Fact Check: सीएनएन ने कॅनडा मधल्या आगीची बातमी युक्रेन ची सांगून नाही दाखवली, व्हायरल दावा खोटा आहे

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि सीएनएन ने कॅनडा ची आग युक्रेन चे सांगून दाखवली नाही. व्हायरल दावा खोटा आहे. एडमंटन असे लिहलेला कोट लिव्ह, युक्रेन चे अग्निशमन दलाचे लोकं वापरत आहेत.

Fact Check: सीएनएन ने कॅनडा मधल्या आगीची बातमी युक्रेन ची सांगून नाही दाखवली, व्हायरल दावा खोटा आहे

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला विविध सोशल मीडिया साईट्स वर एक पोस्ट व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. पोस्ट मध्ये दावा करण्यात येत होते कि सीएनएन चॅनेल ने कॅनडा मध्ये लागलेली आग, युक्रेन चे सांगून दर्शकांना बातमी दाखवली, पोस्ट मध्ये हे देखील सांगितले होते कि तिथल्या अग्निशमन दलाच्या लोकांनी एडमंटन चे जॅकेट घातले होते, जे मुळात कॅनडा मध्ये आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले. आम्हाला कळले कि फायरफायटर एड युक्रेन नामक संस्था एडमंटन मध्ये आहे, ज्याने हे गियर युक्रेन च्या अग्निशमन दलाला कॅनडा मध्ये दिले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Yael Steinberger ने सीएनएन चा स्क्रीनशॉट पोस्ट केला आणि लिहले: The mainstream media is too busy lying they forgot to remove Edmonton Canada Firefighters. Credit to the original person who took this screenshot.

हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

बाकी यूजर्स देखील हि पोस्ट खरी असल्याचे सांगून शेअर करत आहेत.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=171716271849880&id=100070345231558

https://www.facebook.com/jacqueline.n.lucas/posts/10227655174549276

https://www.facebook.com/michelle.deessandwell/posts/10159708911463260

तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात साध्य किवर्ड सर्च ने केली.

आम्ही ट्विटर आणि फेसबुक देखील सर्च इंजिन सारखे वापरले आणि किवर्डस आणि शोधले कि खरंच सीएनएन ने कॅनडा मध्ये लागलेली आग, युक्रेन चे सांगून दाखवली का.

आम्हाला एक फेसबुक वरती पोस्ट दिसली, ‘Firefighter Aid Ukraine’ ह्या पेज ने हि पोस्ट शेअर केली होती. पोस्ट मध्ये लिहले होते: Sharing this post from 2017 when we were distributing donated bunker gear in Lviv. See the “Edmonton” on the back of the jacket? There is no conspiracy. Our firefighter friends and colleagues are in harm’s way and we will continue to support them. If you or your department have any helmets, boots, bunker gear, etc to donate please reach out to us. The need is greater than ever. #ffaidukraine #ukraine #standwithukraine #fire #firefighter #ukrainefire

अनुवाद: 2017 पासून ही पोस्ट शेअर करत आहे जेव्हा आम्ही ल्विव्हमध्ये दान केलेल्या बंकर गियरचे वितरण करत होतो. जॅकेटच्या मागील बाजूस “एडमंटन” पहा? कोणतेही षडयंत्र नाही. आमचे अग्निशामक मित्र आणि सहकारी हानीच्या मार्गावर आहेत आणि आम्ही त्यांना पाठिंबा देत राहू. तुमच्याकडे किंवा तुमच्या विभागाकडे हेल्मेट, बूट, बंकर गियर इत्यादी देणगी असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा. गरज पूर्वीपेक्षा जास्त आहे. #ffaidukraine #ukraine #standwithukraine #fire #firefighter #ukrainefire

अशीच अजून एक पोस्ट त्यांनी शेअर केली होती.

आम्हाला सीएनएन चा एक स्क्रीनशॉट देखील ह्या पेज वर शेअर केला असल्याचे दिसले.

आम्हाला एक सीबीसी न्यूज ची बातमी देखील मिळाली. ह्या बातमीत शीर्षक होते: Under-equipped Ukrainian firefighters ‘blown away’ by donated Alberta gear.

बातमीत लिहले होते: A group of Edmonton firefighters and dispatchers delivered 600 protective suits to fire fighting crews in Ukraine along with other equipment like oxygen tanks, hoses and nozzles.

हि बातमी इथे वाचा.

आम्हाला सीएनएन चेच एक फॅक्ट चेक तपासादरम्यान सापडले. ह्याचे शीर्षक होते: Debunking the false conspiracy theory about an Edmonton firefighter coat in Ukraine

फॅक्ट चेक मध्ये लिहले होते: The “EDMONTON” coat was donated to firefighters in Ukraine by firefighters in Edmonton. An Edmonton-based nonprofit called Firefighter Aid Ukraine has donated “several hundred” sets of Edmonton turnout gear to Ukraine, plus hundreds of additional sets of turnout gear from other communities, founder and project director Kevin Royle, an Edmonton firefighter himself, told CNN on Sunday.

अनुवाद: एडमंटनमधील अग्निशामक दलाने युक्रेनमधील अग्निशामकांना “EDMONTON” कोट दान केले. फायर फायटर एड युक्रेन नावाच्या एडमंटन-आधारित ना-नफा संस्थेने युक्रेनला एडमंटन टर्नआउट गियरचे “अनेकशे” संच दान केले आहेत, तसेच इतर समुदायांकडून टर्नआउट गियरचे शेकडो अतिरिक्त संच, संस्थापक आणि प्रकल्प संचालक केविन रॉयले, स्वतः एडमंटन अग्निशामक, सीएनएनला सांगितले. रविवार.

आम्ही ह्यानंतर EDMONTON FIRE FIGHTERS’ UNION ची वेबसाईट तपासली.

वेबसाईट वर लिहले होते: The Edmonton Firefighters Union is an affiliate of the International Association of Fire Fighters and represents over 1000 members consisting of uniformed dispatchers, fire fighters, inspectors, investigators, mechanics, and support personnel that serve the citizens of the City of Edmonton.

विश्वास न्यूज ला ह्यावरून कळले कि हा कोट ज्यावर Edmonton लिहले होते हा, Firefighter Aid Ukraine ने दान केला, जे घालून युक्रेन च्या अग्निशमन दलाच्या लोकांनी आग वीजवली.

अधिक माहिती साठी आम्ही, सीएनएन चे हेड ऑफ स्ट्रॅटेजिक कॉम्म्युनिकेशन, मॅट डॉर्निक ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले, “ल्विवमधील एडमंटन गियर हे फायर फायटर एड युक्रेन (एफएयू) च्या प्रयत्नांचे परिणाम आहे, ही एक नानफा संस्था आहे जी अनावश्यक आणि अवांछित अग्निशामक गियर, पीपीई, जीवन बचाव उपकरणे आणि अग्निशामक विभाग आणि कॅनडातील विक्रेत्यांकडून वैद्यकीय पुरवठा गोळा करते. युक्रेनच्या विविध ठिकाणी उपकरणे आणि पुरवठा आवश्यक आहे. ल्विव्हमध्ये “एडमंटन” कोट वितरीत करणाऱ्या संस्थेचा 2017 फोटो ग्रुपच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे.

विश्वास न्यूज ने ज्या फेसबुक यूजर ने पोस्ट शेअर केली त्यांचा देखील तपास केला. Yael Steinberger चे दहा फॉलोवर्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि सीएनएन ने कॅनडा ची आग युक्रेन चे सांगून दाखवली नाही. व्हायरल दावा खोटा आहे. एडमंटन असे लिहलेला कोट लिव्ह, युक्रेन चे अग्निशमन दलाचे लोकं वापरत आहेत.

Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट