X
X

Fact-Check: तज्ञांनी खारीज केला दावा, मच्छरांपासून कोरोनाव्हायरस पसरत नाही!

निष्कर्ष: मच्छरांपासून कोरोनाव्हायरस पसरत नाही, तज्ञांनी आणि WHO ने या दाव्याचे खंडन केले.

  • By: Urvashi Kapoor
  • Published: Jul 1, 2020 at 02:55 PM
  • Updated: Jul 1, 2020 at 03:54 PM

नवी दिल्ली (विश्वास टीम)
विविध सोशल मीडिया वेबसाईट वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात असा दावा करण्यात आला आहे कि कोरोनाव्हायरस मच्छरांपासून शकतो. म्हणून जेव्हा पण बाहेर जाल ‘बग स्प्रे’ सोबत ठेवा. विश्वास न्यूज ने या पोस्ट चा तपास केला आणि त्यात केलेला दावा खोटा असल्याचे आढळले.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर वर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यात लिहले आहे: When the mosquitoes come out everyone,WEAR BUG SPRAY OUTSIDE.I might be wrong,but I personally think that if a mosquito sucks the blood of a person with #coronavirus and then bites you,the virus could spread to you.Im not smart,but just do it to be safe.

अर्थात: जेव्हा पण बाहेर जाल तेव्हा आपल्यासोबत बग स्प्रे सोबत घेऊन जा, कारण बाहेर मच्छर असतात. मी चुकीचा असू शकतो, पण मला वैयक्तिकरित्या अस वाटतं कि जर एखाद्या मच्छर नि #coronavirus संक्रमित व्यक्ती ला चावले आणि नंतर तुम्हला, तर तुम्हाला कोरोनाव्हायरस हू शकतो. मी स्मार्ट नाही पण स्वतःच्या सुरक्षिततेसाठी इतकं नक्की करा.

या पोस्ट ची आर्काइव लिंक हि आहे.

तपास:
वर्ल्ड हेअल्थ ऑर्गनाइसेशन (WHO) प्रमाणे, “आज पर्यंत असा कुठलाही पुरावा नाही जो सुचवतो कि कोरोनाव्हायरस हा मच्छरांमुळे पसरतो. कोरोनाव्हायरस हा श्वसनाचा रोग आहे, जो संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर पसरतो. संपर्कात आलेला व्यक्ती जर खोकलला किंवा शिंकला तर तोंडातून निघणाऱ्या द्रव्यापासून हा रोग पसरतो. त्यापासून स्वतःला वाचवण्याकरिता आपले हाथ नियमित साबणाने धुवा अथवा अल्कोहोल आधारित हॅन्ड सॅनिटायझर ने हाथ स्वच्छ करा. तसेच, सर्दी किंवा खोकला असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा.”

यूएस सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रीवेंशन (CDC) प्रमाणे, “व्हायरस एका व्यक्ती पासून दुसऱ्या
व्यक्ती पर्यंत, संपर्कात आल्यावर (६ फुटाच अंतर न बाळगल्यास) किंवा संक्रमित व्यक्ती ला सर्दी खोकला झाल्यास त्याच्या तोंडातून निघालेल्या द्रव्यामुळे त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना कोरोनाव्हायरस होतो. COVID-19 त्या लोकांमुळे पण पसरतो ज्यांच्यात त्याचे लक्षणं नसतील.”

विश्वास न्यूज ने नवी दिल्ली च्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल चे पल्मोनोलॉजिस्ट,
कोरोनाव्हायरस संक्रमित रुग्णांचा उपचार करणाऱ्या डॉ. निखिल मोदी यांच्या सोबत संपर्क साधला. त्यांनी म्हंटले, “COVID-19 मच्छरांपासून नाही पसरत. हा एक श्वसन रोग आहे. पण मच्छरांपासून बचाव करणे गरजेचे आहे. यासाठी सावध राहायला हवे.

हा पोस्ट ट्विटर वर ‘नेट’ नामक व्यक्ती ने केला आहे. आम्ही त्याचा यूजर प्रोफाइल स्कॅन केला आणि असे कळले कि त्यांनी प्रोफाइल एप्रिल २०१७ साली बनवले.

Disclaimer: विश्वास न्यूजच्या कोरोनाव्हायरस (COVID-19) संबंधित फॅक्ट-चेक स्टोरी वाचताना किंवा शेअर करताना, आम्ही वापरलेला डेटा किंवा संशोधन डेटा बदलू शकतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाव्हायरस संबंधित डेटा (संक्रमित असलेले, बरे झालेले रुग्ण आणि मृत्युमुखी पडलेले रुग्ण यांची संख्या) सतत बदलत राहते. तसेच लस (व्हॅक्सिन) शोधण्याच्या दिशेने संशोधनाचे ठोस परिणाम यायचे आहेत आणि त्यामुळे, उपचार आणि प्रतिबंधासाठी उपलब्ध असलेला डेटा देखील बदलू शकतो. म्हणून जेव्हा तुम्ही फॅक्ट-चेक वाचाल तेव्हा त्याची तारीख पडताळणे आवश्यक आहे.

निष्कर्ष: निष्कर्ष: मच्छरांपासून कोरोनाव्हायरस पसरत नाही, तज्ञांनी आणि WHO ने या दाव्याचे खंडन केले.

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later