Fact Check: गरम नारळपाणी कर्करोगाच्या पेशी नष्ट करत नाही, व्हायरल पोस्ट फेक आहे
टाटा मेमोरियल हॉस्पिटल च्या डॉ राजेंद्र बडवे ह्यांनी नाही म्हंटले कि नारळाचे गरम पाणी पिल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. व्हायरल दावा खोटा आहे.
- By: Ankita Deshkar
- Published: Oct 19, 2021 at 12:08 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला विविध सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स वर एक मराठी मध्ये मेसेज व्हायरल होताना दिसला, ज्यात सांगण्यात आले होते कि नारळाचे गरम पाणी पिल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. हि पोस्ट, टाटा मेमोरियल हॉस्पिटल चे डॉ राजेंद्र बडवे ह्यांच्या नावाने व्हायरल होत आहे. विश्वास न्यूज ने आधी देखील ह्या पोस्ट चा इंग्रजी मध्ये तपास केला होता आणि त्यात देखील हि पोस्ट खोटी असल्याचे समोर आले होते.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Shrinivas Gedam ह्यांनी आपल्या प्रोफाइल वर 19 सप्टेंबर रोजी एक मेसेज पोस्ट केला. त्याचा मजकूर खालील प्रमाणे:
गरम नारळाचे पाणी, कृपया, कृपया पुढे पाठवा:
डॉ. राजेंद्र ए. बडवे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलने जोर दिला की * जर हे वृत्तपत्र प्राप्त करणारे प्रत्येकजण दहा प्रती इतरांना पाठवू शकले तर नक्कीच एक जीव वाचवला जाईल … आपल्या भागाला मदत करा. धन्यवाद!
गरम नारळाचे पाणी तुमचे आयुष्य वाचवू शकते
गरम नारळ – केवळ कर्करोगाच्या पेशी नष्ट करतो!
ग्लासात मध्ये ४ते ५ नारळाचे तुकडे बारीक चिरून /कापून घ्या, त्यात अर्धा ग्लास गरम पाणी घाला, ते “क्षारीय पाणी” होईल, दररोज प्या, ते कोणा साठीही चांगले आहे.
गरम नारळाचे पाणी कर्करोगाविरोधी असून जे वैद्यकीय क्षेत्रात कर्करोगाच्या प्रभावी उपचारांसाठी नवीनतम प्रगती म्हणून पुढे आले आहे.
गरम नारळाचा हा रस अल्सर आणि ट्यूमरवर परिणाम करतो. सर्व प्रकारच्या कर्करोगावर उपाय करण्यासाठी सिद्ध.
*नारळाच्या अर्काने या प्रकारच्या उपचाराने केवळ घातक पेशी नष्ट होतात, त्याचा निरोगी पेशींवर परिणाम होत नाही. *
याव्यतिरिक्त, नारळाच्या रसातील अमीनो आम्ल आणि नारळ पॉलीफेनॉल उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकतो, प्रभावीपणे खोल शिराच्या थ्रोम्बोसिसला प्रतिबंध करू शकतो, रक्त परिसंचरण समायोजित करू शकतो आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करू शकतो.
वाचल्यानंतर, इतरांना, कुटुंब, मित्रांना सांगा, प्रेम पसरवा! स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात सध्या किवर्ड सर्च ने केली. आम्ही बातम्यांमध्ये कुठे डॉ राजेंद्र बडवे ह्यांनी असे काही वक्तव्य दिले का ते शोधण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला काही बातम्या सापडल्या आणि त्याद्वारे आम्हाला कळले कि हा मेसेज इंटरनेट वर 2019 पासून फिरतोय.
आम्हाला हि बातमी हिंदुस्थान टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया वर मिळाली.
विश्वास न्यूज ला टाटा मेमोरियल ची एक प्रेस रिलीज देखील डॉ राजेंद्र बडवे ह्यांच्या नावावर आढळली ज्यात हा दावा त्यांनी फेटाळलाय. हि रिलीज 19 मे, 2019 ची होती.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने डॉ राजेंद्र बडवे (टाटा मेमोरियल हॉस्पिरिल) च्या कार्यालयात संपर्क केला.
तेथील स्टाफ ने आम्हाला सांगितले कि व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे. डॉ बडवेनी असे म्हंटले नाही कि गरम नारळ पाणी पिल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. हि पोस्ट खोटी आहे. हा दावा 2019 पासून व्हायरल होत आहे.
विश्वास न्यूज ने 2019 साली देखील ह्या दाव्याचा तपास केला होता, जो इंग्रजीत व्हायरल झाला होता. हा तपास इथे वाचा:
शेवटच्या टप्प्यात आम्ही त्या फेसबुक प्रोफाइल चा तपास केला ज्यांनी हा दावा शेअर केला आहे. फेसबुक यूजर Shrinivas Gedam हे भारतीय जीवन बिमा निगम चे निवृत्त अधीकारी आहेत.
निष्कर्ष: टाटा मेमोरियल हॉस्पिटल च्या डॉ राजेंद्र बडवे ह्यांनी नाही म्हंटले कि नारळाचे गरम पाणी पिल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. व्हायरल दावा खोटा आहे.
- Claim Review : नारळाचे गरम पाणी पिल्याने कर्करोगाच्या सेल्स नष्ट होतात
- Claimed By : Shrinivas Gedam
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.