Fact Check: डेन्मार्ककडून कोविड लसीकरण ‘स्थगित’, लसीकरण कायमचं थांबवल्याचा दावा दिशाभूल करणारा
डेन्मार्क मधील व्हॅक्सिनेशन थांबल्याचे व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारे. डेन्मार्क ने व्हॅक्सिनेशन स्थगित केले आहे, पूर्णपणे थांबवले नाही.
- By: Ankita Deshkar
- Published: May 12, 2022 at 06:02 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): डेन्मार्कने कोविड-19 लसीकरण पूर्णपणे थांबवले आहे, असा दावा करणाऱ्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट दिसल्या. डॅनिश लोकसंख्येतील लस कव्हरेजमुळे देशाने व्हॅक्स कार्यक्रमाला विराम दिला आहे, असे विश्वास न्यूजच्या तपासात आढळले आहे. त्यामुळे लसीकरण कार्यक्रम स्थगित झाला आहे बंद झाला नाही.
काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूजला ट्विटर वर Melinda Richards @goodfoodgal ह्यांनी पोस्ट केल्याचे दिसले. त्यांनी लिहले होते: Denmark has stopped their entire COViD vaccination program.
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
बाकी ट्विटर यूजर्स देखील हा दावा शेअर करत आहेत.
तपास:
विश्वास न्यूज ने किवर्ड सर्च पासून तपासाची सुरुवात केली.
आम्हाला सीएनबीसी ची एक रिपोर्ट तपासात सापडली, त्याचे शीर्षक होते: Denmark becomes the first country to halt its Covid vaccination program
असे स्पष्ट सांगितले होते कि हा प्रोग्रॅम स्थगित करण्यात आला होता, थांबवण्यात आला नव्हता.
लेखात असेही म्हटले आहे: लसीकरण कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यापासून दूर, तथापि, डॅनिश हेल्थ अँड मेडिसिन्स अथॉरिटीने म्हटले आहे की शरद ऋतूमध्ये पुन्हा कोविड -19 विरूद्ध लसीकरण करण्याची आवश्यकता असेल.
हे आर्टिकल इथे वाचा.
अजून माहिती काढल्यावर विश्वास न्यूज ला एक लिंक सापडली जी त्या व्हॅक्सिनेशन प्रोग्रॅम ची होती. वेबसाईट वर लिहले होते: डेन्मार्कमधील सामान्य कोविड-लसीकरण कार्यक्रम सध्या थांबवण्यात आला आहे. लसीकरण करणे अद्याप शक्य आहे.
हा आर्टिकल इथे वाचा.
विश्वास न्यूज ने डेन्मार्क च्या काही पत्रकारांना ट्विटर द्वारे संपर्क केला. त्यांनी आम्हाला व्हॅक्सिनेशन प्रोग्रॅम च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल मध्ये टॅग केले. ऑफिशिअल ट्विटर हॅन्डल वरून आम्हाला उत्तर मिळाले कि, हा व्हॅक्सिनेशन प्रोग्रॅम स्थगित करण्यात आला आहे. बंद करण्यात आला नाही.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने ट्विटर यूजर Melinda Richards चा तपास केला. त्यांचे ट्विटर वर 31.4K फॉलोवर्स आहेत. त्यांनी 2015 मध्ये ट्विटर जॉईन केले.
निष्कर्ष: डेन्मार्क मधील व्हॅक्सिनेशन थांबल्याचे व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारे. डेन्मार्क ने व्हॅक्सिनेशन स्थगित केले आहे, पूर्णपणे थांबवले नाही.
- Claim Review : Denmark has stopped their entire COViD vaccination program.
- Claimed By : Melinda Richards
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.