Fact Check: आल्याच्या माध्यमातून कोरोनाला रोखता येत नाही, व्हायरलचा दावा चुकीचा आहे
विश्वास न्यूजने आपल्या तपासणीत असे आढळले आहे की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती डॉ. जरीर उडवाडिया नाही आणि व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने सांगितलेले उपाय देखील चुकीचे आहेत. तज्ज्ञांच्या मते, आल्याच्या पावडरचा वास घेणे हानिकारक ठरू शकते.
- By: Pragya Shukla
- Published: Dec 31, 2022 at 03:40 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): कोरोनापासून बचावासाठी अदरक पावडरचा वास घेण्याचा सल्ला देणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ असा दावा करून शेअर केला जात आहे की, हा माणूस मुंबईतील सुप्रसिद्ध डॉ. जरीर उडवाडिया आहे, जो कोविडपासून बचाव कसा करायचा हे दाखवत आहे.
आमच्या तपासणीत असे आढळून आले की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती डॉ. जरीर उडवाडिया नाही आणि ती व्यक्ती व्हिडिओमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी जी उपाययोजना सांगत आहे ती देखील चुकीची आहे. तज्ज्ञांच्या मते, आले चूर्ण श्वासात घेणे हानिकारक ठरू शकते.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर बारी रिपोर्टर ने व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहले, “यह डॉ जरीर उदवाडिया हैं जो न केवल मुंबई में बल्कि पूरे भारत में प्रसिद्ध डॉक्टरों में से एक हैं। इन्होंने एक बहुत ही सरल उपाय बताया है।”
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही संबंधित कीवर्डसह गूगल वर शोधण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या नावांनी व्हायरल होत असल्याचे आम्हाला आढळून आले.
तपास पुढे नेत आम्ही मुंबईतील डॉ जरीर उडवाडिया यांचा शोध सुरू केला. या दरम्यान आम्हाला सांस्कृतिक मंत्रालयाकडून एक प्रेस नोट मिळाली. प्रसिद्धीपत्रकानुसार, डॉ. जरीर उडवाडिया हे मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि संशोधक आहेत. 2016 मध्ये, द न्यूयॉर्क टाइम्सने डॉ. जरीर उडवाडिया यांच्या इनपुटसह एक अहवाल देखील प्रकाशित केला.
खालील चित्रात तुम्ही दोघांमधील फरक पाहू शकता.
आमच्या आतापर्यंतच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर जरीर उडवाडिया नसून व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती दुसरीच आहे. आता व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्याची सत्यता तपासण्याची वेळ आली आहे. यासाठी विश्वास न्यूजने डॉ.राजीव जयदेवन यांच्याशी बातचीत केली. ते आम्हाला म्हणाले, आजकाल लोकांना शॉर्टकट घेणे आवडते, मग ते आरोग्य सुधारण्यासाठी असो किंवा पैसे कमवण्यासाठी, त्यांना शॉर्टकटची आवश्यकता असते. म्हणूनच ते विचार न करता कोणावरही विश्वास ठेवतात, जे धोकादायक आहे. जर एखाद्या व्यक्तीने हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. श्वसनमार्गाचा पृष्ठभाग खूप मोठा आहे, विषाणू हवेत मिसळून शरीरात सहज प्रवेश करू शकतो. अशा परिस्थितीत एवढा मोठा भाग पावडरने झाकणे अशक्य आहे, उलट असे केल्याने इतर अनेक आजार होऊ शकतात. आपली श्वसनमार्ग खूप नाजूक आहे, असे केल्याने त्याचे नुकसान होऊ शकते. तसेच पावडर फुफ्फुसातील हवेच्या पिशव्यामध्ये अडकू शकते. हा प्रयोग अनेक अर्थाने धोकादायक आहे. असा कोणताही संशोधन अहवाल किंवा वैज्ञानिक पुरावा नाही, की हा प्रयोग कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी आहे.
असे व्हिडीओ बनवणारे लोक अनेकदा अल्कलाइन, pH व्हॅल्यू, सोपा उपाय आणि सुरक्षित आणि नैसर्गिक उपचार यांसारखे शब्द लोकांना सहज पटवून देण्यासाठी वापरतात. अशा कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नका, संसर्ग दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तपासाअंती चुकीची पोस्ट करणाऱ्या युजरची चौकशी करण्यात आली. बारी रिपोर्टरच्या सोशल स्कॅनिंगमध्ये हा यूजर हैदराबादचा असल्याचे समोर आले.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने आपल्या तपासणीत असे आढळले आहे की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती डॉ. जरीर उडवाडिया नाही आणि व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने सांगितलेले उपाय देखील चुकीचे आहेत. तज्ज्ञांच्या मते, आल्याच्या पावडरचा वास घेणे हानिकारक ठरू शकते.
- Claim Review : आल्याने कोरोनावर उपचार करता येतात
- Claimed By : फेसबुक यूजर बारी रिपोर्टर
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.