X
X

Fact Check: टीपू सुल्तान यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने व्हायरल होत आहे सीएम योगी आदित्यनाथ यांचा संपादित केलेला फोटो

  • By: Jyoti Kumari
  • Published: Jun 12, 2023 at 07:09 PM
  • Updated: Jun 14, 2023 at 11:27 AM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर टीपू सुल्तान यांचा एक मोठा फोटो दिसत आहे. आता काही युजर्स हा फोटो शेअर करत दावा करत आहेत की, सीएम योगी टीपू सुल्तान यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. महाराणा प्रताप यांना श्रद्धांजली वाहताना सीएम योगी यांची आणखी एक पोस्ट शेअर केली जात आहे.

विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टची तपासणी केली आणि त्यांना हा दावा खोटा असल्याचे आढळले. खरे चित्र संपादित करून चुकीच्या दाव्यासह शेअर केले जात आहे. मूळ चित्रात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, डॉ. भीमराव आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. तोच फोटो आता संपादित करून शेअर केला जात आहे.

काय होत आहे व्हायरल?

सोशल मीडिया वापरकर्ता ‘अरबाज अहमद’ याने 26 मे रोजी (संग्रहित लिंक) व्हायरल फोटो शेअर केला आणि लिहिले की, “जे आजच्या मुस्लिमांचा तिरस्कार करतात ते आमच्या वडीलधाऱ्यांसमोर नतमस्तक होतात.”

‘पुखराज सिंह राठोड मिथ्रा’ ने देखील एक व्हायरल फोटो शेअर केला आहे. या चित्रात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर महाराणा प्रताप यांचा फोटो आहे.

तपास

तपास सुरू केल्यानंतर, आम्ही सर्वप्रथम Google (गुगल) लेन्सद्वारे व्हायरल चित्र शोधण्यास सुरुवात केली. या दरम्यान, आम्हाला ‘यूपी व्हायरल 24‘च्या वेबसाइटवर व्हायरल फोटोसारखाच एक फोटो सापडला. 29 जून, 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे, “राष्ट्रपतींनी लखनऊ येथील भारत रत्न डॉ. भीमराव आंबेडकर स्मारक आणि सांस्कृतिक केंद्राचे भूमिपूजन केले. बाबासाहेब यांच्या स्मारकाच्या रूपात सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा उपक्रम कौतुकास्पद आहे.”

चौकशीच्या दरम्यान आम्हाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पडताळणी केलेल्या फेसबुक पेजवरूनही खरा फोटोही सापडला. 29 जून 2021 रोजी शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर डॉ. भीमराव आंबेडकर यांचे छायाचित्र आहे आणि त्यांना डॉ. भीमराव आंबेडकर यांना आदरांजली वाहताना पहिले जाऊ शकते. हे चित्र संपादित करून टिपू सुलतान आणि महाराणा प्रताप यांची छायाचित्रे चिकटवण्यात आली आहेत. या फोटोला कॅप्शनसह शेअर केले आहे, “बाबासाहेबांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी आदरणीय पंतप्रधानांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली पंचतीर्थची स्थापना करण्यात आली. भारताव्यतिरिक्त इंग्लंडमध्ये उभारलेले बाबा साहेबांचे भव्य स्मारक हे, त्यांच्या स्मृती आणि भारताचा आवाज जागतिक स्तरावर नेण्याचे एक माध्यम आहे. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने ‘भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर स्मारक आणि सांस्कृतिक केंद्र’ बाबा साहेब डॉ. भीमराव आंबेडकरांच्या आठवणींचे रक्षण करतील.”

29 जून 2021 रोजी ‘न्यूज ऑफ द स्टेट्स‘ या फेसबुक पेजवरही हा फोटो शेअर करण्यात आला होता. ‘वृत्तपत्राच्या’ संकेतस्थळावर व्हायरल फोटोशी संबंधित बातमीत म्हटले आहे, “भारत रत्न बाबा साहेब भीमराव आंबेडकर यांच्या नावावर राजधानी लखनऊमध्ये एक स्मारक बांधण्यात आले आहे. यापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा, केशव प्रसाद मौर्य, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची पत्नी सविता कोविंद आणि योगी आदित्यनाथ मंत्रीमंडळाच्या सहयोगींसमवेत मुख्य सचिव आर. के. तिवारी आणि उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक हितेश चंद्र अवस्थी उपस्थित होते.

आमच्या तपासात असे दिसून आले की व्हायरल फोटो संपादित म्हणजे एडिट करण्यात आला आहे. खाली आपण खऱ्या आणि सोशल मीडियावर व्हायरल फोटोंमधील फरक पाहू शकता. अतिरिक्त पुष्टीसाठी आम्ही भाजप प्रवक्ता अवनीश त्यागी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की, व्हायरल दावा चुकीचा आहे. फोटो संपादित करण्यात आलेला आहे.

तपासाच्या शेवटी, आम्ही पोस्ट शेअर केलेल्या वापरकर्त्याचे स्कॅन केले. फेसबुकवर 649 वापरकर्ते फॉलो करत असल्याची माहिती या सर्वेक्षणातून समोर आली आहे. वापरकर्ता एका विचारसरणीने प्रभावित आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे व्हायरल झालेले छायाचित्र एडिट केलेले आढळले. मूळ चित्रात मुख्यमंत्री योगी डॉ. भीमराव आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. तीच प्रतिमा संपादित करण्यात आली आहे आणि टीपू सुलतान आणि महाराणा प्रताप यांचा एक फोटो लावण्यात आला आहे.

  • Claim Review : मुख्यमंत्री योगी यांनी टीपू सुलतान यांना श्रद्धांजली अर्पण केली.
  • Claimed By : अरबाज अहमद
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later