X
X

Fact Check: जर तुम्हाला ऍमेझॉन कडून अश्या प्रकारचा ई-मेल आला असेल तर लिंक ओपन करू नका

ऍमेझॉन च्या नावावर पेमेंट डिटेल्स मागणारा ई-मेल एक स्कॅम आहे, ऍमेझॉन ने हा ई-मेल नाही पाठवला.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला आपल्या व्हाट्सअँप चॅट-बोट नंबर 9599299372 वर एक ई-मेल चा स्क्रीनशॉट फॅक्ट चेक करण्यास मिळाला. स्क्रीनशॉट मध्ये दिल्या प्रमाणे, हा ई-मेल ऍमेझॉन कडून आला होता, ज्यात यूजर ला एक लिंक दिली होती आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपले पेमेंट डिटेल्स टाकण्यास सांगितले होते.

विश्वास न्यूज ने जेव्हा ई-मेल सोबत दिलेल्या लिंक चा तपास केला तेव्हा हि एक फिशिंग स्कॅम असल्याचे कळले. ज्या ई-मेल आयडी वरून हा मेल आला होता तो ऍमेझॉन चा नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वर व्हायरल ई-मेल चा स्क्रीनशॉट काही लोकांनी शेअर केला आहे. इंग्रजीमध्ये लिहलेल्या या मेसेज चा हिंदी अनुवाद आहे: बिलिंग ची समस्या येत असल्यामुळे तुमच्या अकाउंट ला होल्ड वर टाकण्यात आले आहे. आपली पेमेंट इन्फॉर्मशन इथे उपडते करा.

ज्या ई-मेल आयडी वरून हा मेल मिळाला, तो या प्रकारे: information-j7mzdzflkhp@wxbdbdijvp.net
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने चॅट सपोर्ट द्वारा ऍमेझॉन सोबत संपर्क केला. आमचे बोलणे कस्टमर सर्विस अधिकारी सुनील कुमार यांच्या सोबत झाले. त्यांनी आम्हाला सांगितले कि अश्या कुठल्याच प्रकार च्या ई-मेल वर विश्वास ठेऊ नये. आणि तसेच आपले पर्सनल डिटेल्स देखील शेअर करू नये. त्यांनी हे पण म्हंटले कि ज्या ई-मेल आयडी वरून हा मेल शेअर केला आहे तो ऍमेझॉन चा नाही. हा एक स्कॅम आहे.

ऍमेझॉन च्या वेबसाईट प्रमाणे, “हे खोटे इमेल्स ज्यांना स्पूफ इमेल्स किंवा फिशिंग इमेल्स देखील म्हंटले जाते, हे ऍमेझॉन च्या खऱ्या इमेल्स सारखेच दिसतात. जास्ती करून हे इमेल्स तुम्हाला चुकीच्या वेबसाईट्स वर नेतात. यातल्या काही वेबसाईट्स अगदी ऍमेझॉन सारख्या दिसतात, ज्यात हि वेबसाईट यूजर्स ला आपले अकाउंट डिटेल्स विचारते. या खोट्या वेबसाईट्स तुमची संवेदनशील माहिती चोरू शकतात आणि त्याच्या मदतीने तुमच्यासोबत फ्रॉड हू शकतो.

आम्हाला व्हायरल ई-मेल मध्ये बऱ्याच व्याकरणाच्या चुका आढळल्या, ज्यावरून असे स्पष्ट समजते कि हा ई-मेल खोटा आहे. बरेच फिशर्स दुसऱ्या भाषेतून कन्टेन्ट ट्रान्सलेट करतात आणि नंतर प्रूफ रिडींग ना करताच त्याचा वापर करतात.
ऍमेझॉन ने हे खोटे इमेल्स ओळखण्याकरिता काही टिप्स दिल्या आहेत, त्या तुम्ही इथे वाचू शकता.

फेसबुक वर हि व्हायरल पोस्ट Lynn Johnson नावाच्या यूजर नि शेअर केली आहे. यूजर ची प्रोफाइल स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि यूजर ग्रेसलेक, अमेरिका चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: ऍमेझॉन च्या नावावर पेमेंट डिटेल्स मागणारा ई-मेल एक स्कॅम आहे, ऍमेझॉन ने हा ई-मेल नाही पाठवला.

  • Claim Review : बिलिंग ची समस्या येत असल्यामुळे तुमच्या अकाउंट ला होल्ड वर टाकण्यात आले आहे. आपली पेमेंट इन्फॉर्मशन इथे उपडते करा.
  • Claimed By : Twitter user: SthrnDixieCwgrl
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later