Fact Check: ऑनलाईन सर्वे भरल्यावर डॉमिनोस नाही देत आहे दोन मोठे पिझ्झा

ऑनलाईन सर्वे भरल्यावर हा पिझ्झा आउटलेट नाही देत आहे फ्री मध्ये दोन मोठे पिझ्झा. व्हायरल पोस्ट खोटी आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि ऑनलाईन सर्वे भरणाऱ्या सोशल मीडिया यूजर ला डॉमिनोस फुकटात दोन मोठे पिझ्झा चे कूपन्स देत आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Daniel Hawk ने पोस्ट सोबत एक लिंक शेअर केली, ज्यात दावा करण्यात येत आहे कि हि लिंक पुढे लोकांना शेअर करणाऱ्या लोकांना डॉमिनोस ने दोन मोठे पिझ्झा मोफत देण्याचे कबुल केले आहे.

या व्हायरल पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात सगळ्यात आधी व्हायरल होत असलेल्या पोस्ट सोबत असलेल्या लिंक पासून केली. आम्हाला या पेज वर एरर मिळाला. हाच दावा बऱ्याच एक्सटेर्नल लिंक सोबत शेअर केला जात आहे.

सर्वे पूर्ण केल्यानंतर या ऑफर मध्ये दिल्या प्रमाणे, फ्री पिझ्झा मिळवण्यासाठी यूजर ला शेअर करण्यात येणाऱ्या लिंक वर क्लिक करण्यास सांगितले जाते. असे केल्यास देखील आम्हाला कुठलेच कुपन मिळाले नाही.

आम्ही आमच्या पथकांना या लिंक वर क्लीक करण्यास मनाई केली आहे. डॉमिनोस ची अधिकृत वेबसाईट देखील आहे, पण व्हायरल पोस्ट मध्ये दिलेली वेबसाईट अधिकृत वेबसाईट सोबत मिळती जुळती नाही.

आम्ही व्हायरल पोस्ट मध्ये सांगण्यात आलेल्या ऑफर बद्दल डॉमिनोस च्या अधिकृत वेबसाईट वर आणि अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल्स वर देखील शोधले, पण आम्हाला असा कुठलाच ऑफर तिथे दिसला नाही. जर का या फूड चेन द्वारे असा कुठला ऑफर काढण्यात आला असता तर तो डॉमिनोस च्या अधिकृत वेबसाईट वर नक्कीच दिसला असता.

विश्वास न्यूज ने डॉमिनोस सोबत संपर्क साधला. आमचे बोलणे, कस्टमर केयर अधिकारी दीपक यांच्या सोबत झाले, त्यांनी आम्हाला सांगितले कि डॉमिनोस द्वारे असे कोणतेच ऑफर देण्यात नाही येत आहे, व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे.

आता आम्ही ज्या यूजर ने हि पोस्ट शेअर केली, Daniel Hawk त्यांचा तपास केला. त्यांचे प्रोफाइल स्कॅन केल्यावर आम्हाला समजले कि यूजर यूनाइटेड स्टेटस चे ओहायओ चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: ऑनलाईन सर्वे भरल्यावर हा पिझ्झा आउटलेट नाही देत आहे फ्री मध्ये दोन मोठे पिझ्झा. व्हायरल पोस्ट खोटी आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट