Fact Check: डोनाल्ड ट्रम्प च्या मुलाला ट्विटर चा नवीन सीईओ नाही बनवण्यात आले, व्हायरल दावा खोटा
विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टची सत्यता तपासली आणि असे कळले की डोनाल्ड जॉन ट्रम्प जूनियर यांची ट्विटरचे नवीन सीईओ म्हणून निवड झालेली नाही. त्यांनी स्वतः ही बातमी चुकीची असल्याचे सांगितले आहे. The Smattering News नावाच्या एका व्यंग्यात्मक वेबसाइटने हा अहवाल प्रकाशित केला होता, त्यानंतर लोकांनी ही बातमी खरी असल्याचे समजून शेअर करण्यास सुरुवात केली.
- By: Pragya Shukla
- Published: Jan 11, 2023 at 03:18 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): ट्विटरबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड जॉन ट्रम्प ज्युनियर, ट्विटरचा नवा सीईओ असेल असा दावा करत शेअर केली जात आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडले असून या पदासाठी डोनाल्ड जॉन ट्रम्प ज्युनियर यांची निवड केली आहे, असा दावा ह्या पोस्ट मध्ये करण्यात येत आहे.
विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टचा तपास केला त्यात ती खोटी असल्याचे आढळले. डोनाल्ड जॉन ट्रम्प ज्युनियर यांची ट्विटरचे नवीन सीईओ म्हणून निवड झालेली नाही. त्यांनी स्वतः ही माहिती चुकीची असल्याचे सांगितली आहे. The Smattering News नावाच्या एका व्यंग्यात्मक वेबसाइटने हि बातमी प्रकाशित केली आहे, त्यानंतर लोकांनी ही बातमी खरी असल्याचे समजून शेअर करण्यास सुरुवात केली.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर एस.टी. मान ने वायरल पोस्ट शेअर करत लिहले, ब्रेकिंग: एलन मस्क ने पद छोड़ने के बाद डोनाल्ड ट्रम्प जूनियर को नए ट्विटर सीईओ के रूप में नियुक्त किया है।
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही संबंधित कीवर्डसह Google वर शोधले. दरम्यान, दाव्याबाबत आम्हाला कोणताही विश्वासार्ह मीडिया रिपोर्ट मिळालेला नाही.
तपास पुढे नेत, आम्ही इलॉन मस्कच्या ट्विटर अकाऊंटमध्ये खोदकाम सुरू केले, परंतु येथेही आम्हाला व्हायरल दाव्याशी संबंधित कोणतीही माहिती सापडली नाही. मग आम्ही डोनाल्ड जॉन ट्रम्प ज्युनियरच्या ट्विटर खात्यात शोधण्यास सुरुवात केली. या दरम्यान, आम्हाला व्हायरल दाव्याशी संबंधित 22 डिसेंबर 2022 रोजी एक ट्विट आढळले. एक रिपोर्ट शेअर करताना त्यांनी व्हायरल झालेला दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
तपासादरम्यान, आम्हाला 19 डिसेंबर रोजी The Smattering News नावाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या व्हायरल दाव्याशी संबंधित एक अहवाल सापडला. वेबसाइट तपासल्यानंतर आम्हाला आढळले की ते एक व्यंग्य वेब पोर्टल आहे. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व बातम्या आणि अहवाल केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिलेले आहेत.
अधिक माहितीसाठी आम्ही दैनिक जागरणचे व्यावसायिक पत्रकार मनोज कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले, “व्हायरल दावा खोटा आहे.”
इलॉन मस्क यांनी 19 डिसेंबर 2022 रोजी लोकांना ट्विटरचे प्रमुख पद सोडावे का असे विचारले, ज्याला 57.5 टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले. त्यानंतरच त्यांनी या पदासाठी मूर्ख व्यक्ती सापडताच पद सोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या.
विश्वास न्यूजने तपासाच्या अंतिम टप्प्यात, व्हायरल पोस्ट शेअर केलेल्या प्रोफाईलचा सोशल बॅकग्राउंड चेक केला. आम्हाला कळले की उजरने त्यांच्या प्रोफाइलवर कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टची सत्यता तपासली आणि असे कळले की डोनाल्ड जॉन ट्रम्प जूनियर यांची ट्विटरचे नवीन सीईओ म्हणून निवड झालेली नाही. त्यांनी स्वतः ही बातमी चुकीची असल्याचे सांगितले आहे. The Smattering News नावाच्या एका व्यंग्यात्मक वेबसाइटने हा अहवाल प्रकाशित केला होता, त्यानंतर लोकांनी ही बातमी खरी असल्याचे समजून शेअर करण्यास सुरुवात केली.
- Claim Review : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाची ट्विटरच्या सीईओपदी निवड.
- Claimed By : एस.टी. मान
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.