गिरनार टेकडीवर एक छोटा धबधबा आहे, जो पावसाळ्यात ओसंडून वाहतो, पण दूधसागरच्या तुलनेत तो खूपच छोटा आहे, असे आम्हाला कळाले.
याबाबत विश्वास न्यूजने दैनिक जागरण गुजरातचे वरिष्ठ प्रतिनिधी शत्रुघ्न शर्मा यांच्याशी संपर्क साधला. हा व्हिडिओ जुनागडचा नसल्याची पुष्टी त्यांनी केली.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गुजरातला सध्या मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. गुजरातमधील पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या बातम्या येथे वाचता येतील.
शेवटी आम्ही चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे अकाऊंट स्कॅन केले. आम्हाला आढळले की, मुन्ना सोलंकी या वापरकर्त्याचे 200 हून अधिक फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात आढळले की, व्हायरल झालेला व्हिडिओ गुजरातचा नसून गोव्यातील दूधसागर धबधब्याचा आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923