Fact Check: डीमार्ट आपल्या २०व्या वाढदिवसानिमित्त नाही देत आहे फ्री गिफ्ट, व्हायरल पोस्ट आहे खोटी

डीमार्ट आपल्या विसाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाही देत आहे मोफत भेटवस्तु, व्हायरल पोस्ट खोटी आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि डीमार्ट आपल्या विसाव्या वाढदिवसानिमित्त ग्राहकांना मोफत भेटवस्तू देत आहेत. पोस्ट सोबत एक लिंक देखील त्यात आहे, ज्याला पाच व्हाट्सअँप ग्रुप्स वर शेअर करण्यास सांगण्यात येत आहे.

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट मध्ये गेलेला दावा खोटा असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Chaluva Raju R यांनी एक पोस्ट शेअर केली, ज्यात लिहले होते: 20वीं सालगिरह का सेलिब्रेशन, हर किसी के लिए मुफ्त उपहार और इसके साथ एक लिंक दिया गया है।

व्हायरल पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने तपास सुरूकरताच सगळ्यात आधी व्हायरल पोस्ट मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक केले. (आम्ही आपल्या यूजर्स ला सल्ला देऊ इच्छितो कि या लिंक वर क्लीक करू नये, विश्वास न्यूज च्या फॅक्ट चेक टीम ने लिंक चा तपास करण्यास त्याला ओपन केले होते.) या लिंक वर क्लिक केल्यानंतर आमच्या समोर एक पेज ओपन झाला ज्यावर स्पिन ए व्हील कॉन्टेस्ट आम्हाला दिसला.

हि वेबसाईट खोटी आहे, डीमार्ट ची खरी वेबसाईट तुम्ही इथे बघू शकता, व्हायरल पोस्ट मध्ये दिलेली लिंक या वेबसाईट पेक्षा बिलकुल वेगळी आहे. व्हायरल पोस्ट मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर हा मेसेज मिळतो, कि एका आईपी ऍड्रेस वर एकच भेटवस्तू मिळू शकते. एकदा स्पिन ए व्हील कॉन्टेस्ट खेळल्यानंतर भेटवस्तू मिळवण्याकरिता एका यूजर ला या मेसेज ला अन्य व्हाट्सअँप यूजर्स सोबत शेअर करण्यास सांगितले गेले आहे.

यानंतर आम्ही इंटरनेट वर डीमार्ट बद्दल सर्च केले तेव्हा आम्हाला कळले कि हि कंपनी २००२ साली सुरु झाली, म्हणजेच याला २० वर्ष २०२२ मध्ये पूर्ण होतील.

डीमार्ट च्या वेबसाईट वर एक नोटीस देखील देण्यात आली आहे, ज्यात लिहले आहे: प्रिय ग्राहक: डीमार्ट कुठल्याच अन्य वेबसाईट किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे व्हाउचर्स किंवा कूपन्स देत नाही आहे. आमचे सगळे प्रोमोशन्स आणि ऑफर आमच्या डीमार्ट रेडी ऐप, आमची वेबसाईट www.dmart.in आणि आमच्या डीमार्ट स्टोर्स वर उपलब्ध आहे.

विश्वास न्यूज ने डीमार्ट च्या कस्टमर केयर अधिकारी अर्चना यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे.

शेवटच्या टप्प्यात आम्ही फेसबुक वर हि पोस्ट शेअर करणारे यूजर, Chaluva Raju R यांच्या बद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला. प्रोफाइल स्कॅन केल्यावर कळले कि यूजर कर्नाटकाच्या बेंगलुरु चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: डीमार्ट आपल्या विसाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाही देत आहे मोफत भेटवस्तु, व्हायरल पोस्ट खोटी आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट