निष्कर्ष: कोरोनाचे रुग्ण सार्वजानिक ठिकाणी सापडत असल्याच्या दाव्याने शेअर करण्यात आलेला विडिओ पुण्यात घेण्यात आलेल्या मॉक ड्रिल चा आहे.
नवी दिल्ली, विश्वास न्यूज:
पीपीई किट घातलेले मेडिकल स्टाफ एका इसमाला ऍम्ब्युलन्स मधून नेत असल्याचा एक विडिओ काही दिवसांपासून फेसबुक आणि व्हाट्सअँप वर शेअर केल्या जात आहे. तो व्हिडिओ पुण्याच्या मॉक ड्रिल चा असल्याचे विश्वास न्युज च्या तपासात आढळले.
काय होतंय व्हायरल?
खालील मजकुरासह एक विडिओ ‘Hinjewadi Lifestyle‘ या फेसबुक पेज ने शेअर केला:
पुण्यातील रस्त्यांवर कोरोनाचे रुग्ण सार्वजानिक ठिकाणी सापडण्यास सुरवात झाली आहे
भयानक परिस्थिती आहे
सर्वांनीच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या ….
सुरक्षित रहा
तपास:
विश्वास न्युज ने याच मजकुरासह विविध सोशल नेटवर्किंग साईट्स वर हा विडिओ शोधला. बऱ्याच पेजेस नि हा विडिओ वर नमूद केलेल्या दाव्यांसह शेअर केला आहे. हा विडिओ याच मजकुरासह विविध व्हाट्सअँप ग्रुप वर देखील व्हायरल होत आहे. आम्ही कुठलाही फॅक्ट-चेक टूल वापरण्याआधी या पोस्ट वरचे कंमेंट सेक्शन तपासले.
आम्हाला अश्याच एका पोस्ट च्या कंमेंट सेक्शन वर एक लिंक सापडली, ती लिंक पुण्याचे महापौर, मुरलीधर मोहोळ यांच्या फेसबुक पेज ची होती.
मुरलीधर मोहोळ यांनी त्या विडिओ बद्दल खालील माहिती पोस्ट केली आहे.
“पुण्यात आज डेक्कन परिसरात घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीनं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल करण्यात आले. सर्व यंत्रणांची सतर्कता तपासण्यासाठी हे मॉक ड्रिल करण्यात येत असते. मात्र या व्हिडीओचा वापर करुन वेगळ्या अर्थाने समाजमाध्यमांमध्ये पसरवला जात आहे. कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी!”
त्यांनी हाच मजकूर आपल्या ट्विटर पेज वर देखील शेअर केला आहे.
विश्वास न्यूज ने नंतर पुणे सायबर सेल सोबत संपर्क साधला. पुणे सायबर सेल चे पोलीस निरीक्षक, जयराम पायगुडे यांनी देखील हा विडिओ मॉक ड्रिल चा असल्याचे स्पष्ट केले.
‘Hinjewadi Lifestyle’, या पेज चे सोशल चेक केल्यास आढळले कि ह्या पेज ला 3,645 लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: निष्कर्ष: कोरोनाचे रुग्ण सार्वजानिक ठिकाणी सापडत असल्याच्या दाव्याने शेअर करण्यात आलेला विडिओ पुण्यात घेण्यात आलेल्या मॉक ड्रिल चा आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923