Fact Check: सीएनएन ने नाही केली मास्क घालण्यासाठी तालिबान ची प्रशांस, व्हायरल इमेज खोटी आहे
विश्वास न्यूज च्या तपासात ते छायाचित्र ज्यात दावा करण्यात येत होता कि सीएनएन ने तालिबान ची मास्क घातला म्हणून प्रशंसा केली ते खोटे आहे. हे चित्र आणि आर्टिकल एका सटायर वेबसाईट वर प्रकाशित झाले आहे.
- By: Ankita Deshkar
- Published: Aug 17, 2021 at 02:52 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक पोस्ट सध्याच्या अफघानिस्तान प्रकरणावरून सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेली दिसली. ह्या पोस्ट मधील चित्र हे सीएनएन चे न्यूज-प्लेट असल्याचे दिसते.
ह्यात हेडलाईन मध्ये दिले आहे: CNN Praises Taliban for Wearing Masks During Attack. (सीएनएन ने तालिबान ची मास्क घातल्याबद्दल प्रशंसा केली)
याच चित्राच्या उजव्या बाजूला लिहले आहे, ‘Breaking News’.
त्यात खाली लिहले होते: Taliban Fighters Responsibly Wearing Masks.
विश्वास न्यूज ने ह्या पोस्ट चा तपास केल्यास असे कळले कि सीएनएन च्या नावाने शेअर होणारी पोस्ट खोटी आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर हॅन्डल Dr. Ashutosh Agarwal @drashutoshbly ने व्हायरल छायाचित्र शेअर केले आणि लिहले: When you are hard core optimist.
हि पोस्ट आणि याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
बाकी ट्विटर यूजर्स ने देखील हि पोस्ट शेअर केली आहे.
हे चित्र भारतातील काही सेलेब्रिटीस आणि नेत्यांनी देखील शेअर केली.
तपास:
विश्वास न्यूज ने असे लक्षात आले कि हे छायाचित्र विविध प्लॅटफॉर्म वर शेअर करण्यात येत आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल होत असलेले छायाचित्र नीट निरखून पाहिले. ह्या चित्रावर बारीक अक्षरात लिहले होते: August 14th, 2021 – BabylonBee.com
आम्हाला हे चित्र द बॅबीलॉन बी च्या ट्विटर हॅन्डल वर देखील मिळाले.
त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये एक आर्टिकल शेअर केले होते.
आम्ही या वेबसाईट चा अबाऊट अस सेक्शन तपासला. त्यात लिहले होते, कि हि एक सटायर वेबसाईट आहे आणि ह्याचा सत्य घटनेंशी काही संबंध नाही. आम्ही क्रिस्टी धर्म, राजकारण आणि दैनंदिन जीवनावर सटायर लिहतो.
ह्या बद्दल इथे वाचा.
आता हे स्पष्ट होते कि हि बातमी सटायर होती (मजाक साठी लिहलेली)
विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात द बॅबीलॉन बी यांना त्यांच्या कॉन्टॅक्ट अस सेक्शन द्वारे संपर्क केला.
द बॅबीलॉन बी ने उत्तरात म्हंटले कि त्यांचे सटायर प्रकाशन आहे आणि सगळ्या बातम्या ह्या खऱ्या नसतात. ह्या वरून हे सिद्ध झाले कि व्हायरल होत असलेली पोस्ट हि खरी नसून सटायर आहे.
विश्वास न्यूज ने ट्विटर वर हि पोस्ट शेअर करणाऱ्या हॅन्डल चा बॅकग्राऊंड चेक केला. Dr Ashutosh Agarwal हे डेंटिस्ट आहे आणि ते 1737 लोकांना फॉलो करतात तसेच 462 लोकं त्यांना फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात ते छायाचित्र ज्यात दावा करण्यात येत होता कि सीएनएन ने तालिबान ची मास्क घातला म्हणून प्रशंसा केली ते खोटे आहे. हे चित्र आणि आर्टिकल एका सटायर वेबसाईट वर प्रकाशित झाले आहे.
- Claim Review : सीएनएन ने केली मास्क घालण्यासाठी तालिबान ची प्रशांस
- Claimed By : Dr Ashutosh Agarwal
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.